- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांसोबत आयोजित आढावा बैठकीत पोलिस आयुक्तांनी सुरक्षाविषयक महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट आणि ठोस भूमिका मांडत अनेक महत्वाचे निर्णय जाहीर केले. औद्योगिक क्षेत्रात वाढत चाललेले अनाधिकृत माथाडी कामगारांचे प्रमाण, चोरीच्या घटना, वाहतूक कोंडी यांसारख्या समस्या तातडीने हाताळण्यासाठी पोलीस विभाग, महानगरपालिका आणि उद्योजक यांच्यात समन्वय वाढवण्यावर त्यांनी भर दिला. सीसीटीव्ही बसविणे अनिवार्य — अनधिकृत माथाडी व चोरट्यांना आळा उद्योग परिसरातील मुख्य गेटवर तसेच संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. अनाधिकृत माथाडी कामगार किंवा संशयित व्यक्ती परिसरात प्रवेश केल्यास त्यांची ओळख पटविणे, कारवाई करणे आणि चोरीच्या घटना रोखणे यात मोठी मदत होणार असल्याचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी करून वसुंधरापूरक वातावरण निर्मितीसाठी पिंपरी चिंचवड महापालिका सातत्याने जनजागृती मोहीम राबवत आहे. ज्या गृहनिर्माण संस्थांमधून दररोज १०० किलो किंवा त्याहून अधिक कचरा निर्माण होतो, अशा सोसायट्यांना महापालिकेकडून स्वतःहून कचरा व्यवस्थापन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जात असून जास्तीतजास्त सोसायट्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. महापालिकेकडून शहरातील कचऱ्याचे वसुंधरापूरक व्यवस्थापन करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तर उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, आरोग्य कार्यकारी अधिकारी अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये ओला सुका कचरा विलगीकरण, होम…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी – मुकाई चौक, किवळे परिसर ते वाघोली दरम्यान साधारण 32 किलोमीटर रस्ता ‘फास्ट ट्रॅक कॉरिडॉर” विकसित करण्याचे नियोजन सुरू आहे. याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिका आणि पीएमपीएमएल यांच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या निगडी ते मुकाई चौक किवळे बीआरटी कॉरिडॉरवर बससेवा सुरू करण्यात आली आहे. निगडी भक्तीशक्ती चौकापासून ट्रान्सपोर्ट नगर मार्गे मुकाई चौकपर्यंतच्या या नव्या मार्गामुळे नागरिकांना जलद, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. आगामी काळात हा परिसर “मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब” म्हणून विकसित करणार असल्याचा विश्वासही जगताप यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड परिसर प्रचंड वेगाने वाढत आहे.त्यामुळे येथील…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीने शहरातील अनेक दिग्गज इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. ज्या प्रभागात दशकभर सामाजिक कामे केली, पक्षसंघटना उभी केली, मतदारांशी नाळ जुळवली… त्या स्वतःच्या “होम ग्राऊंड” मधूनच नाव गायब असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घोळामुळे अनेकांचे राजकीय गणित ढवळून निघाले असून निवडणूक विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रभागबदलाचा धडाका — हजारो मतदारांचे पत्ते उलटसुलट नुकत्याच जाहीर झालेल्या प्रारूप यादीत हजारो मतदारांचे नाव एका प्रभागातून सरळ दुसऱ्या प्रभागात ढकलले गेले. काही ठिकाणी तर संपूर्ण सोसायट्या, वस्त्या, कॉलन्या—सगळ्यांचा प्रभागच बदलला. आधार कार्ड, रेशनकार्ड, विजबिल यांसारखे निर्विवाद पुरावे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादी २०२५ मधील मोठ्या प्रमाणातील त्रुटी, विसंगती आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारींचा गंभीर पद्धतीने घेत, पिंपरी–चिंचवड भाजपकडून आज राज्य निवडणूक आयोगाकडे औपचारिक निवेदन देण्यात आले. शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी संपूर्ण शहराच्या वतीने हे निवेदन सादर करत, मतदार यादीतील गोंधळ तात्काळ दूर करण्याची मागणी केली. शत्रुघ्न काटे यांनी निवेदनात नमूद केले की, प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळली जाणे, चुकीच्या प्रभागात स्थलांतरित होणे, दुबार नोंदी, पत्त्यातील त्रुटी तसेच यादी पाहण्यासाठी नागरिकांना कोणतीही प्रभावी डिजिटल सुविधा उपलब्ध नसणे—या सर्व गोष्टींमुळे शहरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळवडे प्रभाग