Author: maharashtrabreakingnews.com

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवरील ‘हॉटेल रंगला पंजाब’ रेस्टॉरंटच्या खालच्या मजल्यावर आज अचानक आग लागली. परिसरात धुराचे लोट दिसू लागताच नागरिकांनी घाबरून खबरदारी घेतली. घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि युथ फाऊंडेशनचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी पोहोचले. कार्यकर्त्यांनी त्वरित अग्निशामक दलाशी संपर्क साधून आग विझवण्याची मदत मागवली. नगरसेवक काटे यांनी स्वतःही परिस्थितीचा आढावा घेत संबंधित यंत्रणांशी समन्वय साधला आणि आवश्यक ती तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचताच आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू केले. त्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरून गंभीर नुकसान होण्यापासून बचाव झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग  न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभाग आणि लाइट हाऊस कम्युनिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन (सीएचडीसी) उपक्रमांतर्गत युवक-युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे करण्यात आले होते. या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त ममता शिंदे यांच्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात ५० हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेत १ हजारपेक्षा अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या. यामध्ये फिल्ड ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह, इंजिनिअरिंग, अकाउंट्स, कस्टमर सर्व्हिस, सेल्स प्रतिनिधी अशा विविध पदांचा समावेश होता. या मेळाव्यात १०वी,…

Read More

पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव येथील महत्त्वाचा चौक असलेल्या सृष्टी चौकात नित्याची वाहतूक कोंडी व अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, या चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी पिंपळे गुरव प्रभाग २९ मधील मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांनी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात अरुण पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपळे गुरव येथील तुळजाभवानी मंदिर ते वाकड-भोसरी बीआरटीएस रस्त्या दरम्यान असलेल्या सृष्टी चौकात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांना अवघ्या पाचशे मीटर अंतरासाठी तब्बल एक ते दीड तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. या…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – बालदिनाचे औचित्य साधून स्वरोपासना म्युझिक अकॅडमी प्रस्तुत ‘गीत फुलोरा’ या गेय कवितांच्या कार्यक्रमाला रहाटणी येथील एस एन बी पी इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुख्याध्यापिका जयश्री वेंकटरामन, उपमुख्याध्यापिका लक्ष्मी जी, मधुमिता देव, हेमराज थापा, विजय नेलगे, सोनल श्रीवास्तव यांच्यासह विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभाग घेतला होता. स्वरोपासनाच्या वाकड कस्पटेवस्ती तसेच पुनावळे काटेवस्ती या शाखांमधील संगीत शिकणारे ओंकार कुलकर्णी, आर्यन पावसे, प्रिया जोशी, वीरा सुरते, राजश्री पटेल, अश्वि नाकाडे या विद्यार्थ्यांनी अभयार्पिता निर्मित ‘गीत फुलोरा’ या गेय मराठी कवितांचे सादरीकरण केले. यामध्ये ‘शाळा’ , ‘माझ्या मराठीची गोडी’ , ‘आई’ , ‘चांदोमामा’ , ‘आर्जव’ , ‘पाहुणचार’ ,…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘साहित्य हे दुःख कमी करण्याचे साधन आहे!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक राज आहेरराव यांनी  थेरगाव येथे व्यक्त केले. संवाद व्यासपीठ आयोजित लेखक – वाचक संवाद मेळाव्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना राज आहेरराव बोलत होते. ज्येष्ठ लेखिका मानसी चिटणीस, लेखक प्रकाश निर्मळ, प्रा. संजय पवार, सामाजिक कार्यकर्त्या करिष्मा बारणे, संवाद व्यासपीठचे संस्थापक – अध्यक्ष हरीश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राज आहेरराव पुढे म्हणाले की, ‘ज्यांना जे जे शक्य आहे ते ते त्यांनी वाचावे; कारण त्यामुळे दुःखावर मात करता येते. संतसाहित्याचे मूळ गीतेत आहे. संस्कृत गीतेचे प्राकृत रूपांतर करीत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सिद्ध केला;…

Read More

वाकड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड शहर वासियांसाठी माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्या संकल्पनेतून आयोजित ‘दीपोत्सव विशेष गडकिल्ले बांधणी स्पर्धे’चा बक्षीस वितरण सोहळा शनिवारी (ता. २९) वाकड येथे अत्यंत दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करणाऱ्या बालगोपाळांनी या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला होता. सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरला तो ‘जय जय शंकर’ फेम बालकलाकार आरुष बेडेकर. ज्येष्ठ पत्रकार डॉ. विश्वास मोरे, उद्योजक सुमित बाबर, किरण वडगामा, प्रशांत विनोदे, संतोष कलाटे, अजय कलाटे, निखिल कलाटे, बाळकृष्ण कलाटे, अक्षय जमदाडे, गिरीश शेडगे, तेजस माझिरे, शिवाजी कटके, युवराज सायकर, दिनेश वाजे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रगीताने सुरुवात झाली. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च येथील मुलींच्या संघाने इंटर कॉलेज बॉल बॅडमिंटन (मुली) स्पर्धा या विभागीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवला.     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च यांच्या वतीने रावेत येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन (मुली) स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत अंतिम सामन्यात हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयाने पीसीसीओईआर च्या संघास पहिल्या फेरीत ३५ – २३ आणि दुसऱ्या फेरीत ३५ – २० असा सरळ सेट…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि मराठी भाषा संवर्धन समिती पिंपरी चिंचवड यांच्या वतीने “पिंपरी चिंचवड वैभव” काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा बुधवारी (दि.३ डिसेंबर) सायंकाळी पाच वाजता, निगडी प्राधिकरण येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शांता शेळके सभागृह, संत तुकाराम संकुल, (सावली हॉटेल जवळ) येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती या काव्य संग्रहाची संकल्पना मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक संभाजी बारणे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, पद्मश्री गिरीश प्रभुणे, अखिल भारतीय मराठी साहित्य…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेने शहर स्वच्छतेसाठी घेतलेल्या कठोर भूमिकेअंतर्गत सार्वजनिक स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई सुरू ठेवली आहे. आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात नोव्हेंबर महिन्यात एकूण २८ लाख १२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय रुजावी तसेच, स्वच्छता विषयक नियमांचे पालन व्हावे यानुषंगाने ही कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहायक आयुक्त अमित पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली. शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी बनवण्यासाठी जनजागृतीबरोबरच दंडात्मक कारवाई सातत्याने सुरू असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. या…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  “संतांनी आपाल्या विचारांनी नांगरलेल्या भूमीत आपण राहतो, हे आपले परम भाग्य आहे. अन्याय, अनीती, अधर्म, अनाचार यांवर मात करण्याची प्रेरणा संतसाहित्यातून आपल्याला मिळते. मनामनात साठलेली अविवेकाची काजळी दूर केल्यास समाज विवेकशील बनतो. विवेकशील समाजालाच सुदृढ समाज म्हटले पाहिजे. ज्ञानेश्वर , तुकाराम, एकनाथ, नामदेव आदी संतांनी उत्तम जगण्याचा मार्ग दाखविला , तो आजच्या काळातही दिशादर्शक आहे. संतांनी समाजाला विवेकवाद शिकवला…” असे प्रतिपादन जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी केले आहे. चिंचवड च्या संभाजीनगर येथील श्री दत्त मंदिरामध्ये गुरुदत्त सेवा मंडळाच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ते बोलत होते. ज्ञानेश्वरी च्या चौथ्या अध्यायातील “मी अविवेकाची काजळी। फेडोनी…

Read More