- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांच्या साक्षीने प्रभाग क्रमांक ११ च्या इच्छुक उमेदवार सौ. निशा (निशाताई) दिनेश यादव यांच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण सोहळा आज उत्साहात पार पडला. इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी आयोजन केलेल्या या कार्यक्रमात स्थानिक महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. कुदळवाडी परिसरातील ग्रामस्थांनीही उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात श्री भैरवनाथ महाराजांच्या पूजनाने झाली. त्यानंतर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आणि पदाधिकाऱ्यांनी निशाताई यादव यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत त्यांचे स्वागत केले. दिनदर्शिकेमध्ये प्रभागातील उपयुक्त माहिती, सामाजिक उपक्रमांचे दर्शन आणि स्थानिक प्रश्नांवर प्रकाश टाकणारी माहिती समाविष्ट असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. निशा यादव…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक ११ मधील सेवाभावी कार्यासाठी ओळख असलेल्या इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निशा (निशाताई) यादव यांनी मंगळवारी (दि. 9) भारतीय जनता पक्षाकडून अधिकृतरित्या अर्ज जमा करून निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. पक्षाच्या स्थानिक कार्यालयात झालेल्या या प्रक्रियेला महिला कार्यकर्त्या, युवक आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी प्रभाग विकासाची ग्वाही दिली. निशा यादव या भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिनेश यादव यांच्या सौभाग्यवती असून, प्रभागातील स्वच्छता, महिला सक्षमीकरण, स्थानिक विकास, नागरिकांच्या अडचणी आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सातत्याने सक्रिय भूमिका बजावली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा अर्ज आज जमा केला. यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे,…
पुणे : ‘सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर’ ही प्रार्थना जनमानसात रूढ करणारे, समता-न्या-बंधुतेचा जागर करणारे, घराेघरी संविधान पाेहाेचवण्याचा संकल्प केलेले, कष्टकऱ्यांचे नेते, सर्वांचे लाडके बाबा अर्थात डाॅ. बाबासाहेब पांडुरंग आढाव (वय ९५) यांचे आज निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू हाेते. गेल्या बारा दिवसापासून पुना हॉस्पिटलमध्ये बाबा आढाव यांना रुग्णालयात दाखल केले होते. सुरुवातीला ते उपचारांना प्रतिसाद देत होते. त्यानंतर त्यांची किडनी फेल झाली. आज ८ वाजून २५ मिनिटांनी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झालं. उद्या सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे त्यांचं…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव येथील कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ पिंपरी चिंचवड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड यांच्या वतीने जगदगुरू व्दाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त करवीर पीठाचे पिठाधीश्वर शंकराचार्य स्वामी विद्यानृसिंह भारती महाराज यांच्या उपस्थितीत कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य अशा ७५ महाराजांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नवी सांगवीतील संस्कृती लॉन्स येथे आयोजित कार्यक्रमाचे उदघाट्न जगतगुरु श्रीमद् शंकराचार्य स्वामी विद्यानृसिंह भारती महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. लहवितकर महाराज यांना मानपत्र, दोन लाख एक्कावन हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. तत्पूर्वी, भागताचार्य ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे यांची कीर्तनसेवा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत एकूण १४ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या आहे. आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने आज डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात आज जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषविले. आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, इ, फ, ग या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे ३, ५,…
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शहरात एकूण १०५ प्राथमिक शाळा कार्यरत असून, त्यात मराठी माध्यमाच्या ८७, उर्दू माध्यमाच्या १४, हिंदी माध्यमाच्या २ आणि इंग्रजी माध्यमाच्या २ शाळांमध्ये कला शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि कला शिक्षणाद्वारे त्यांच्या सृजनशील विकासाला चालना मिळावी, या हेतूने महापालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मागील शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या ३४ शाळांमध्ये एकूण १७ कला शिक्षक कार्यरत होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे निरीक्षण करून आणि कला शिक्षणाला अधिक बळ देण्याच्या उद्देशाने, यंदा महापालिकेच्या शिक्षण विभागाने सर्व १०५ शाळांमध्ये कला शिक्षकांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांना गुणात्मक व सांस्कृतिक शिक्षण…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुका देखील जाहीर होतील अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. मागील काही दिवसांपूर्वी प्रदेश पातळीवरून निवडणुकीसाठी कोअर कमिटीची घोषणा करण्यात आली होती. यानंतर कमिटीची दोनच दिवसापूर्वी बैठक संपन्न झाली आणि आज पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी महिला संघटनेचा आढावा घेत निवडणुकीसाठीची मोर्चे बांधणी कशी आहे याची माहिती घेतली. महिला आघाडीच्या बैठकीत बोलताना रोहिणी खडसे यांनी सांगितले की, शरद पवार साहेबांनी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण मिळवून दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेने इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. इच्छुकांना आज (मंगळवार) पासून ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार असल्याची माहिती महानगरप्रमुख राजेश वाबळे यांनी दिली. २१ डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीची शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरु आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागनिहाय शिवसेनेचे काम सुरु आहे. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. महापालिका क्षेत्रातील ३२ प्रभागातील शिवसेना इच्छुक उमेदवारांनी https://www.shivsenapimprichinchwad.com यावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत. तर, ऑफलाइन पद्धतीनेही उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. वाल्हेकरवाडीतील जुना जकात नाका येथील पक्ष कार्यालयात अर्ज जमा करावेत, असे आवाहन महानगरप्रमुख राजेश वाबळे यांनी केले आहे.…
वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अभिराज फाउंडेशन वाकड या दिव्यांग मुलांच्या शाळेत मध्ये जागतिक मतिमंद दिन साजरा करण्यात आला. पूर्वी मतिमंद हा शब्द वापरला जात होता पण आता ‘दिव्यांग’ असे शब्द वापरले जातात कारण ते अधिक सन्माननीय आहे व दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार आता यांना बौद्धिक अक्षम (Intellectual disability )असे संबोधले जाते. या दिनाचे औचित्य साधून आज मुलांचे मनोरंजन खेळ घेण्यात आले तसेच करमणुकीचे व गाण्याचे कार्यक्रम घेतले त्यामध्ये मुलांनी खूप आनंद घेतला. तसेच शाळेतील शिक्षिका सौ वंजारी यांनी मुलांना टिफिन बॅक गिफ्ट दिल्या अशाप्रकारे आज अभिराज संस्थेमध्ये जागतिक मतिमंद ( बौद्धिक अक्षम ) पुनर्वसन दिन साजरा करण्यात…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ईश्वराने सर्व काही करण्याची प्रत्येकात ताकद दिली आहे ,तुम्ही स्वतःला काय समजता, आपल्या आवडत्या क्षेत्रात किती मेहनत घेता .त्यावर सर्व काही अवलंबून असते. प्राण्यांची बुद्धी कमी असते त्यांना खानपान समजते. ज्यांची कृती, विचार चांगला आहे .जो प्रामाणिक आहे .खोटे बोलत नाही. निस्वार्थ भावनेतून सेवाभाव करतो. स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचे नुकसान करत नाही. जो स्वार्थी नसतो तो चांगला माणूस असतो. पण खोटं काम करून फसवणूक करणारा द्रवरुपी अथवा समाजात , प्रतिष्ठा असणारा मग तो कितीही मोठा असला , तरी तो चांगला माणूस नसतो. तुम्हाला आपले जीवन कशासाठी आहे हे उमजले पाहिजे. इतरांसाठी निरपेक्ष भावनेने जे जे मदत…
