Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ज्येष्ठ नागरिकांकडून मिळणारे संस्कार, परंपरेचा वारसा, समाजसेवेची दिशा आणि आपलेपणा हेच समाजाचे खरे भांडवल आहे. म्हणूनच ज्येष्ठांच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही पिंपरीगाव, वैभव नगर, जिजामाता हॉस्पिटल, मिलिंद नगर प्रभाग क्रमांक २१ मधील भारतीय जनता पक्ष – आरपीआय (आठवले) पक्षाच्या अधिकृत उमेदवार उषा संजोग वाघेरे यांनी दिली. प्रभागातील प्रचाराच्या निमित्ताने आयोजित ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या बैठकीत उषा वाघेरे यांनी ज्येष्ठ नागरिकांशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी भाजपा आरपीआय आठवले पक्षाचे अधिकृत उमेदवार मोनिका सुरेश निकाळजे, गणेश रामराव ढाकणे, नरेश रामचंद पंजाबी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा, सोसायटीतील आवश्यक मूलभूत गरजा तसेच प्रभागात सुरू असलेल्या…

Read More

नवी सांगवी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका निवडणुकीच्या प्रभागात प्रचाराला वेग आला असून, नवी सांगवी प्रभाग क्र. ३१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, उमा पाडुळे, दिप्ती अंबरनाथ कांबळे आणि अरुण पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. घरोघर जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत विकासकामांचा आढावा मांडून नवी सांगवी-पिंपळे गुरव समस्यामुक्त करण्याचा ठाम विश्वास मतदारांना दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवी सांगवी समस्यामुक्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांपासून ते पायाभूत विकासकामांपर्यंतच्या मुद्द्यांवर उमेदवार भर देत आहेत. स्थानिक समस्या सोडवण्यासाठी ठोस आराखडा मांडत आहेत. प्रचारादरम्यान ‘आम्ही आपल्यासोबत आहोत’, हा विश्वास नागरिकांकडून मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात तरुणाई, महिला…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या २०२६ सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपळे सौदागर–रहाटणी परिसरात भारतीय जनता पार्टीच्या इच्छुक उमेदवारांनी दाखविलेली पक्षनिष्ठा आणि संघटनात्मक शिस्त लक्षवेधी ठरली आहे. “राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” या भूमिकेतून इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेत अधिकृत उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. प्रभाग क्रमांक २८ मधून निर्मलाताई कुटे, जयनाथजी नारायण काटे, कैलासजी प्रधान कुंजीर, सुप्रियाताई राजेश पाटील आणि रिनाजी दिनेश काटे यांनी इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केले होते. मात्र, पक्षाचा अधिकृत निर्णय मान्य करत सर्वांनी अर्ज मागे घेतले असून, भाजपाच्या अधिकृत पॅनेलच्या प्रचारासाठी सक्रिय सहभाग घेण्याची भूमिका घेतली आहे. या निर्णयामुळे प्रभागात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपचे अधिकृत उमेदवार विनोद नढे यांनी प्रचाराचा झंजावात सुरू केला आहे. प्रभागातील मूलभूत नागरी समस्या, अपूर्ण विकासकामे आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी यांचा थेट आढावा घेत विनोद नढे यांनी मतदारांशी संवाद साधत प्रचाराचा आढावा घेतला. प्रभागातील मूलभूत नागरी सुविधा, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, आरोग्य सेवा तसेच विकासकामांतील रखडपट्टी या मुद्द्यांकडे विशेष लक्ष देत, “नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारा आणि प्रत्यक्ष काम करणारा नगरसेवक देणे गरजेचे आहे,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक समस्येची सविस्तर नोंद घेत, निवडणुकीनंतर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारी माघार प्रक्रियेला वेग आला आहे. आजपर्यंत एकूण ३८ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून, माघार अर्जांची एकूण संख्या ४१ इतकी झाली आहे.   निवडणूक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार उद्या शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी उमेदवारी माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी आणखी काही उमेदवार माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माघारीनंतर अनेक प्रभागांमधील निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होत असून काही ठिकाणी थेट लढती तर काही प्रभागांत बहुपक्षीय लढती कायम राहणार आहेत.   प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांकडूनही अंतिम टप्प्यातील रणनीती आखली जात असून, माघार प्रक्रियेनंतर…

Read More

पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी)- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी१ हजार ९९३ दाखल केलेल्याअर्जापैकी ९९ उमेदवारी अपात्र झाले.१ हजार ८९४ अर्ज पात्र झाले आहेत. छाननीनंतर ३८ उमेदवारांनी आपली तलवार म्यान करत माघार घेतली आहे. आज शुक्रवार माघारीची अंतिम मुदत आहे.महापालिका निवडणुकीसाठी ३० डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. या मुदतीत ३२ प्रभागातील १२८ जागांसाठी १ हजार ९९३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जांची ८ निवडणूक निर्णय अधिकारी ह क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक अर्ज बाद आठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामधील ह क्षेत्रीय कार्यालयातील सर्वाधिक ३५ उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. त्याखालोखाल ग-२६, अ-१२, फ-८, ई-६, ड-७, क-५ असे ९९ अर्ज अपात्र झाले आहेत.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- वर्षानुवर्षे खुर्च्या उबवूनही पिंपरी गावासाठी काहीच न केलेल्या मंडळींना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 चे उमेदवार संदीप वाघेरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक 21 मधून संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पॅनलच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले. यावेळी संदीप वाघेरे बोलत होते. कार्यक्रमास डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे, निकिता कदम, माजी नगरसेविका गिरीजा कुदळे, सुनिता वाघेरे, मीना (मीनाताई) नाणेकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना संदीप वाघेरे यांनी गेल्या पाच वर्षांत पिंपरी गावात…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रीय समाज पार्टी या तीन पक्षांची युती झाली आहे. दोन्ही पक्ष मिळून शहरामध्ये 128 पैकी 88 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग््रेासने अंतिम टप्यात अजित पवारांशी आघाडी केल्यानंतर शिवसेनेने मनसेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला. या युतीमध्ये शिवसेना 59 तर मनसे 17 आणि रासप 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना आणि मनसेच्या वरिष्ठांनी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये शिवसेना 59 जागांवर लढणार आहे. प्रभाग क्रमांक 16 मधून भाग्यश्री तरस, 17 मध्ये रवींद्र महाजन,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यात मुंबईनंतर सर्वांच लक्ष लागलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील सत्ता समीकरणे लक्षात घेऊन दोन्ही गटांनी जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला निश्चित केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच जाहीर सभेतून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर, दोन्ही राष्ट्रवादीनी ठरवलेल्या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादी  शरद पवार 18 जागांवर उमेदवार उभे करणार असून उर्वरित 110 जागांवर राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्याकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये, केवळ 4 जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देण्यात आल्याचं दिसून येत आहे.…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भाऊसाहेब भोईर, मनिषा आडसुळ, शोभा वाल्हेकर व शेखर चिंचवडे यांनी भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उमेदवारांनी पक्षाची दिशा, विकासात्मक धोरणे आणि निवडणूक विषयक भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले की, अजितदादा पवार हे दूरदृष्टी असलेले, सक्षम आणि निर्णयक्षम नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. प्रभाग क्रमांक १७ मधील मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छतेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जनतेचा विश्वास आणि सहकार्य मिळाल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवून आणू, असा…

Read More