- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर आणि त्यांच्या भवितव्यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलून येणाऱ्या बलाढ्य उमेदवारांना तिकीट दिले जाते, मात्र वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जाते, अशी परखड टीका शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता यांनी केली आहे. विजय गुप्ता यांनी म्हटले आहे की, कार्यकर्ते रस्त्यावर उतरून प्रचार करतात, झेंडे लावतात, सभा-मेळावे घेतात, सतरंज्या उचलतात आणि पक्ष वाढवण्यासाठी स्वतःचे आयुष्य बाजूला ठेवतात. मात्र निवडणुकीच्या वेळी पक्ष त्यांच्या योगदानाचा विचार करत नाही. उलट, ऐनवेळी इतर पक्षांतून आलेल्या उमेदवारांना संधी दिली जाते. अशा परिस्थितीत निष्ठावान कार्यकर्त्यांनी नेमके काय करायचे,…
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर मोठा आणि निर्णायक बदल केला आहे. शिवसेनेचे चिंचवड शहर विधानसभा संघटक संतोष रमाकांत सौंदणकर यांची पुणे जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही नियुक्ती पक्षाच्या आगामी राजकीय रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. खा. श्रीरंग बारणे यांच्या चिंचवड येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात सौंदणकर यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेत्या सुलभाताई उबाळे, इरफानभाई सय्यद, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, जिल्हा संघटिका शैला भोंडवे, महानगरप्रमुख राजेश वाबळे, शहर प्रमुख निलेश तरस, शहर संघटिका सरिता साने, युवा सेना उप जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, माजी नगरसेविका…
पिंपळे निलख, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे निलख आणि विशाल नगर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आम आदमी पार्टीने प्रशासनासमोर सातत्याने आणि ठामपणे मांडला होता. आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहर आणि शहराध्यक्ष रविराज काळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दीड वर्षांपासून या भागात स्वतंत्र पोलीस चौकी उभारावी यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात येत होता. सुरुवातीला या संदर्भात मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्त यांना लेखी पत्रव्यवहार करून परिसरातील गंभीर परिस्थिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. मात्र, वारंवार पत्रव्यवहार करूनही या मागणीची दखल घेतली जात नसल्याने, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टी आणि शहराध्यक्ष रविराज काळे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला. या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, भयमुक्त आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, निवडणुकीचा प्रत्येक टप्पा अचूकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि तांत्रिक सुविधांचे चोखपणे नियोजन केले आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबतच आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी पोलीस प्रशासन आणि महापालिका यंत्रणेमध्ये समन्वय ठेवण्यात आला आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीपासून ते भरारी पथकांच्या तैनातीपर्यंतची सर्व तयारी पूर्ण झाली असून, लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन पूर्ण क्षमतेने सज्ज झाले आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंद्रायणी महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निशा दिनेश यादव यांनी भाजपाच्या पिंपरी चिंचवड कार्यालय, मोरवाडी येथे मुलाखत दिली. यावेळी भाजपाच्या ध्येयधोरणांची माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून तळागाळात काम करण्याचा आपला मानस असल्याचे निशा यादव यांनी व्यक्त केले. यावेळी पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख तथा आ. शंकर जगताप, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आ. महेश लांडगे, आ. अमित गोरखे तसेच शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी निशा यादव यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेतली. भाजप हा अनुशासनप्रिय पक्ष असून पक्षाच्या विचारधारेशी निष्ठावान राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची पक्षाला कायमच गरज असते, असे मत त्यांनी व्यक्त केले. संघटन व सामाजिक कामाची दखल… गेल्या अनेक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंचायत समिती मावळ अंतर्गत सुरू असलेल्या व प्रस्तावित विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला घेणारी महत्त्वपूर्ण बैठक आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीदरम्यान प्रशासन, विविध विभागांचे अधिकारी व ग्रामसेवक यांना उद्देशून आमदार शेळके यांनी स्पष्ट शब्दांत सूचना देत कामांमध्ये कोणतीही दिरंगाई, हलगर्जीपणा अथवा निकृष्ट दर्जा सहन केला जाणार नसल्याचे ठामपणे बजावले. जलजीवन मिशन अंतर्गत प्रलंबित असलेली सर्व अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या असून, ज्या ठेकेदारांविरोधात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्यांना काळ्यायादीत टाकून कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील मंजूर घरकुल योजनांच्या कामांना नियुक्त ठेकेदारांनी तात्काळ…
उमेदवारांच्या विक्रमी प्रतिसादामुळे भाजपची शहरातील ताकद आणि जनतेचा विश्वास स्पष्ट – आमदार शंकर जगताप
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली असून त्याचाच एक भाग म्हणजे शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात नुकत्याच पार पडल्या. इच्छुक उमेदवारांकडून आलेल्या विक्रमी प्रतिसादामुळे भाजपची शहरातील ताकद आणि जनतेचा विश्वास स्पष्टपणे दिसून आला असल्याचे पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. पिंपरी मोरवाडी येथील भाजपा पक्ष कार्यालयामध्ये शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 16 आणि 17 डिसेंबर रोजी संपन्न झाल्या. तब्बल 730 अर्ज इच्छुक उमेदवाराकडून पक्षाकडे सादर करण्यात आले होते. या सर्व इच्छुक उमेदवारांची मुलाखत पक्षाचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, विधानपरिषद…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक २६ मध्ये रविराज काळे यांनी श्रींचा आशीर्वाद घेऊन परिचयपत्रक वाटपाला व प्रचारला सुरुवात केली. श्री गणेश, श्री दत्त महाराज आणि विठ्ठल–रखुमाई यांच्या पावन आशीर्वादाने प्रभाग क्रमांक २६ मध्ये आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष आणि आगामी महापालिका निवडणुकीचे उमेदवार रविराज काळे यांचे परिचयपत्रक वाटप कार्यक्रमाची शुभ व मंगल सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी परिसरातील नागरिकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधण्यात आला. नागरिकांनी व्यक्त केलेला विश्वास, प्रेम आणि उत्साह हेच आजवरच्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचे खरे बळ असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आजपर्यंत करण्यात आलेली प्रत्येक सेवा ही नागरिकांच्या मोलाच्या सहकार्यामुळेच शक्य झाली आहे. जनतेकडून…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित ठाकरे शिवसेना चषक २०२५ भव्य हाफ पीच क्रिकेट टूर्नामेंट स्पर्धेचे आयोजन प्रभाग क्रमांक १४ मध्ये संत तुकाराम महाराज पालखी तळ, विठ्ठलवाडी, आकुर्डी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रभाग क्रमांक १४ मधील एकूण ३२ क्रिकेट संघांनी सहभाग घेतला. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत ३२ संघांचे सामने उत्साहात पार पडले. सोमवार, दिनांक १५ डिसेंबर रोजी सेमीफायनल व अंतिम सामन्यांचे आयोजन करण्यात आले. अंतिम निकालानुसार प्रथम क्रमांकाचे पारितोषिक वाडी बॉईज, दत्तवाडी आकुर्डी संघाने पटकावले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पोलीस लाईन चिंचवड स्टेशन संघाला मिळाले, तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक शादाब खान…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरताना महापालिकेकडून आवश्यक असलेला ना हरकत दाखला सुलभरीत्या मिळावा, यासाठी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर विशेष ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांच्या अधिपत्याखाली महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेमुळे इच्छुक उमेदवारांना आता घरबसल्या ना हरकत दाखल्यासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज सादर करताना उमेदवारांना ओळखपत्र म्हणून आधार कार्ड क्रमांक आणि आवश्यक वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे. या प्रणालीमुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि सोप्या पद्धतीने पार…
