- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सामाजिक समता व मानवतेचा संदेश देणारे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या आकुर्डी येथील मुख्यालयात आज (दि. ८ डिसेंबर) उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे, संचालक (विकास परवानगी) अविनाश पाटील, उपायुक्त (प्रशासन) राजेश माशेरे आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. श्रीमती रूपाली आवले-डंबे आणि अविनाश पाटील यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. समाजातील दुर्बल घटकांना आधार देत, समता, न्याय आणि सद्भावनेचा संदेश देणार्या संत जगनाडे महाराजांच्या कार्यावर यावेळी सहआयुक्त रूपाली आवले-डंबे यांनी भाष्य केले.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नेहरूनगर येथे अ.नगरचे खा मा.श्री निलेश लंके साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष रोहिणीताई खडसे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे राष्ट्रवादीचे नेते राहुल दादा कलाटे,सुलक्षणाताई शीलवंत, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, पुणे शहर महिला अध्यक्ष स्वाती पोकळे, पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, उद्योजक युनूस भाई शेख, अरुण पवार,मुनाफ भाई तरासगार,काँग्रेसचे चंद्रकांत लोंढे, माजी राज्यस्तरीय हॉकी खेळाडू अस्मा इमरान शेख. एडवोकेट संतोष शिंदे. परिसरातील ज्येष्ठ नागरिक अनिल चौधरी, मोहन ननवरे, बिबीशन पालखी, समाजसेविका माया सावंत. कुलदीप खरात उपस्थित होते. यावेळी बोलताना अ.नगरचे खासदार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सुरेश भट यांनी तन, मन, धन अर्पून मराठीत गझल चळवळ रुजवली; आणि त्यांच्या पश्चातही ही चळवळ वृद्धिंगत झाली!’ असे विचार ज्येष्ठ गझलकार बदीऊज्जमा बिराजदार उर्फ साबीर सोलापुरी यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, पिंपरी येथे (रविवार, दिनांक ०७ डिसेंबर) व्यक्त केले. गझलपुष्प कला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक संस्थेच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बदीऊज्जमा बिराजदार बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते संतोष कलाटे, उद्योजक सन्जॉय चौधरी, डॉ. अविनाश गारगोटे, रीमा शिशिर रंजन, ज्येष्ठ गझलकार प्रमोद खराडे, महाराष्ट्र पत्रकारसंघ प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, गझलपुष्पचे अध्यक्ष संदीप जाधव, सल्लागार नंदकुमार मुरडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी पंढरपूर येथील ज्येष्ठ गझलकार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निखळ मनोरंजनासह समाजाचे आरोग्य संवर्धन आणि सांस्कृतिक प्रबोधन करणाऱ्या नमस्कार फाउंडेशन आयोजित पाच दिवसीय नमस्कार महोत्सवाचा समारोप (रविवार, दिनांक ०७ डिसेंबर २०२५) उत्साहात करण्यात आला. निगडी प्राधिकरणातील नियोजित महापौर निवास मैदानावर आयोजित केलेल्या या महोत्सवात विविध प्रकारचा विनामूल्य आरोग्य सल्ला आणि सुविधांचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला. महोत्सवात रविवारी सादर करण्यात आलेल्या ‘हीच खरी फॅमिलीची गंमत आहे!’ या धमाल नि:शुल्क विनोदी नाटकाला थंडीचा कडाका असूनही रसिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली होती. एस. पी. क्रिएशन्स निर्मित आणि नवनीत प्रकाशित ‘हीच खरी फॅमिलीची गंमत आहे!’ या संतोष पवार लिखित आणि दिग्दर्शित नाटकात विसरभोळा बाप, ढालगज आई आणि…
दोन न्यायालयांसाठी आवश्यक 54 पदांना मंजुरी: अधिवेशनात पिंपरी-चिंचवडला मोठा दिलासा – आमदार शंकर जगताप
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पिंपरी चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय तसेच वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयांसाठी आवश्यक असणाऱ्या 54 पदांना मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयाचे स्वागत करत यामुळे पिंपरी-चिंचवड येथील प्रलंबित प्रकरणे जलद गतीने चालविणे सुलभ होईल व नागरिकांची व पक्षकारांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी म्हटले आहे. याबाबत आमदार शंकर जगताप यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर हे अतिशय वेगाने विकसित होत आहे. आज या शहराची लोकसंख्या 35 लाखाच्या उंबरठ्यावर आहे. चहुबाजूनी होत असलेला विकास आणि वाढते नागरीकरण यामुळे या शहरात स्वतंत्र जिल्हा व सत्र…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील