Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास महादेव कदम यांनी सोमवारी (दि.२२) काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे सुपूर्द केला. दि. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी वेणू गोपाल यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या तात्कालीन अध्यक्ष खासदार सोनिया गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार राहुल गांधी यांच्या आदेशाने डॉ.कैलास कदम यांची निवड पिंपरी चिंचवड काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी केली होती. काँग्रेस पक्ष संक्रमण अवस्थेत असताना कदम यांनी शहराध्यक्ष पदाची धुरा खांद्यावर घेतली. काँग्रेस पक्ष वाढीसाठी तसेच घरोघरी पक्षाचे चिन्ह पोहचवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आणि आता सोमवारी त्यांनी काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ९ (सुस-बाणेर-पाषाण) मध्ये राजकीय वातावरण तापू लागले असून, अमोल बालवडकर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित स्नेहमेळाव्याने या प्रभागातील निवडणूक हालचालींना स्पष्ट दिशा मिळाली आहे. बालेवाडी येथील हायस्ट्रीट मैदानावर रविवारी झालेल्या या स्नेहमेळाव्याला सुस, बाणेर, पाषाण, बालेवाडी, म्हाळुंगे, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी या भागातील जवळपास साडेतीन ते चार हजार नागरिकांनी उपस्थिती लावत बालवडकरांच्या पाठीशी असल्याचे एकमुखाने सांगितले. अमोल बालवडकर यांच्या झंझावाती, विकासाभिमुख नेतृत्वामुळे या भागाच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास मित्र परिवाराने व्यक्त केला. भाजपा कोथरूड उत्तर मंडलाचे सर्व महिला पदाधिकारी, सर्व आघाडीचे सदस्य,  कार्यकर्ते, सदस्य, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरीक, परिसरातील सोसायटीचे पदाधिकारी व…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील उमेदवार  विनोद जयवंत नढे यांच्या प्रचाराला आज जोरदार सुरुवात झाली. ज्योतिबा नगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी कॉलनी, ज्योतिबा कॉलनी, अभियंता कॉलनी, अविनाश मंगल कार्यालय परिसर तसेच काळेवाडी गावठाण या भागात भव्य प्रचार यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचार यात्रेदरम्यान उमेदवार विनोद नढे यांचे नागरिकांनी ठिकठिकाणी फटाके वाजवून जल्लोषात स्वागत केले. महिलांनी औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या, तर नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून आपला पाठिंबा व्यक्त केला. प्रचार यात्रेमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या यात्रेमध्ये तरुणांचा सहभाग विशेष लक्षणीय ठरला. युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रचारात…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी व्यक्त केली खंत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी इतर पक्षातून आजी – माजी पदाधिकाऱ्यांचा प्रवेश घेण्यात आला होता या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये पुणे जिल्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला यावेळी निवडणूक प्रमुख विठ्ठल उर्फ नाना काटे उपस्थित होते. या विषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि,२०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत संपूर्ण शहरातून सर्वाधिक मते मिळवून मी पिंपरी प्रभाग २१ मधून विजयी झालो. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागातून भाजपकडून मिळवलेला हा भव्य…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय फोडाफोडीत आता भाजपला पिंपरीत मोठा धक्का बसला आहे. पिंपरीगावातील भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जाहीर प्रवेश करत मनगटावर ‘घड्याळ’ बांधले. भाजपमध्ये त्यांचे कट्टर राजकीय विरोधक संजोग वाघेरे यांनी प्रवेश केल्यानंतर संदीप वाघेरे अस्वस्थ होते. अखेर त्यांनी भाजपला रामराम ठोकत अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना आपल्या गोटात घेत आक्रमक राजकीय खेळी केली होती. त्याला प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर थेट पलटवार सुरू केला आहे. संदीप वाघेरे यांच्या प्रवेशामुळे पिंपरीतील राजकीय…

