Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने आज गुरुवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ठीक ०३:०० वाजता ऑटोक्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, चिंचवड येथे यशवंत – वेणू गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार्‍या या गौरव सोहळ्यात ज्येष्ठ समाजसुधारक गिरीश प्रभुणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे हे गौरव सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आहेत. गौरव…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- भारत हे एक स्वतंत्र, सार्वभौम गणराज्य घोषित केले कारभारासाठी घटना तयार करण्यात आली कायद्याप्रमाणे त्यांना स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होईल, सार्वभौम भारत, घटक राज्य आणि शासनाचे विविध घटक आपली सत्ता आणि अधिकार जनतेतून प्राप्त करतील भारताच्या सर्व लोकांना कायद्याच्या,समाजाच्या नितीनियमांच्या कक्षेत सामाजिक, आर्थिक तसेच राजकीय हक्क मिळवून देणारे भारतीय संविधान प्रास्ताविकेचे कष्टकरी कामगारांच्या वतीने सामूहिक वाचन करण्यात आले. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे संविधान सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला. कंत्राटी कामगार, बांधकाम कामगार,फेरीवाला, रिक्षा चालक, घरेलू कामगार आदि असंघटित कामगारांच्या लक्षणीय उपस्थितीमध्ये थरमॅक्स चौक चिंचवड येथे संविधान दिनाचा उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कामगार…

Read More

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )  – येथील आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत आळंदी पोलिस स्टेशन कार्यक्षेत्रातील आळंदीत पोलिसांनी शांततेसाठी रूट मार्च काढला. आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २ डिसेम्बर रोजी होत आहे. त्या नंतर ३ डिसेम्बर रोजी लगेच मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरु असून २६ नोव्हेंबर रोजी अधिकृत उमेदवार यांना चिन्ह वाटप होणार आहे. या नंतर प्रचार अधिक प्रभावी पणे सुरु होणार आहे. निवडणुकीचे पार्श्वभूमीवर आळंदीत सकाळी साडे दहाचे सुमारास रूट मार्च सुरु झाला. यात सहा. पोलिस आयुक्त, चाकण विभाग सचिन कदम यांची प्रमूख उपस्थिती होती. आळंदी शहरातून आळंदी पोलिस स्टेशन – नगरपरिषद चौक…

