- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)च्या वतीने भारतीय संविधान दिनाच्या ७५ व्या अमृत महोत्सानिमित्ताने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी येथे पुष्पहार अर्पण करून तसेच २६/११ हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहून सामूहिक संविधान प्रस्तावना वाचन व अभिवादन शहराध्यक्ष, माजी महापौर योगेश बहल यांच्या मार्गदर्शनाने पिंपरी येथील मध्यवर्ती पक्ष कार्यालय करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल, ॲड. गोरक्ष लोखंडे, कार्याध्यक्ष विजय लोखंडे, जितेंद्र ननावरे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल, सामाजिक न्याय महिला अध्यक्षा गंगा धेंडे, प्रदेश सरचिटणीस शोभा पगारे, कामगार सेल अध्यक्ष युवराज पवार, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगिता कोकणे, मिरा कदम, वैद्यकिय सेल…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीसंदर्भातील सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. तांत्रिक कारणांमुळे पूर्वनिश्चित तारखांमध्ये बदल करण्यात आला असून, नवीन सुधारित वेळापत्रकानुसार विविध टप्प्यांच्या अंतिम तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ही माहिती राज्य निवडणूक आयोगाने ई-मेलद्वारे सर्व महापालिका आयुक्तांना कळवली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार यादीवरील हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख आता २७ नोव्हेंबर ऐवजी ०३ डिसेंबर २०२५ करण्यात आली आहे. हरकतीवरील निर्णय घेऊन अंतिम यादी प्रकाशित करण्याची तारीख ०५ ऐवजी १० डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिद्धी ०८ ऐवजी १५ डिसेंबर २०२५ रोजी केली…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्र. 26 मध्ये दुसऱ्या प्रभागातील मतदारांची नावं दाखल झाल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले! पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आली आहे. इतर प्रभागांमध्ये नोंद असलेले अनेक मतदार प्रभाग क्रमांक २६ मध्ये चुकीने समाविष्ट झाल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. ही चूक निवडणूक प्रक्रियेतील आवश्यक संवेदनशीलतेचा अभाव आणि प्रशासनातील अनियमितता स्पष्ट करणारी आहे. या गंभीर मुद्द्यावर आम आदमी पार्टी पिंपरी–चिंचवडचे शहराध्यक्ष श्री. रविराज बबन काळे यांनी कठोर भूमिका घेत, प्रशासनाकडे तातडीने स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं की, “मतदारसंख्येतील असा गोंधळ ही केवळ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने आणि दुर्गाताई निरंजन ठोकळ व सनराईस मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी ( दि. २९ नोव्हेंबर) दापोडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या महाशिबिरात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित रुग्णालये आणि डॉक्टर्स एकत्रित येणार असल्याने खऱ्या अर्थाने हे शिबीर आरोग्यसेवेचा ‘महाकुंभमेळा’ ठरणार आहे. या महाआरोग्य शिबिरात सर्व मोफत वैद्यकीय तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया तसेच दिव्यांगांसाठी मोफत साहित्य वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या शिबिराचे वैशिष्टय म्हणजे या शिबिरात महिलांसाठी ८७ रक्त तपासण्या पूर्णतः मोफत करण्यात येणार आहे. यामध्ये बाहेर ज्या चाचण्यांना सुमारे १५…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या मुंबई बंगळुरू महामार्गावरील महत्त्वाच्या टप्प्यातील वाकड, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, रावेत आणि किवळे परिसरातील सेवा रस्त्यांच्या कामांसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. या पार्श्वभूमीवर देहूरोड ते खेड शिवापुर टोलनाका या सेवा रस्त्याच्या अंतर्गत तब्बल 321 कोटींचे कामाला केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी मंजूरी दिली. यानंतर आमदार शंकर जगताप यांनी या सेवा रस्त्यावरील प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा धडाका लावला आहे. याच अंतर्गत पुनावळे , ताथवडे या भागातील डांबरीकरणाची कामे पूर्ण झाली असून थेट भुमकर चौकापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. या कामांची सातत्याने पाहणी सुरू असून, वेळोवेळी आमदार जगताप…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड शहरातील प्रारूप मतदार यादीत झालेल्या त्रुटी, चुकीची स्थलांतरे, आणि माहिती अभावामुळे नागरिकांत मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर भाजप पिंपरी–चिंचवड शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांनी मंगळवारी म्हणजे कालच राज्य निवडणूक आयोगाला लेखी निवेदन देत—हरकती दाखल करण्यासाठीची अंतिम मुदत वाढवावी, अशी ठाम मागणी केली होती. या मागणीची राज्य निवडणूक आयोगाने सकारात्मक दखल घेत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला असून, हरकती दाखल करण्याची मुदत आता ३ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या निर्णयाला शहरातून मोठा प्रतिसाद मिळत असून, नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले की, “लोकशाहीतील सर्वात मोठी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणूक विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवरून आरोप–प्रत्यारोपांना उधाण आले आहे. याद्यांमधील त्रुटींवरून सोमवारी झालेल्या बैठकीत महानगर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांना फैलावर घेत कठोर शब्दांत झापले. “गांजा पिऊन की झोपा घेऊन या याद्या तयार केल्या आहेत?” अशा शब्दांत आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सुनावल्याची माहिती बैठकीतील एका अधिकाऱ्याने दिली. महानगर पालिकेच्या निवडणूक विभागाने अलीकडेच प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या. मात्र, या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका आणि त्रुटी असल्याचे सातत्याने आरोप होत आहे. तरीही निवडणूक विभाग शांत असल्याने सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही नाराजीला ऊत आला आहे. त्यावर सोमवारी आयुक्त श्रावण…
भारतीय संविधानाने दिला प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा अधिकार – अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय संविधानामळे आपल्या देशातील नागरिकांना न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांची हमी देणारा अमूल्य ठेवा दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेले संविधान प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा अधिकार तर देतेच, त्याचबरोबर अधिकार व कर्तव्यांची जाणीवही करून देते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनही याच संविधानिक मूल्यांनुसार पारदर्शक, जबाबदार आणि लोकाभिमुख कामकाज करण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले. भारतीय संविधान दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA) मुख्यालय आकुर्डी येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रनिष्ठा आणि संविधान मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेतली. दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो. 1949 साली याच दिवशी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर पीएमआरडीएत आयोजित कार्यक्रमास सह-आयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात सह-आयुक्त दीप्ती सूर्यवंशी, सह-आयुक्त हिम्मत खराडे, उपायुक्त राजेश माशेरे आदी मान्यवरांचीही प्रमुख उपस्थिती होती. संविधानातील मूल्ये आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचे आवाहन यावेळी…
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंजवडी, वाघोली, शिक्रापूर येथील वाहतूककोंडी रोखण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)कडून निर्णायक पाऊल उचलण्यात आले असून, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सूचनांनुसार, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी आज (दि.26) आकुर्डी येथील मुख्यालयात विभाग प्रमुखांसह महसूल, पोलिस,एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह सर्व विभागांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला हिंजवडी, वाघोली येथील नागरिकांनीदेखील उपस्थित राहून सूचना मांडल्या. बैठकीत प्रामुख्याने, 5 डिसेंबरपूर्वी खड्डेविरहित रस्ते करण्याच्या सूचना डॉ. म्हसे यांनी दिल्या असून, हिंजवडी येथील प्रस्तावित रस्ते तसेच अस्तित्वातील रस्त्यांच्या भूसंपादनाबाबत आढावा घेण्यात आला. हिंजवडी – पिरंगुट – घोटावडे राजमार्गामधील हिंजवडी फेज- 1 ते हिंजवडी फेज-…