Read More

वाकड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाकड–पिंपळे निलख प्रभाग क्रमांक २६ मधून भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत नेते गणेश कस्पटे यांनी थेट आणि स्पष्ट भूमिका मांडत राजकीय चर्चांना वेग दिला आहे. “दहा वर्षे संयम राखला, पक्षाचा शब्द पाळला; आता मात्र थांबण्याचा प्रश्नच नाही,” असे ठाम शब्दांत सांगत कस्पटे यांनी यंदा निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला. पत्रकारांशी संवाद साधताना कस्पटे यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा लेखाजोखा मांडला. २०१७ च्या महापालिका निवडणुकीवेळी पूर्ण तयारी असूनही पक्षाच्या सूचनेनुसार माघार घेतल्याची आठवण त्यांनी करून दिली. “स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि आमचे मार्गदर्शक आमदार शंकर जगताप यांच्या शब्दासाठी मी मागे राहिलो. पक्षासाठी काम केले, दिलेल्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात सुरू असलेल्या ‘इनकमिंग’ राजकारणाने पिंपरीत थेट बंडाचे स्वर धडकले आहेत. शनिवारी इतर पक्षांतील आजी-माजी पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आल्यानंतर, अवघ्या एका दिवसातच पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संताप उफाळून आला. रविवारी दुपारी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरत आत्मक्लेष आंदोलन केले आणि पक्ष नेतृत्वाच्या निर्णयावर उघड नाराजी व्यक्त केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने इतर पक्षांतून तब्बल २२ जणांना पक्षात घेतल्याने स्थानिक पातळीवर अस्वस्थता निर्माण झाली आहे. मुंबईतील प्रवेशानंतर पिंपरीतील काही नेत्यांना दिलेल्या प्रवेशामुळे “आयारामांना संधी, निष्ठावंतांना डावलले” अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये पक्की झाली असून, त्याचा थेट स्फोट छत्रपती शिवाजी महाराज…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा समितीच्या वतीने संघटनात्मक बांधणी व निवडणूक प्रचार अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री. रविराज बबन काळे यांच्या नेतृत्वाखाली मा. सुरेश अनंता गायकवाड यांची पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रचार प्रमुख पदी नियुक्ती करण्यात येत आहे. पक्ष संघटनेतील त्यांचा अनुभव, जनसंपर्क आणि कार्यशैली लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे आगामी निवडणुकीत पक्षाचा प्रचार अधिक प्रभावी, नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख पद्धतीने राबवला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. श्री.सुरेश…

Read More

  नवी दिल्ली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठ, पुणे यांना शाश्वतता व हरित कौशल्य शिक्षणातील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी प्रतिष्ठित ‘आयडीए पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला आहे. इंडिया डिडॅक्टिक्स असोसिएशन (आयडीए), नवी दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणारा हा राष्ट्रीय पुरस्कार “शाश्वतता व हरित कौशल्य शिक्षणातील नवकल्पना” या विशेष श्रेणीत प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा यशोभूमी येथील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर (आयआयसीसी), नवी दिल्ली येथे पार पडला. शाश्वत विकास, पर्यावरणीय जबाबदारी आणि हरित कौशल्य विकासाला चालना देणाऱ्या विद्यापीठाच्या अभिनव शैक्षणिक पद्धती, संशोधनाधारित उपक्रम आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत…

Read More

दोन दिवसीय प्रशिक्षणात मतदान प्रक्रिया, ईव्हीएम हाताळणी व कायदेशीर नियमावलीवर सविस्तर मार्गदर्शन मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी देण्यात आलेले सर्व साहित्य नीट तपासून घेणे आवश्यक – उपायुक्त पंकज पाटील पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकशाही प्रक्रियेत मतदान हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांची रचना व व्यवस्था योग्य पद्धतीने असणे आवश्यक असते. यासाठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी देण्यात आलेले सर्व साहित्य नीट तपासून घेणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका २०२५–२६ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत मतदानाशी संबंधित सर्व नियम व कार्यपद्धती समजून घ्या. मतदान प्रक्रिया अचूक व सुरळीत पार…

Read More