Read More

महाविकास आघाडीच्या वतीने  प्रातिनिधिक स्वरूपात प्रारूप मतदार याद्या जाळून  निवडणूक विभागाचा निषेध करण्यात आला पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाविकास आघाडीच्या वतीने  प्रातिनिधिक स्वरूपात प्रारूप मतदार याद्या जाळून  निवडणूक विभागाचा निषेध करण्यात आला. पिंपरी–चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात प्रारूप मतदार याद्यांमध्ये झालेले प्रचंड गोंधळ, नावांची मोठ्या प्रमाणावर झालेली कपात,अनेक प्रभागातील मतदार याद्या इकडच्या तिकडे प्रभागात जोडण्यात आल्या आहेत त्याचबरोबर अनेक मतदारांचे प्रभाग चुकले आहेत ,हजारो मतदार दुबार नावे झालेले आढळून येत आहे ,मतदार यादीतील  विसंगती आणि प्रशासनाकडून झालेली गंभीर दुर्लक्ष यामुळे नागरिकांच्या मतदानाच्या हक्कावर थेट परिणाम झाला असून, या सर्व प्रकाराला निवडणूक प्रक्रियेवरील अविश्वास आणि लोकशाहीवर केलेला आघात असे स्पष्ट शब्दांत वर्णन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योजकांसोबत आयोजित आढावा बैठकीत पोलिस आयुक्तांनी सुरक्षाविषयक महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्पष्ट आणि ठोस भूमिका मांडत अनेक महत्वाचे निर्णय जाहीर केले. औद्योगिक क्षेत्रात वाढत चाललेले अनाधिकृत माथाडी कामगारांचे प्रमाण, चोरीच्या घटना, वाहतूक कोंडी यांसारख्या समस्या तातडीने हाताळण्यासाठी पोलीस विभाग, महानगरपालिका आणि उद्योजक यांच्यात समन्वय वाढवण्यावर त्यांनी भर दिला. सीसीटीव्ही बसविणे अनिवार्य — अनधिकृत माथाडी व चोरट्यांना आळा उद्योग परिसरातील मुख्य गेटवर तसेच संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन आयुक्तांनी केले. अनाधिकृत माथाडी कामगार किंवा संशयित व्यक्ती परिसरात प्रवेश केल्यास त्यांची ओळख पटविणे, कारवाई करणे आणि चोरीच्या घटना रोखणे यात मोठी मदत होणार असल्याचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी करून वसुंधरापूरक वातावरण निर्मितीसाठी पिंपरी चिंचवड महापालिका सातत्याने जनजागृती मोहीम राबवत आहे. ज्या गृहनिर्माण संस्थांमधून दररोज १०० किलो किंवा त्याहून अधिक कचरा निर्माण होतो, अशा सोसायट्यांना महापालिकेकडून स्वतःहून कचरा व्यवस्थापन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जात असून जास्तीतजास्त सोसायट्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. महापालिकेकडून शहरातील कचऱ्याचे वसुंधरापूरक व्यवस्थापन करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तर उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, आरोग्य कार्यकारी अधिकारी अमित पंडित यांच्या अधिपत्याखाली विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये ओला सुका कचरा विलगीकरण, होम…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  निगडी – मुकाई चौक, किवळे परिसर ते वाघोली दरम्यान साधारण 32 किलोमीटर रस्ता ‘फास्ट ट्रॅक कॉरिडॉर” विकसित करण्याचे नियोजन सुरू आहे. याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिका आणि पीएमपीएमएल यांच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या निगडी ते मुकाई चौक किवळे बीआरटी कॉरिडॉरवर बससेवा सुरू करण्यात आली आहे. निगडी भक्तीशक्ती चौकापासून ट्रान्सपोर्ट नगर मार्गे मुकाई चौकपर्यंतच्या या नव्या मार्गामुळे नागरिकांना जलद, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. आगामी काळात हा परिसर “मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब” म्हणून विकसित करणार असल्याचा विश्वासही जगताप यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड परिसर प्रचंड वेगाने वाढत आहे.त्यामुळे येथील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीने शहरातील अनेक दिग्गज इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. ज्या प्रभागात दशकभर सामाजिक कामे केली, पक्षसंघटना उभी केली, मतदारांशी नाळ जुळवली… त्या स्वतःच्या “होम ग्राऊंड” मधूनच नाव गायब असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घोळामुळे अनेकांचे राजकीय गणित ढवळून निघाले असून निवडणूक विभागाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. प्रभागबदलाचा धडाका — हजारो मतदारांचे पत्ते उलटसुलट नुकत्याच जाहीर झालेल्या प्रारूप यादीत हजारो मतदारांचे नाव एका प्रभागातून सरळ दुसऱ्या प्रभागात ढकलले गेले. काही ठिकाणी तर संपूर्ण सोसायट्या, वस्त्या, कॉलन्या—सगळ्यांचा प्रभागच बदलला. आधार कार्ड, रेशनकार्ड, विजबिल यांसारखे निर्विवाद पुरावे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादी २०२५ मधील मोठ्या प्रमाणातील त्रुटी, विसंगती आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारींचा गंभीर पद्धतीने घेत, पिंपरी–चिंचवड भाजपकडून आज राज्य निवडणूक आयोगाकडे औपचारिक निवेदन देण्यात आले. शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी संपूर्ण शहराच्या वतीने हे निवेदन सादर करत, मतदार यादीतील गोंधळ तात्काळ दूर करण्याची मागणी केली. शत्रुघ्न काटे यांनी निवेदनात नमूद केले की, प्रारूप मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळली जाणे, चुकीच्या प्रभागात स्थलांतरित होणे, दुबार नोंदी, पत्त्यातील त्रुटी तसेच यादी पाहण्यासाठी नागरिकांना कोणतीही प्रभावी डिजिटल सुविधा उपलब्ध नसणे—या सर्व गोष्टींमुळे शहरात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळवडे प्रभाग क्र. १२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सहानुभूती मिळवण्यासाठी रचलेला कथित ‘फेक नरेटिव्ह’ भारतीय जनता पक्षाच्या तात्काळ आणि सक्रिय हस्तक्षेपामुळे फोल ठरला आहे. मतदारांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केल्याचा आरोप भाजपने केला आहे. निवडणूक आयोगाच्या तांत्रिक चुकीमुळे प्रभाग क्र. १२ मधील यादी भाग क्र. ७ हा प्रभाग १ मध्ये जोडला गेला होता. या चुकीकडे सर्वप्रथम लक्ष वेधणारे माजी नगरसेवक शांताराम भालेकर होते. मात्र, शहरभरात मतदार याद्यांतील विसंगती सर्वत्र झाली असताना ही एक तांत्रिक चूक असल्याचे स्पष्ट असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी त्याला राजकीय वळण देत भाजपवर संगनमताचे आरोप केले. विशेष…

Read More