Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने मोठा आणि महत्त्वपूर्ण राजकीय निर्णय घेतला आहे. शहर निवडणूक प्रभारी म्हणून खा. डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, या निर्णयामुळे शहराच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. खा. डॉ. अमोल कोल्हे हे अभ्यासू, प्रभावी वक्ते आणि जनसामान्यांशी थेट संवाद साधणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. तर आमदार रोहितदादा पवार हे संघटन कौशल्य, आक्रमक भूमिका आणि कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक यामुळे पक्षातील विश्वासार्ह चेहरा मानले जातात. या दोन्ही नेत्यांच्या नियुक्तीमुळे पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक पार पडत असताना पिंपरी चिंचवड शहरात मोठमोठ्या राजकीय उलथापालथींना सुरुवात झाली आहे. गेली काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला धक्के बसत असताना आता शिवसेनेला देखील मोठे खिंडार पडले आहे. शिवसेना पक्षाचे पिंपरी चिंचवड उपशहर प्रमुख राजेश आरसूळ यांनी आपल्या दोन हजार कार्यकर्त्यांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. गेली काही दिवस पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात भारतीय जनता पार्टीने सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर आघात करण्यास सुरुवात केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक नगरसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या दृष्टीने चिंतेची बाब निर्माण झालेली होती…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी सांगवीतील राजकारणाला मोठा वळण मिळाले आहे. प्रभाग क्रमांक ३१ नवी सांगवी येथील भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक  अंबरनाथ कांबळे व दिप्ती कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री  अजित पवार यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रचार प्रमुख, माजी विरोधी पक्षनेते  विठ्ठल उर्फ नाना काटे तसेच माजी नगरसेवक राजेंद्र जगताप उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीत भर पडल्याचे मानले जात आहे. नवी सांगवी परिसरात अंबरनाथ व दिप्ती कांबळे यांचा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात आज मोठा उलथापालथीचा दिवस ठरत आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत विधानसभा निवडणूक लढवलेले उमेदवार व माजी नगरसेवक राहुल कलाटे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. विशेष म्हणजे, या पक्षप्रवेशाला भाजपमधील निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा तीव्र विरोध असतानाही, स्थानिक नाराजीला न जुमानता भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून पिंपरी-चिंचवड विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर आज या चर्चांवर शिक्कामोर्तब होत असून, राष्ट्रवादीसाठी ही राजकीय गळती चिंताजनक मानली जात आहे. राहुल कलाटे यांनी 2024 च्या विधानसभा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळेवाडीतील प्रभाग क्रमांक २२ मधून महिला काँग्रेस शहराध्यक्षा सायली किरण नढे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. श्री गणरायाला वंदन करून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या हस्ते नारळ फोडून आणि परिचय पत्रक वाटप करून प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी मनोज कांबळे, बाबू नायर, निगाताई बारस्कर, तुकाराम भोंडवे, संदेश नवले, अभिमन्यू दहिदुले, कौस्तुभ नवले, ॲड. उमेश खंदारे, अर्जुन लांडगे, आशा भोसले, प्रियांका सगट, आबा खराडे तसेच नढे परिवारातील सर्व सदस्य आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. महापालिका निवडणुकीत काँग्रेसकडून सायली नढे यांना उमेदवारी निश्चित असून, प्रचार शुभारंभाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  शिक्षण क्षेत्रातील मूल्याधिष्ठित, नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थीकेंद्रित कार्याची दखल घेत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ ने प्राचार्य विठ्ठल बबनराव गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले.स्विफ्ट निफ्ट मीडिया ग्रुप यांच्या वतीने हा पुरस्कार एल्प्रो मॉल सभागृह,चिंचवड येथे देण्यात आला. हा राज्यस्तरीय पुरस्कार येवले ग्रुपचे सर्वेसर्वा नवनाथ येवले व स्विफ्ट अँड लिफ्ट चे सीईओ निलेश साबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्राचार्य गायकवाड यांना यापूर्वी शिक्षण रत्न, उत्कृष्ट प्राचार्य कार्य गौरव राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून मूल्यशिक्षण, शिस्त, सामाजिक जाणीव आणि आधुनिक अध्यापन पद्धती यांचा समतोल साधणारे प्राचार्य गायकवाड यांचे कार्य शिक्षण क्षेत्रात…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  निगडीच्या राजकारणात पुन्हा एकदा परिवर्तनाची चाहूल! जनतेच्या विश्वासावर उभे असलेले, विकासाला गती देणारे आणि सेवाभावाला प्राधान्य देणारे मनसेचे खंदे नेतृत्व श्री. सचिन तुकाराम चिखले आणि सौ.अश्विनीताई सचिन चिखले–मराठे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराचा भव्य आणि दणदणीत शुभारंभ सोमवार, दि. २२ डिसेंबर रोजी निगडी येथील दुर्गामाता मंदिर, मनसे जनसंपर्क कार्यालय येथे करण्यात आला.या प्रचार शुभारंभाची सुरुवात उत्साहात करण्यात आली असून, यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, तरुण वर्ग तसेच मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होता. नागरिकांचा वाढता प्रतिसाद आणि उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात मनसेमय वातावरण निर्माण झाले होते. ‘कार्यकर्त्यांची ऊर्जा, नागरिकांचा…

Read More

अनोख्या उपक्रमाला उत्साहात सुरुवात, ५८ हजार विद्यार्थी पालकांना मतदान करण्यासाठी देणार पत्र मतदानाचे महत्त्व असणारे पत्र पालकांना देऊन त्यांच्याकडे मतदानासाठी हट्ट करा – अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  जसं तुम्ही आई–वडिलांकडे खाऊसाठी किंवा उद्यानात जाण्यासाठी हट्ट करता, तसाच हट्ट आता मतदानासाठी करा. १५ जानेवारी २०२६ रोजी आधी मतदान आणि मगच इतर कामं, असा आग्रह पालकांकडे धरा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना केले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ मा. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली असून, या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर–रहाटणी परिसरातील मिलिटरी हद्दीतील महत्त्वाच्या १८ मीटर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अजित पवार यांच्या सूचनेनुसार आणि मा. विरोधी पक्षनेते श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे तसेच नगरसेविका सौ. शितलताई नाना काटे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा रखडलेला प्रश्न मार्गी लागला आहे. काही दिवसांपूर्वी जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत नाना काटे यांनी प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर–रहाटणी परिसरातील या १८ मीटर रुंदीच्या मिलिटरी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली होती. सदर रस्त्याचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले असतानाही काही ठिकाणी डांबरीकरण अपूर्ण…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ साठी उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवार, दि. २३ डिसेंबर २०२५ पासून सुरू होत आहे. ही प्रक्रिया निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पार पडणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. निवडणूक प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि नियमानुसार पार पडावी यासाठी महापालिकेच्या ८ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उमेदवारांना प्रभागनिहाय नामनिर्देशन पत्रे ३० डिसेंबर २०२५ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने दाखल करता येणार आहेत. तर अंतिम दिवशी सकाळी ११ ते…

Read More