- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची पिंपरी चिंचवड जिल्हा निवडणूक संचालन समिती जाहीर करण्यात आली आहे. या समितीच्या संयोजकपदी आमदार अमित गोरखे तर सहसंयोजकपदी संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राजकीय व संघटनात्मक दृष्टीने महत्वाची असलेल्या या समितीच्या अध्यक्षपदी शिष्टाचाराप्रमाणे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे हे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.निवडणूक कालखंडात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविणे, पक्षाचा जाहीरनामा तयार करणे, समाजातील विविध घटकांशी संवाद प्रस्थापित करणे, इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन करणे आणि प्रचार यंत्रणा कार्यान्वित करणे या समितीच्या प्रमुख जबाबदाऱ्यांमध्ये समाविष्ट आहे.या समितीत विविध कार्यक्षेत्रांसाठी प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. जाहीरनामा प्रमुख: अमोल…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव २०४७ मध्ये साजरा होणार आहे. तोपर्यंत भारत देशाची विश्ववंदित राष्ट्र अशी प्रतिमा उभारली पाहिजे. त्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व शिक्षण पद्धतीत संतसाहित्याचा समावेश करणे गरजेचे आहे, असे विचार शिवथर घळ येथील श्री सुंदर मठ सेवा समितीचे विश्वस्त डॉ. विजय लाड यांनी शनिवारी (दि २२) रोजी व्यक्त केले. निगडी प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनी मधील मनोहर सभागृह मातृमंदिर विश्वस्त संस्था आयोजित संत साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष नितीन भाई कारिआ, कार्यवाह डॉ. मनोज देवळेकर, उपाध्यक्षा शारदा चोरडिया, उपक्रम संयोजक सुधीर कुलकर्णी, सुभाष देशपांडे उपस्थित होते. डॉ.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘मातृभाषेतील शिक्षण जीवनातील वादळे सोसण्याचे बळ देते!’ असे विचार सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि सातारा येथील नियोजित ९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साहित्यनगरी, जयगणेश बॅंक्वेट हॉल, मोशी येथे (रविवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२५) व्यक्त केले. इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित चौथ्या इंद्रायणी साहित्य संमेलनात महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रज्ञावंत साहित्य पुरस्कार स्वीकारल्यानंतर विश्वास पाटील बोलत होते. संमेलनाध्यक्षा डॉ. सीमा काळभोर, स्वागताध्यक्ष नीलेश बोराटे, इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक अरुण बोऱ्हाडे, परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. विश्वास पाटील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘देव अस्तित्वात आहे की नाही याविषयी मतभेद होऊ शकतात; पण देवत्वाची प्रचिती साहित्यातून येते!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साहित्यनगरी, जयगणेश बॅंक्वेट हॉल, मोशी येथे (रविवार, दिनांक २३ नोव्हेंबर) येथे केले. इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित चौथ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना डॉ. न. म. जोशी बोलत होते. संमेलनाध्यक्षा डॉ. सीमा काळभोर, आकाशवाणी पुणेचे निवृत्त संचालक गोपाळ अवटी, संतसाहित्याचे अभ्यासक ह. भ. प. उमेशमहाराज बागडे, मोई येथील इंद्रायणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब गवारे, माजी संमेलनाध्यक्ष दादाभाऊ गावडे, स्वागताध्यक्ष नीलेश बोराटे, इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक अरुण बोऱ्हाडे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रिकेटच्या माध्यमातून खिलाडूवृत्ती जोपासली जाते!’ असे विचार कौटुंबिक न्यायालय पुणेचे प्रमुख न्यायाधीश शाम रूकमे यांनी अण्णासाहेब मगर स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे रविवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड बार असोसिएशन आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय विधी चषक स्पर्धा २०२५च्या पारितोषिक वितरण समारंभात मार्गदर्शन करताना शाम रूकमे बोलत होते. याप्रसंगी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, उपाध्यक्ष ॲड. अनिल पवार, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. विकास ढगे पाटील, ॲड. सतिश गोरडे, ॲड. सुहास पडवळ, ॲड. राजेश पुणेकर, ॲड. योगेश थांबा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. न्यायाधीश शाम रूकमे पुढे म्हणाले की, वकिली…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचा मतदानाचा मूलभूत हक्क अबाधित राहण्यासाठी प्रत्येक मतदाराची नोंद बरोबर व अद्ययावत असणे अत्यावश्यक आहे. यासाठी नागरिकांची माहिती — नाव, पत्ता, वय, सुधारणा, नवीन समावेश आणि वगळण्यात आलेल्या नोंदी — यांची व्यवस्थित पडताळणी होणे आवश्यक आहे. यासाठी प्रारूप मतदार यादीच्या प्रक्रियेत नागरिकांच्या हरकती व सूचना प्रभावीपणे स्वीकारून त्या सोडविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त व प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रारूप मतदार यादीवरील नागरिकांच्या हरकती व सूचनांचा आढावा बैठक आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली माजी महापौर मधुकर पवळे सभागृहात पार पडली. यावेळी आयुक्त…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद व संशोधन केंद्र आणि NIMA OBGY सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सुश्रुती २०२५ – आंतरराष्ट्रीय शल्य–वैद्यक परिषद’ तीन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमानंतर उत्साहात संपन्न झाली. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक यांच्या एकात्मिक दृष्टिकोनातून शल्य–वैद्यकीय विज्ञानात नवे दिशादर्शन करणारी ही परिषद देश–विदेशातील तज्ज्ञ, क्लिनिशियन, संशोधक, प्राध्यापक आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्रभावी व्यासपीठ ठरली. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरीचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आणि प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही उद्घाटन उद्घाटन सोहळ्यास श्रीमती माधुरीताई मिसाळ, राज्य मंत्री – नगर विकास,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मारुती जाधव मित्र परिवार यांच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदारसंघातील दमदार आमदार महेश लांडगे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांसाठी आज नोकरी महोत्सव, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रभागातील नागरिकांनी उस्फूर्त असा प्रतिसाद देत कार्यक्रमाला हजेरी लावली. 62 रक्तदात्यांनी आज रक्तदान केले. 160 तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला, तसेच साडेतीनशे महिलांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ते निलेश दादा नेवाळे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, सारिका पवार, कविता हिंगे,माजी नगरसेवक अजय सायकर, सुहास ताम्हाणे, यशवंत कन्हेरे, शिवानंद चौगुले, घरकुल फेडरेशनचे अध्यक्ष अशोक मगर,…
पिंपरी चिंचवड महानगरपालिका,अविरत श्रमदान, सायकल मित्र, डब्ल्यूटीई फाउंडेशन आणि महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रिव्हर सायक्लोथॉन २०२५ स्पर्धेमध्ये मतदान जनजागृतीसाठी विशेष उपक्रमाचे आयोजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अधिपत्याखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने आज सुमारे ३८ हजार ३४० जणांनी मतदान करण्याची विक्रमी शपथ घेतली. मोशी येथील जगातील सर्वात मोठ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ स्मारकाला मानवंदना देण्यासाठी आज पिंपरी चिंचवड महापालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र, डब्ल्यूटीई फाउंडेशन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा शनिवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या मेळाव्यात पिंपळे सौदागर येथील प्रसिद्ध उद्योजक संदीप काटे आणि सामाजिक कार्यकर्त्या अनिता संदीप काटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. मेळाव्याला प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार महेश लांडगे, निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, निवडणूक संचालन समितीचे संयोजक आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, संघटन…
