- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- मिलेटरी डेअरी फॉर्मच्या हद्दीमध्ये नवीन पुलापासून पिंपळे गुरव गावापर्यंत अंतर्गत १०० फुटी अद्यावत रस्ता विकसित करण्यात यावा, अशी मागणी माजी महापौर संजोग भिकू वाघेरे (पाटील) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यावेळी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे उपस्थित होते. संजोग वाघेरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी वाघेरे गावातील मिलेटरी डेअरी फॉर्म पुलाचे क लवकरच पूर्ण होत असून, या पुलामुळे परिसरातील वाहतूक कोंडीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आजूबाजूच्या भागातून मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा वाढणार असल्याने वाहतूक व्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. ही बाब…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाची घोडदौड सुरू आहे. त्यामुळे पिंपरीत विकासाची गंगा अखंडपणे वाहत ठेवायची असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही. महापालिकेत सत्तेच्या माध्यमातून केलेल्या विकास कामाच्या जोरावर पिंपरी प्रभागात भाजपचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांनी व्यक्त केला. पिंपरीगाव, वैभव नगर, मिलिंद नगर, जिजामाता रुग्णालय प्रभाग क्रमांक २१ मधील भाजपा–आरपीआयचे अधिकृत उमेदवार उषा वाघेरे, मोनिका निकाळजे, गणेश ढाकणे आणि नरेश पंजाबी यांच्या प्रचारार्थ निवडणूक कचेरीचे उद्घाटन विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांच्या हस्ते उत्साहात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने प्रभागात जोरदार तयारी करत प्रचाराचा अधिकृत शुभारंभ जाहीर केला आहे. रविवार, ४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता चिंचवडगाव येथील महाराष्ट्र श्री गोरक्षनाथ महाराज मंदिरात दर्शन घेऊन भाजपच्या प्रचाराची औपचारिक सुरुवात होणार आहे. धार्मिक वातावरणात प्रचाराचा नारळ फोडत भाजपने निवडणूक रणांगणात ताकदीने उतरण्याचे संकेत दिले आहेत. या प्रभागातून भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून अपर्णा निलेश डोके (इतर मागास प्रवर्ग – महिला), मनिषा योगेश चिंचवडे (सर्वसाधारण महिला), ऍड. मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे (सर्वसाधारण – खुला प्रवर्ग) आणि सुरेश शिवाजी भोईर (सर्वसाधारण – खुला प्रवर्ग) हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. चारही उमेदवारांनी ‘विकास,…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डिफेन्स फोर्स लीग (डीएफएल) आणि डीआयएफटी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपल्या सैन्याला समजावून घ्या’ या संकल्पनेवर आधारित आणि ‘वॉल ऑफ हिरोज’ या जागतिक विक्रमी मोहिमेच्या अधिकृत शुभारंभासाठी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘डिव्हाईन एव्हिएशन एज्युकेशन अँड कल्चर समिट’मध्ये शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय व दूरदृष्टीपूर्ण योगदानाबद्दल एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी (एमआयटी-एडीटी) विद्यापीठ, पुणेला डीएफएलचा प्रतिष्ठेचा ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान विद्यापीठाच्या विश्वस्त व कार्यकारी संचालक प्रा. डॉ. सुनीता कराड यांनी स्वीकारला. या राष्ट्रीय परिषदेत माजी हवाई दल उपप्रमुख एअर मार्शल भूषण गोखले (पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएम) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. अरुणाचल प्रदेश व…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- केंद्रात, राज्यात सत्तेत एकत्र असल्याने भाजपसोबत युती करण्यासाठी प्रचंड मेहनत केली. