Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपाचे प्रखर हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळख असलेले आमदार महेश लांडगे यांची ओळख महाराष्ट्रभरात पोहोचली आहे. किंबहुना, सर्वसमावेशक हिंदूत्व आणि पिंपरी-चिंचवडमधील 2014 पासून राबवलेले विकास प्रकल्प याची सांगड घालत त्यांनी ‘‘विकासाभिमूख हिंदूत्व’’ अशी ‘पॉलिटिकल लाईन’ त्यांनी निश्चित केली आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडून आलेले आमदार महेश लांडगे यांनी सुरूवातीला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपाचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले. त्यानंतर 2017 च्या महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. ‘व्हीजन-2020’ ची घोषणा करीत त्यांनी 2019 ची विधानसभा आणि त्यानंतर 2024 ची निवडणूक भाजपाकडून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. निवडणुकीतील ५० टक्के आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार आहेत. सुप्रीम कार्टात २१ जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. हे प्रकरण आता जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रथम तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, नगरपालिका (MCs) आणि नगर पंचायती (NPs) यांच्या निवडणुका जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार होऊ शकतात. मात्र, ज्या 40 नगरपालिका आणि 17 नगर पंचायतींमध्ये आरक्षण 50% पेक्षा जास्त आहे, त्यांच्या निवडणूक निकालांना या प्रकरणाच्या अंतिम निर्णयाचे अधीन राहावे लागेल, असंही कोर्टाने…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिका, समाज विकास विभाग, लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन आणि इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्हज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड ऑटो क्लस्टर येथे मोफत भव्य रोजगार मेळावा दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात शहरातील विविध औद्योगिक कंपन्या सहभागी होणार असून युवक–युवतींना एकाच ठिकाणी विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तरी जास्तीत जास्त युवक-युवतींनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. रोजगार मेळाव्यात रिटेल, लॉजिस्टिक्स, ऑटोमोटिव्ह, कन्स्ट्रक्शन, एज्युकेशन अँड ट्रेनिंग, मीडिया अँड एंटरटेनमेंट, इलेक्ट्रॉनिक्स अँड हार्डवेअर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (ITES), हेल्थकेअर आणि फार्मास्युटिकल्स आदी क्षेत्रांतील विविध…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना युवा नेते राजेंद्र तरस यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि.२९ रोजी प्रभाग क्र.१६ किवळे, रावेत, मामुर्डी, साईनगर, विकास नगर, गुरुद्वारा, वाल्हेकरवाडी परिसरातील महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रथम क्रमांकाच्या विजेत्या महिलेला ‘फोर व्हीलर कार’ बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, २९ नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता मुकाई चौक, किवळे गुप्ता मैदान येथे पार पडणार आहे. युवानेते राजेंद्र बाळासाहेब तरस यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला असून ऐश्वर्या राजेंद्र तरस सोशल फाउंडेशनच्या वतीने या स्त्री सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडकरासंह तमाम वारकरी सांप्रदायामध्ये श्रद्धेचे स्थान असलेली इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला चालना मिळाली असून, महानगरपालिका प्रशासनाने निविदा प्रसिद्ध केली आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी ‘व्हीजन-2020’ या अभियानामध्ये ‘नमामी इंद्रायणी’ प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर 2019 व 2024 च्या विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा चर्चेत राहिला. राज्य शासनाची पर्यावरण समिती आणि राज्य स्तरीय तांत्रिक समितीच्या मान्यतेसाठी हा प्रकल्प प्रलंबित होता. दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरण समितीची मान्यता घेण्यासाठी सकारात्मक सहकार्य केले. त्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य स्तरीय तांत्रिक समितीची मान्यता देण्यासाठी सर्वोतोपरी निर्णय घेतला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने आता निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी…

Read More

नवी दिल्ली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? जिथे आरक्षण मर्यादा ओलांडली गेली अशा नगरपरिषद, नगरपंचायतींबद्दल काय निकाल दिला जातो, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांबद्दल शुक्रवारच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय निर्देश देणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणच्या निवडणुका रद्दही केल्या जाऊ शकतात, असे संकेत मंगळवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दिले होते. तसेच याबद्दलची आकडेवारी शुक्रवारी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल व महर्षी विद्यामंदिर रहाटणी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात मुख्य अतिथी, संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार व धर्मराज पाल सर यांच्या  हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.         या वेळी उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, महर्षीविद्यामंदिरच्या उपमुख्यध्यापिका  श्वेता साहू , राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अरुण तांबे, पोलिस निरीक्षक सुरेश भालेराव, काळेवाडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शंकर पारधी, वीर संभाजी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश उंदिरवाडे(बोधी), पुरुषोत्तम गाणार, आनंद बौद्ध बिहारचे महादेव कांबळे, बंशी शिंदे,  भारतीय दलीत पँथरचे बाळासाहेब शेंडगे ,सामाजिक कार्यकर्ते राजन नायर, युवराज प्रगने, सुधीर दुधमल, हर्षवर्धन कांबळे, ,शशिकांत शेलार,रामनाथ उगले,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समर्थ युवा प्रतिष्ठान अध्यक्ष राजेश पांडे यांच्या सहकार्यातून भाजपच्या अनिता संदीप काटे आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांच्या वतीने पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ येथे महिलांसाठी दोन दिवसीय मोफत आरोग्य व कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. हे शिबिर बुधवार (दि. २६) आणि गुरुवार (दि. २७) रोजी चॅलेंजर पब्लिक स्कूल, शिवसाई लेन येथे पार पडले. शिबिरात स्त्रियांसाठी आवश्यक असलेल्या मॅमोग्राफी, सीबीसी, ब्लड शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल तपासणी, तसेच डोळ्यांची तपासणी व मोफत चष्मा वाटप करण्यात आले. याशिवाय तब्बल ₹९,५०० किमतीच्या तपासण्या पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्याने प्रभागातील…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत गेल्या अनेक वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणावर नवीन विद्युत पोल बसविण्यात आले आहेत, यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र, अद्याप वापरात असलेले पोल अस्तित्वात असूनही पुन्हा नव्याने पोल बसविण्याचा घाट घालण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मागील दहा वर्षात केलेल्या कामांची विद्युत विभागाने श्वेतपत्रीका प्रसिद्ध करावी, अशी मागणी शिवसेना चिंचवड विधानसभा शहर संघटक तथा पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष रमाकांत सौंदणकर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात सौंदणकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात महानगरपालिका व स्मार्ट सिटी मिशन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजप आणि रिबप्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) सोबत लढणार आहेत. मात्र, प्रभागामध्ये मतदारसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे आरपीआयचे कार्यकर्ते तसेच चिन्ह पोहचवताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे भाजपच्या पक्षचिन्हावर आरपीआय महापालिकेच्या जागा लढणार आहे. तसेच या निवडणुकीसाठी भाजपाकडे १५ जागांची मागणी केली असल्याचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी बुधवारी (दि.२६) पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कुणाल वाव्हळकर म्हणाले, युतीसंदर्भात भाजपाने प्रस्ताव दिला आहे. त्यांच्याकडे आम्ही १५ जागांची मागणी केली आहे. अनूसुचित जातीची लोकसंख्या ज्या प्रभागात जास्त आहे त्या प्रभागांमध्ये…

Read More