- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- “धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हे पावित्र्यावर आघात असून दोन समाजांत तणाव निर्माण करण्याचे धोकादायक कारण ठरू शकते. हिंदू मंदिरांच्या जागांवर तसेच परिसरात झालेले अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही,” अशा स्पष्ट शब्दांत राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाला कठोर कारवाईचे निर्देश दिले. श्रीमन महासाधू मोरया गोसावी महाराजांच्या 464 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीरंग बारणे होते. आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी…
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ मधील भाजपच्या इच्छुक उमेदवार अनिता संदीप काटे यांनी सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांच्या सोबत विविध सोसायट्यांमध्ये भेट देत नागरिकांसोबत संवाद साधला. या संवाद दौऱ्यात स्थानिक प्रश्न, सुविधा आणि प्रभागातील अडचणी याबाबत रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात आपली मते व्यक्त केली. दौऱ्यात प्रमुखत्वाने पाणीपुरवठ्याची समस्या, वारंवार खंडित होणारी ड्रेनेज लाईन, वाहतूक कोंडी निर्माण करणारी अपुरी पार्किंग सोय, निकृष्ट किंवा बंद पडलेल्या स्ट्रीटलाईट्स तसेच कंपाउंड व सोलर यांसारख्या मूलभूत सुविधा यावर चर्चा झाली. अनेक सोसायट्यांमध्ये पाणीप्रश्न गंभीर असून नागरिकांना पर्यायी सोयींचा अवलंब करावा लागत आहे. नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष देत अनिताताई…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रुपीनगरमध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री दत्त जयंती सोहळा भक्तांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात उत्साहाने साजरा करण्यात आला. रुपी सहकारी गृहरचना संस्था मर्या. रुपीनगर श्रीदत्त जयंती सोहळा – वर्षे 40, शुक्रवार दि. 28 नोव्हेंबर ते 5 जाने. 2025 आयोजित श्री गुरुचरित्र पारायण आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह यामध्ये अनेक भक्तांनी सहभाग घेतला. श्री दत्त जयंती सोहळ्यानिमित्त कलश पूजन अभिषेक, दत्तत्याग महायज्ञ, महिला मंडळाचे भजन, नामांकित कीर्तनकारांची कीर्तन सेवा, माता पिता वारकरी गुरुकुल विद्यार्थ्यांचा भारुडाचा कार्यक्रम, भव्य पालखी प्रदक्षिणा, पावली- खेळ, काल्याचे कीर्तन आणि शेवट महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी विविध…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बारामती आणि इंदापूर मतदारसंघातील मतदार यादीतील गंभीर त्रुटी, नागरिकांची नावे विनाकारण वगळणे तसेच स्थलांतराच्या चुकीच्या नोंदींमुळे सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीची दखल घेत आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांची विशेष भेट घेण्यात आली. या प्रतिनिधी मंडळात पिंपरी–चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्यासह मतदार यादीतून नावे वगळलेल्या राबिया शेख आणि युनूस शेख यांचा समावेश होता. शहरातील मतदार नोंदणी प्रक्रियेत दिसून येणारी गंभीर अनियमितता, नव्या नोंदणीतील विलंब तसेच नागरिकांची नावे अचानक इतर मतदारसंघात टाकल्याची प्रकरणे याबाबत सविस्तर माहिती पवार साहेबांसमोर मांडण्यात आली. नेत्यांनी या प्रकरणाचा गंभीरपणे विचार करून संबंधित प्रशासनाकडून तात्काळ…
– उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनंतर भाजपा इच्छुकांची अक्षरश: झुंबड पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आगामी निवडणुकीचे बिगुल वाजले असून, आता भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. अवघ्या दोन दिवसांत पक्षाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयातून तब्बल 415 हून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुकांची सर्वाधिक पसंती ‘कमळ’ आहे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपा नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळे सौदागर येथे आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर भाजपाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी पक्षाच्या कार्यालयातून अर्ज घ्यावेत. ते जमा करुन छाननी व पडताळणी करावी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरात निवडणूक तयारीला वेग देण्यास सुरुवात केली आहे. पक्षाच्या प्रदेशस्तरीय नेतृत्वाने काही दिवसांपूर्वी घोषित केलेल्या कोअर कमिटीची पहिली बैठक ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीनंतर बोलताना पानसरे म्हणाले, “कोअर कमिटीमार्फत आम्ही निवडणूक नियोजनाच्या घड्याळाला सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात पक्ष संघटनेतील इच्छुक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार असून, त्यानंतर पक्षाबाहेरील इच्छुकांचे अर्ज मागवले जातील. यासाठी विधानसभानिहाय दोन आणि शहर स्तरावर दोन असे प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहेत.” संकलित अर्जांच्या आधारे निवडणुकीची पुढील रूपरेषा ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवड…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्युज) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या कार्य, विचार आणि योगदानाचा गौरव करताना भारतीय संविधानाने देशाला दिलेल्या समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूल्यांचे जतन व अंमलबजावणी करणे हेच खरे अभिवादन ठरेल, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले. भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस तसेच भीमसृष्टी पिंपरी चौक, हिंदुस्थान अँटीबायोटीक्स कंपनी येथील पुतळ्यास महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय येथे राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले की, आज ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज हा देश एकसंघ आहे, त्यामुळे अनेक जाती धर्मांचे लोक गुणागोंविदाने एकत्र नांदताना दिसतात ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या भारतीय संविधाना मुळेच..! असे थोर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित दलितांचे कैवारी आणि ज्ञानाचा अथांग सागरास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हाच्यावतीने अभिवादन करतो. यावेळी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशातील विमान वाहतूक क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या गंभीर अव्यवस्थेमुळे प्रवाशांन मनस्ताप मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विमान उड्डाण रद्द होण्याचे प्रमाण वाढले असून विमानांची उड्डाणे १५ ते २० तासांनी होत आहेत, यात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. या अव्यवस्थेची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत केंद्रीय नागरिक उड्डानमंत्री राम मोहन नायडू यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, इंडिगोच्या मोठ्या प्रमाणावर विलंबित आणि रद्द झालेल्या उड्डाणांमुळे लाखो प्रवासी अडचणीत सापडले आहेत. या परिस्थितीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसह देशाच्या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याच्या नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील विविध कंपन्यांमध्ये होत असलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी लक्षवेधी सूचनांच्या माध्यमातून करणार आहे. याशिवाय पवना नदी सुधार प्रकल्प, अप्रशिक्षित वाहन चालकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सक्षम प्रशिक्षण प्रणाली उभारणे, उद्योग नगरीतील अघोषित भार नियमांवर उपाययोजना करणे, हिंजवडीमधील आयटीयन्सच्या विविध समस्यांवर परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी फास्टट्रॅक लेबर कोर्ट प्रणाली विकसित करणे तसेच हिंजवडीतील विविध समस्यांवर ”फास्टट्रॅक लेबर कोर्ट स्थापन करण्यासाठी शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. याशिवाय पिंपरी चिंचवड शहरासह राज्यातील 48 प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तारांकित प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्य म्हणजे विविध लक्षवेधींच्या माध्यमातून…