क्र. १२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेला कथित ‘फेक नरेटिव्ह’ भारतीय जनता पक्षाच्या तात्काळ आणि सक्रिय हस्तक्षेपामुळे फोल ठरला आहे. मतदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केल्याचा आरोप भाजपने केला आहे. निवडणूक आयोगाच्या तांत्रिक चुकीमुळे प्रभाग क्र. १२ मधील यादी भाग क्र. ७ हा प्रभाग १ मध्ये जोडला गेला होता. या चुकीकडे सर्वप्रथम लक्ष वेधणारे माजी नगरसेवक शांताराम भालेकर होते. मात्र, शहरभरात मतदार याद्यांतील विसंगती सर्वत्र झाली असताना ही एक तांत्रिक चूक असल्याचे स्पष्ट असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी त्याला राजकीय वळण देत भाजपवर संगनमताचे आरोप केले. विशेष…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17 मधून सर्वसाधारण महिला गटासाठी सौ. सुप्रिया भरत वाल्हेकर यांना वाल्हेकरवाडी ग्रामस्थांनी एकमुखी पाठींबा जाहीर केला आहे. सोमवार, दिनांक 24 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाल्हेकरवाडी येथे झालेल्या भव्य ग्रामसभा-मिटींगमध्ये हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. ग्रामसभेची सुरूवात ग्रामस्थांचे ज्येष्ठ मार्गदर्शक भरत शंकर वाल्हेकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. शिवस्मारक, स्मशानभूमी, प्राथमिक आरोग्य दवाखाना आणि नदीसुधार प्रकल्प या चार महत्त्वाच्या स्थानिक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. या संदर्भात गेल्या काही वर्षांत झालेल्या पाठपुराव्याची अधिकृत कागदपत्रे भरत वाल्हेकर यांनी ग्रामस्थांसमोर मांडली. चर्चेचा ऊहापोह सुरू असताना प्रगतशील शेतकरी विठ्ठल तरुण मंडळाचे अध्यक्ष नथुशेठ मारूती वाल्हेकर…
नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत आदर्श नगर परिसरातील वाढत्या डासांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी युवासेना, शिवसेनेचे मेघराज लोखंडे मावळ लोकसभा जिल्हा उपाध्यक्ष यांनी पुढाकार घेत प्रभावी कारवाई केली. डेंग्यू, झिका, चिकुनगुनिया व मलेरिया यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याची माहिती मिळताच लोखंडे यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून फवारणीची तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर केवळ आदेश देण्यावर न थांबता त्यांनी स्वतः मशीन हातात घेऊन परिसरात फवारणीचे काम करून आदर्श कार्यपद्धती दाखवली. नागरिकांच्या आरोग्यासोबत कोणतीही तडजोड न करता वेगवान व परिणामकारक कारवाई करण्यात आली. फवारणीमुळे परिसरातील डासोत्पत्ती रोखण्यास मोठी मदत होणार असून नागरिकांमध्ये समाधान…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जगातील सर्वात उंच स्मारक ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’वरुन मागील काळात अनेकांनी राजकीय टीका केली. बिनबुडाचे आरोप केले. मात्र, जे मागे झाले ते सर्व आपण विसरुन सर्वांनी शहराच्या पर्यावरणावरील संकट दूर करण्यासाठी शंभूराजाच्या विचारांची एकत्र आले पाहिजे, असे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केले. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र आणि डब्ल्युटीई फाउंडेशनच्या पुढाकाराने इंद्रायणी रिव्हर सायक्लोथॉन-2025 चे आयोजन करण्यात आले. त्याला सायकलपटू आणि पर्यावरण प्रेमींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार लांडगे बोलत होते. आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातील पर्यावरण…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरात स्वच्छता आणि सौंदर्यनिर्मिती यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने ‘टाकाऊ वस्तूंपासून सर्जनशीलता’ या संकल्पनेला नवचैतन्य देत, शहरातील टाकाऊ वस्तूंमधून आकर्षक कलाकृती निर्मितीचा उपक्रम मोठ्या उत्साहात राबवला आहे. या कलाकृती केवळ नजरेत भरणाऱ्या नसून पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता उपक्रमास देखील चालना देणाऱ्या ठरत आहेत. शहरातील विविध कचरा संवेदनशील ठिकाणी हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला आहे. यामध्ये ब क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग १७ बिजलीनगर, प्रभाग २२ शांती चौक काळेवाडी तसेच , इ क्षेत्रीय कार्यालयातील प्रभाग ०५ सखुबाई गवळी उद्यान, आळंदी रोड, भोसरी येथे असलेली संवेदनशील ठिकाणे आता रंगतदार, देखण्या कलाकृतींनी सुशोभित…
