Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंद्रायणी नदी स्वच्छतेचा जागर संदेश देण्यासाठी आयोजित केलेल्या ‘रिव्हर सायक्लोथॉन 2025’ या भव्य उपक्रमात यंदा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ‘शिव-शंभू यशोगाथा’ या विशेष कार्यक्रम ठरणार आहे. वारकरी परंपरा आणि पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात शिवकालीन गौरवाचा भव्य आविष्कार यावर्षी पहायला मिळणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षी इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉनचे आयोजन केले जाते. यावर्षी रविवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजता ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’’ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसरातून सायक्लोथॉनची सुरुवात होणार आहे. याच वेळी शिव-शंभू गर्जनेने हा परिसर दुमदुमणार आहे. रणमर्द शिलेदारांचे संचलन, शिवकालीन मर्दानी खेळ, ढोल-ताशांचा ठेका आणि मशाल-दिवटी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मतदारयादीत अभूतपूर्व गोंधळ उफाळून आला आहे. शहरातील अनेक माजी नगरसेवकांसह त्यांच्या कुटुंबीयांची नावे मूळ प्रभागातून गायब होऊन असंबंधित प्रभागात टाकण्यात आली आहेत. शेकडो घरांतील संपूर्ण कुटुंबांची नावेही दुसऱ्याच प्रभागात दाखल झाल्याचे दिसत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तळवडे प्रभाग क्रमांक १२ मधील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचे नाव थेट चिखली (प्रभाग १) मध्ये टाकण्यात आले आहे. इतकेच नव्हे, तर १,२६१ मतदारांना एकाचवेळी चिखली प्रभागात हलवण्यात आले आहे. वर्षानुवर्षे तळवड्यात वास्तव्यास असलेल्या शेकडो मतदारांचे असे स्थलांतर केल्याने प्रभागात गोंधळ उडाला आहे. याचप्रमाणे, मागील निवडणुकीतील उमेदवार योगिता रणसुभे यांच्या…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चाकण व राजगुरूनगर नगर परिषदेने कचरा अव्यस्थापन केले, 2014-16 पासून नगर परिषद अस्तित्वात येऊनही कचऱ्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा नाही त्यामुळे सामाजिक स्वास्थ्याचे व दुर्गंधीचे साम्राज्य चाकण व राजगुरूनगर परिसरात वाढले असा आरोप करणाऱ्या याचिकेची गंभीर दखल घेऊन राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कोर्टाने मुख्याधिकारी चाकण व राजगुरूनगर नगर परिषद, सरपंच- ग्रामपंचायत खराबवाडी, ग्रामपंचायत बिरडवाडी, जिल्हाधिकारी पुणे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पंचायत समिती खेड, ग्राम विकास मंत्रालय, शहर विकास मंत्रालय यांच्या विरुद्ध नोटीस जारी केली आहे. नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उघड झालेला हा प्रकार गंभीर चर्चेत आलेला आहे. चाकण लॉजेस्टिक पार्क चे संचालक शिवकुमार नेलगे यांनी ॲड.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  चिखली घरकुल येथील ज्येष्ठ उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या सुजाता विधाते यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी चिंचवड ओबीसी महिला शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी मुंबई येथे एका कार्यक्रमात सुजाता विधाते यांना निवड केल्याचे पत्र देऊन अभिनंदन केले. यावेळी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, राज्य समन्वयक सलीम बेग, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे, समन्वयक विक्रांत पाटील यांनी विधाते यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, ओबीसी शहराध्यक्ष विशाल जाधव, सरचिटणीस संदीप चव्हाण, पिंपरी विधानसभा महिला अध्यक्ष…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीत प्रचंड गोंधळ उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. तळवडे गावठाणातील शेकडो मतदारांची नावे सरळ चिखली प्रभागात वळविल्याचा प्रकार उघड होताच राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या प्रकारावर भाजपचे माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर यांनी प्रशासनाला जाब विचारत प्रशासनाची कानउघाडणी केली आहे. मतदारांच्या नावांची चुकीची नोंद,दुसऱ्या प्रभागात जाणीवपूर्वक नावे वळविणे ही साधी चूक नसून निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत करणारी गंभीर बाब आहे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत सुधारित मतदार यादी जाहीर करावी.” अशी मागणी भालेकर यांनी केली आहे. याबाबत भालेकर यांनी प्रसिद्धीस…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच भाजपने शहरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी लढाईत पुन्हा स्वबळावर सत्ता मिळवण्याचा निर्धार करत आज (शनिवारी) सकाळी १० वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शहरातील अनेक प्रभावशाली नेते आणि इतर पक्षांतून मोठ्या प्रमाणात होणारे प्रवेश यामुळे भाजप आपली राजकीय ताकद स्पष्टपणे दाखवण्याच्या तयारीत आहे. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण आणि प्रदेश सरचिटणीस राजेशजी पांडे हे विशेषतः मार्गदर्शन करणार असून, पिंपरी चिंचवड महापालिका पुन्हा जिंकण्यासाठीचा ‘ब्लूप्रिंट’ या ठिकाणी मांडला जाणार आहे. तसेच आ.महेश लांडगे,आ. शंकर जगताप, आ.उमा खापरे, आ. अमित गोरखे,…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने वाकड परिसरातील कावेरीनगर येथे २५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची उंच टाकी उभारण्यात आली आहे. या टाकीतून आजपासून पाणीपुरवठा देखील सुरू करण्यात आला आहे. या पाण्याच्या टाकीमुळे वाकड परिसरातील कस्पटेवस्ती, पिंक सिटी रस्ता परिसर, वेणूनगर, कावेरीनगर, पोलीस कॉलनी, दत्त मंदिर रस्ता आदी परिसरातील गृहसंकुले अशा विविध भागातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले. कावेरीनगर,वाकड येथील वॉर्ड क्र. ५३, स. नं. २०८ मध्ये महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने ५ कोटी ८५ लाख रू.खर्च करून उभारण्यात आलेल्या २५ लाख लिटर्स क्षमतेच्या पाण्याची उंच टाकी व संपवेलचे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास…