नववीच्या २४८ विद्यार्थी व शिक्षकांना खडकवासला, पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी (एनडीए) च्या १४९ व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत समारंभास उपस्थित राहण्याची संधी मिळाली. डेप्युटी कंमांडण्ट ऑफ एनडीए व मुख्य प्रशिक्षक एअर वाईस मार्शल सरताज बेदी, कंमांडण्ट ऑफ एनडीए वाईस ऍडमिरल अनिल जग्गी, एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, समन्वयक वंदना सांगळे, पृथा वैद्य, प्रशासकीय व्यवस्थापक मनीष ढेकळे, एनडीएचे प्रशिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी व त्यांचे पालक आदी उपस्थित होते. यावेळी पासिंग आउट परेडचे उत्कृष्ट सादरीकरण झाले.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -विद्यार्थिनींनी प्रवास करत असताना, सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना स्वसंरक्षण याबाबत जागरूक राहिले पाहिजे. प्रत्येकीने आपल्या मोबाईल मध्ये सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाचा नंबर सेव्ह करून ठेवावा. रिक्षा, टॅक्सी सारख्या सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्याअगोदर ‘पॅनिक बटन’ कसे वापरावे हे समजून घ्यावे. वैयक्तिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर हक्क वापरा असे आवाहन ॲड.अक्षता नेटके यांनी केले. आहार आणि मानसिक स्वास्थ चांगले असल्यास करिअर वर लक्ष केंद्रित करता येते. आपला आहार उत्तम असेल तर रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी उपयोग होतो, असे मार्गदर्शन डॉ. मिताली मोरे यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम)…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आदर्श शिक्षिका सौ. जयश्री राजेंद्र घावटे (वय ५८ वर्षे) यांचे रविवार, दिनांक ०७ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. एक विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून त्यांचा लौकिक होता. महाराष्ट्र शिक्षक संघ, महाराष्ट्र औद्योगिक विकास परिषद, लायन्स क्लब आदी संस्थांनी त्यांचा आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरव केला होता. पिंपरी चिंचवड शहरातील मराठी माध्यमातील इंग्रजी शिक्षक संघाच्या त्या संस्थापक पदाधिकारी होत्या. इंग्रजी विषयात त्यांची विद्यार्थिनी शालांत परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आली होती. नुकतेच सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथून पर्यवेक्षिका या पदावरून सेवानिवृत्त झाल्या होत्या. ज्येष्ट व्याख्याते एन. के. उर्फ राजेंद्र घावटे यांच्या त्या पत्नी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि जलदिंडी प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून तसेच विलो मॅथर आणि प्लाट यांच्या अर्थसाहाय्याने ‘माझी नदी – माझी जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित नदी विषयक दालन (River Gallery) साकारण्यात आले आहे. या दालनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे सोमवार, दिनांक ०८ डिसेंबर २०२५ रोजी स. १०.३० वा. करण्यात येत आहे. या दालनात अप्पर भीमा बेसिनची माहिती, प्रमुख नद्या, पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणे, पवना नदीचे त्रिमितीय (3D) मॉडेल, पवना नदीचा इतिहास व भूगोल, पाण्याच्या गुणवत्तेचे मापदंड, जलशुद्धीकरण व सांडपाणी प्रक्रिया तंत्रज्ञान या विविध बाबींचे माहितीचे दालन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, नागरिकांनी नदी प्रदूषण…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -‘आजकाल माणसे हसायचे विसरली आहेत. खरं म्हणजे प्रत्येक गोष्टीत विनोद दडलेला असतो; परंतु तो शोधण्याची नजर मात्र आपल्याकडे हवी!’ असे विचार सुप्रसिद्ध एकपात्री हास्यकलाकार प्रा. अजितकुमार कोष्टी यांनी नियोजित महापौर निवासस्थान मैदान, निगडी प्राधिकरण येथे (शनिवार, दिनांक ०६ डिसेंबर)व्यक्त केले. नमस्कार फाउंडेशन आयोजित पाच दिवसीय नमस्कार महोत्सवात ‘हसवणूक’ हा हास्यविनोदाचा बहारदार कार्यक्रम सादर करीत असताना प्रा. अजितकुमार कोष्टी बोलत होते. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राहुल कलाटे, सलीम शिकलगार, अतुल भोंडवे, विजया जोशी आणि नमस्कार फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. अजितकुमार कोष्टी यांनी गण्या या काल्पनिक पात्राच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक विसंगती नमूद…