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. परंतु, ठीक आहे. त्यांनी गाफील ठेवले. युती केली नाही. शेवटच्या तासाभरात शिवसेनेला ताकदीचे ६१ उमेदवार मिळतील का असे त्यांना वाटले नसेल. पण, शिवसेनेला ताकदीचे उमेदवार मिळाले. त्यामुळे शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणाचाच महापौर होऊ शकत नाही, असा विश्वास शिवसेना नेते, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. प्रचारात टीका-टिप्पणी करण्यापेक्षा आपण काय कामे करणार आहोत. हे जनतेला सांगावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद, सुलभा उबाळे, महानगरप्रमुख राजेश वाबळे, जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर, शहरप्रमुख नीलेश…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६ (ब) मध्ये ओबीसी महिला राखीव जागेसाठी कु. प्रज्ञा महेश खानोलकर (MBA) यांनी जोरदार आघाडी घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकीतून विकासकामांचा धडाका लावणाऱ्या प्रज्ञा खानोलकर यांनी “काम करत आलोय, काम करत राहू” हा निर्धार मतदारांसमोर ठामपणे मांडला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम, तसेच मूलभूत नागरी सुविधांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यांच्या कामाची दखल घेत मतदारांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत असून, प्रत्येक गल्लीतून एअर कंडिशनर (AC) या चिन्हाला भरघोस पाठिंबा वाढताना दिसत आहे. प्रचारादरम्यान विरोधकांचे आरोप त्यांनी ठोस कामगिरीने फोल ठरवले असून,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ताकद दाखवत प्रचाराचा बिगुल फुंकला आहे. आज आयोजित भव्य रॅलीमुळे संपूर्ण प्रभागात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक रणांगणात आक्रमक पवित्र्यात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. या रॅलीला आमदार सुनील शेळके तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नाना काटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. प्रभाग क्रमांक २६ मधील अधिकृत उमेदवार संकेत शामराव जगताप, सौ. सारिका गणेश कास्पटे, सौ. सीमा शिरीष साठे आणि तुषार गजानन कामठे यांनी रॅलीचे नेतृत्व करत मतदारांशी थेट संवाद साधला. ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि स्क्रिप्ट’च्या आधारे एजन्सीच्या सल्ल्याने बिनबुडाचे आरोप केले. त्यांच्या काळात शहरात काय झाले आणि भाजपाच्या सत्ताकाळात काय विकासकामे केली हे आम्ही सांगतो. पण, ‘‘देवा शप्पथ सांगतो; पैलवानाच्या नादाला लागू नका..’’ असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता दिला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक- 2026 च्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्पाजवळ आयोजित कार्यक्रमात निवडणुकीच्या प्रचाराचा शुभरंभ केला. यावेळी चव्हाण बोलत होते. या प्रसंगी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, महामंत्री राजेश पांडे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे यांच्यासह शहरातील पदाधिकारी,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- विकासाभिमुख हिंदुत्वाचा विचार आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पिंपरीतील नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला विजयी करण्याचा निर्धार केल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. पिंपरी गाव, वैभव नगर, मिलिंद नगर, जिजामाता हॉस्पिटल, अशोक थिएटर परिसरासह प्रभाग क्रमांक २१ मध्ये भाजप–आरपीआय (आठवले गट) महायुतीच्या चारही अधिकृत उमेदवारांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली आहे. भाजप–आरपीआय महायुतीच्या अधिकृत उमेदवार उषाताई संजोग वाघेरे, मोनिका सुरेश निकाळजे, मोहन ढाकणे आणि नरेश पंजाबी यांनी एकत्रितपणे प्रचाराची धुरा सांभाळत मतदारांशी थेट संवाद साधला. प्रभागातील विविध सोसायट्यांना दिलेल्या भेटीदरम्यान अनेक सोसायटी धारकांनी चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आश्वासन देत जाहीर पाठिंबा दर्शवला. प्रचारादरम्यान…
अजित पवारांच्या आरोपानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीतील दिग्गज भाजपामध्ये! पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॅमेज कंट्रोलिंगसाठी आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी धक्का दिला आहे. आदल्या दिवशी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन तथ्यहीन आरोप केले. उमेदवारांना दबावाखाली माघार घ्यायला लावत असल्याचे आरोप केले.आणि दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी केलेले आरोप खोटे ठरवत भर सभेत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपची चिंचवड विधानसभेसह पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी या भागात ताकद वाढली आहे. शनिवारी प्रचाराचा नारळ फोडताना माजी नगरसेविका सुषमा तनपुरे, श्रीधर वाल्हेकर – माजी सभापती शिक्षण…