Read More

– पिंपरी चिंचवड शहरात उद्योग महर्षी रतन टाटा यांचे स्मारक उभारणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाहतुक कोंडीच्या समस्येने नागरिक हैराण आहेत. वारंवार अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी संदर्भात नागरिकांच्या तक्रारी येतात. प्रलंबित भुयारी मार्ग, उड्डाणपूल तसेच रस्त्यांच्या कामांना प्राधान्य द्यावे. नागरिकांकडून सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी शहरात पीएमपीएल बसची वारंवारता वाढवण्यात यावी. मुख्य म्हणजे इलेक्ट्रिक आणि मिडी बसेससाठी प्राधान्य देण्यात यावे असे निर्देश आमदार तथा पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी महापालिका प्रशासनाला बुधवारी दिले. दरम्यान पिंपळे निलख रक्षक चौकातील उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाच्या कामाला गती देण्याच्या सूचना देखील आमदार शंकर जगताप यांनी केल्या आहेत. संरक्षण…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक एक चिखली गावठाण-माेरेवस्तीमध्ये सर्वाधिक ७४ हजार ३४४, तर प्रभाग क्रमांक २३ थेरगाव गावठाण-पडवळनगरमध्ये सर्वांत कमी ३४ हजार ७६६ मतदार आहेत. शहरात १७ लाख १३ हजार ८९१ मतदार आहेत. महापालिका निवडणुकीसाठी विधानसभेची मतदारयादी वापरण्यात येणार आहे. एक जुलै २०२५ पर्यंतची मतदारसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. त्यानुसार प्रारूप यादी प्रसिद्ध केली आहे. शहरात चार विधानसभा मतदार संघ येतात. चिंचवड मतदारसंघात सर्वाधिक सहा लाख ७६ हजार ६३८ मतदार आहेत. त्या खालोखाल भोसरी (सहा लाख २४ हजार १५२), पिंपरी (तीन लाख ९९ हजार ८११) आणि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष श्री. रविराज बबन काळे यांनी राज्य निवडणूक आयुक्तांना निवेदन देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीच्या शुल्क धोरणात तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे. काळे यांनी दाखवून दिले की, सध्या आकारले जाणारे शुल्क अनावश्यकरीत्या वाढीव असून सर्वसामान्य उमेदवार आणि नागरिकांसाठी आर्थिक अडथळे निर्माण करणारी आहे. मुख्य आक्षेप  शुल्क धोरणातील तफावत व नागरिकांवरील वाढता आर्थिक बोजा प्रती पान ₹ 2 शुल्क; एका वार्डाची मतदार यादी घेताना एकूण खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो. उमेदवारी अर्जासाठी सुमारे ₹10,000 खर्च, त्यात अतिरिक्त मतदार यादीचे शुल्क सामान्य व्यक्तीसाठी परवडणारे नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेची संपूर्ण यादी घेतल्यास…

Read More