- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी – चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर प्रचंड हरकती व आक्षेप नोंदविले जात असून, यादीतील मोठ्या प्रमाणातील चुका उघडकीस येत आहेत. २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीत अनेक मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात दिसून येणे, काही प्रभागातील तर यादी भागच दुसऱ्या प्रभागात समाविष्ट होणे, माजी नगरसेवकांची नावे वगळली जाणे, तसेच दुबार नोंदी असे अनेक त्रुटींचे मोठे प्रमाण आढळून आले आहे. शनिवारी (दि. २९) एका दिवसात तब्बल ४५६ हरकती दाखल झाल्या असून, आजवर एकूण ५,४०१ हरकती, सूचना आणि आक्षेप प्राप्त झाले आहेत. राजकीय पक्ष, पदाधिकारी, माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार तसेच नागरिकांकडून या त्रुटींवर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समाजातील प्रत्येकाला सर्वत्र समान वागणूक, समान शिक्षण हा विचार घेऊन महात्मा जोतीराव फुले यांनी आयुष्यभर कार्य केले तर त्यांच्या या विचारधारेचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. महात्मा फुले यांचा सर्वांना समान संधीचा, समान शिक्षणाचा विचार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात मांडला असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विद्यापीठ अनुदान आयोग माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिनानिमित्त एक दिवसीय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळच्या सत्रातील व्याखानात ‘महात्मा फुले यांचे शैक्षणिक धोरण आणि सामाजिक क्रांती’ या विषयावर डॉ.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महानगरपालिका सेवेत वर्षानुवर्षे उत्तमरित्या सेवा करून सेवानिवृत्त होणारे आपल्या सहकारी अधिकारी,कर्मचारी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत आपल्या कार्याचा प्रत्यय दिला आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले आणि सेवानिवृत्त होणा-या अधिकारी,कर्मचा-यांना पुढील वाटचालीसाठी आरोग्यदायी शुभेच्छाही दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत मधुकर पवळे सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात माहे नोव्हेंबर २०२५ अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या १७ तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ८ अशा एकूण २५ कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होते. या कार्यक्रमास सह आयुक्त मनोज लोणकर, कार्यकारी अभियंता…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत हेमंतकुमार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित ‘द सोलफुल मेलोडिज ऑफ हेमंतकुमार’ या अवीट गोडीच्या हिंदी – मराठी गीतांच्या सुरेल नि:शुल्क सांगीतिक मैफलीत (बुधवार, दिनांक २६ नोव्हेंबर ) निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर प्रेक्षागृहात श्रोते मंत्रमुग्ध झाले. राखी झोपे यांची संकल्पना आणि अनिल झोपे यांच्या संयोजनातून साकार झालेल्या या सांगीतिक मैफलीत माजी उपमहापौर शैलजा मोरे, सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार, उद्योजक शंकर गावडे आणि विनीत राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. राजकुमार सुठंवाल, आशुतोष ठाकूर, मंगेश उमराणी, सुकेतू शाह, संजीव रानडे, सागर पाटील, दत्तात्रय कुंभार, उमेश घाणेकर, अनिल झोपे या गायकांसह स्वाती केसकर, नम्रता सारडा, नयना…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रहाटणी येथील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस प्रमुख पाहुणे उर्मिला ठोंबरे व डिंपल काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत सर, तसेच शिक्षक व शिक्षिकेत्तर कर्मचारी विद्यार्थी- पालक उपस्थित होते. यावेळी शिक्षकांनी ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत प्रमुख पाहुणे उर्मिला ठोंबरे अशा म्हणाल्या, देशाच्या आणि मानवाच्या सर्वांगिन प्रगती साठी शिक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. ज्योतिबाच्या अनेक पैलूंवर , शर्वरी काटे, या विद्यार्थिनी विद्यार्थिनींने…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्था चालवताना येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनतर्फे रविवारी 30 नोव्हेंबर रोजी “सहकार संवाद कार्यक्रम” आयोजित केला आहे. शहरात सात हजार सहकारी गृहनिर्माण संस्था असून, अनेक कार्यकारी मंडळातील सदस्यांना सहकारी गृहरचना संस्था अधिनियम 1960, 1961 आणि त्याच्या उपविधींची माहिती नसते. त्यामुळे वार्षिक सर्वसाधारण सभा, ताळेबंद सादरीकरण, देखभाल खर्च वसुली, कन्व्हेन्स डिड, शेअर सर्टिफिकेट, सदस्यत्व आणि निवडणूक प्रक्रियेत अनेक चुका होत असून, यामुळे वाद निर्माण होतात. या कार्यक्रमात सहकारी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती उपस्थित राहून आदर्श उपविधी, ऑडिट, कर नियम, थकबाकी वसुली, सदस्य आणि कार्यकारी मंडळाच्या कर्तव्यांची सविस्तर माहिती देतील. कार्यक्रमास…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांसोबत रंगकाम करण्याचा अनुभव म्हणजे जणू पुन्हा शाळेच्या दिवसांत परत गेल्यासारखे वाटले. मुलांचा उत्साह, त्यांची निरागस कल्पनाशक्ती पाहताना माझ्याही शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या. इतक्या मनापासून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत भिंती रंगवण्याचा हा क्षण खरोखरच खास आणि स्मरणीय ठरला असे मत अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा प्रशिक्षण व अध्ययन संस्था (DIET) यांच्या संयुक्त विद्यमाने भवानीपेठ येथे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भित्तीचित्र सादरीकरण झाले. या भित्तीचित्र पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर बोलत होत्या. यावेळी शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. प्रभाकर क्षीरसागर, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक अरुण जाधव,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका , औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला), कासारवाडी येथे भारतीय संविधान दिन अत्यंत उत्साहाने व आदरपूर्वक साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाचे महत्व आणि त्यामागील उदात्त विचार प्रशिक्षणार्थीनीं पर्यंत पोहोचवणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या प्राचार्य श्री. सोनवणे ज्योत हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यानंतर संस्थेच्या प्रशिक्षणार्थी अमृता आरणे हिच्या नेतृत्वाखाली सर्व उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (Preamble) सामूहिक वाचन केले. प्रशिक्षणार्थी अमृता कागळे हिने यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना संविधानातील समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूलभूत तत्त्वांवर सखोल विचार मांडले. त्यांनी आपल्या ओजस्वी भाषणातून…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा मतदार संघातील पिंपळे गुरव येथील कल्पतरू सोसायटी येथे अंडरपास आणि काळेवाडी येथील एम. के. चौक येथे ग्रेड सेपरेटर तयार करून या भागामध्ये वाहतूक सुविधा सक्षम करणे गरजेचे आहे. या रस्त्यांचा आराखडा, आवश्यक भूसंपादन आणि विविध कामांच्या अनुषंगाने शुक्रवारी (दि . 28) आमदार शंकर जगताप यांची महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याबरोबर बैठक पार पडली. आगामी काळात हे अंडरपास, ग्रेड सेपरेटर आणि उड्डाणपूल प्राधान्याने पूर्ण करावे. तसेच या भागातील मिसिंग लिंक जोडून नागरिकांना पर्यायी वाहतूक रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. दरम्यान यावेळी पवना सुधार प्रकल्प, उड्डाणपूल, अंडरपास यांसाठी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा झाला. राजकीय, सामाजिक, व्यापारी, क्रीडा अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनी व सोशल मीडियावरून भरभरून शुभेच्छा दिल्या. सर्वदूर कौतुक होत असलेल्या त्यांच्या जनसेवेची दखल घेत नागरिकांनीही मोठ्या प्रेमाने शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला. शेकडो नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली, तर अनेक तरुणांनी उत्साहाने रक्तदान केले. यानिमित्ताने चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप, मा. सत्तारूढ पक्षनेता नामदेव ढाके, मा. नगरसेविका सविता खुळे, मा. नगरसेवक चंद्रकांत नखाते, अभिषेक बारणे, विनायक गायकवाड, संतोष कांबळे, मा. स्वीकृत सदस्य…
