Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ – काकडे पार्क सोसायटी परिसरात भाजपचे उमेदवार ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी घराघरांत जाऊन थेट जनसंवाद साधत प्रचाराला धार दिली आहे. ‘जनतेशी थेट संवाद, विश्वासाची ग्वाही’ या भूमिकेतून करण्यात आलेल्या या भेटींनी प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. काकडे पार्क सोसायटी परिसरात झालेल्या घरभेटी दरम्यान स्थानिक नागरिकांना आपले प्रश्न, अपेक्षा आणि विकासाबाबतचे विचार थेट मांडण्याची संधी मिळाली. पाणी, रस्ते, स्वच्छता, नागरी सुविधा, सुरक्षितता आणि परिसर विकासाशी संबंधित मुद्द्यांवर नागरिकांनी स्पष्ट भूमिका मांडली. या प्रत्येक प्रश्नाची गंभीर दखल घेत समस्या सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन पाठपुरावा करण्याचा ठाम निर्धार …

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चऱ्होली बु. प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचार फेरीला नागरिकांचा उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात प्रभागातील रस्ते भाजपमय झाले असून, महायुतीच्या उमेदवारांनी निवडणूक रणांगणात निर्णायक आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रचाराचा शुभारंभ पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेचे पहिले माजी महापौर व स्थानिक लोकप्रतिनिधी मा. नितीनआप्पा काळजे, भाजप शहर कोषाध्यक्ष श्री. सचिनभाऊ श्रीधर तापकीर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जल्लोषात झाला. यावेळी भाजपच्या उमेदवार सौ. अर्चनाताई राजेश सस्ते आणि सारिका रवींद्र गायकवाड यांनी प्रचाराला अधिकृत सुरुवात केली. प्रचार रॅलीदरम्यान बुर्डे वस्ती, निकम वस्ती, चऱ्होली गावठाण, काळीभिंत परिसर,…

Read More

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर परिसरात ‘जनसंवादातून विश्वास, विश्वासातून विकास’ या ठाम भूमिकेसह सामाजिक कार्यकर्त्या अनिता संदीप काटे आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप काटे यांनी विविध सोसायट्यांना प्रत्यक्ष भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. या भेटीदरम्यान परिसरातील नागरिकांनी आपल्या दैनंदिन अडचणी, नागरी समस्या आणि अपेक्षा मनमोकळेपणाने मांडल्या. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, सुरक्षा, ड्रेनेज, तसेच सोसायटीतील मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नाची काटे दांपत्याने गांभीर्याने दखल घेतली. केवळ आश्वासनांपुरते न थांबता, संबंधित विषयांवर मनपाकडून पाठपुरावा करून ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. “नागरिकांचा विश्वास हाच आमचा खरा आधार आहे. सेवा, समर्पण आणि विकास या त्रिसूत्रीवर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ मधील उबाठा गटाचे अधिकृत उमेदवार चेतन महादेव पवार यांनी प्रचारात भावनिक व विश्वासार्ह अशी वाटचाल सुरू ठेवली आहे. प्रचाराच्या धावपळीत त्यांनी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. अनुभव, मार्गदर्शन आणि आशीर्वाद हीच खरी ताकद असल्याचे सांगत चेतन पवार यांनी ज्येष्ठांशी संवाद साधला. ज्येष्ठ नागरिकांनी “विकासाभिमुख, प्रामाणिक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे नेतृत्व” अशी भावना व्यक्त करत चेतन पवार यांना विजयी भव: चा आशीर्वाद दिला. प्रभागातील पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडणाऱ्या चेतन पवार यांच्या उमेदवारीला दिवसेंदिवस जनसमर्थन वाढताना दिसत आहे. उबाठा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  काळेवाडी परिसरात राजकीय वातावरण तापले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला आहे. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनखुळे यांच्या उपस्थितीत काळेवाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) चे अनेक सक्रिय कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश म्हणजे राष्ट्रवादीच्या गोटात पडलेला मोठा भगदाड असून स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. आजच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय अजित पवार यांची काळेवाडीमध्ये जाहीर सभा सुरू असतानाच राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘सभेच्या व्यासपीठावर ताकद दाखवली जात असताना, मैदानात मात्र कार्यकर्ते हातातून निसटत आहेत’ अशी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक २५ (वाकड, ताथवडे, पुनावळे) मधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ पुनावळे गावठाणात होत आहे. यावेळी प्रभागातील भाजप उमेदवार माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्यासह इतर उमेदवार उपस्थित असतील. पुनावळे गावठाणातून प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर याच भागातून पदयात्राही काढण्यात येणार आहे. निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये मोठे इन्कमिंग झाले. त्यात राहुल कलाटे यांचा प्रवेश सर्वाधिक चर्चेत राहिला. त्याचे एक कारण होते स्थानिक इच्छुकांचा विरोध. पक्षाकडून कलाटे यांचा प्रवेशही झाला आणि त्यांना उमेदवारीही जाहीर झाली. यानंतर मात्र स्थानिक नेत्यांनी तलवार म्यान करत कलाटे यांचे नेतृत्व मान्य करून, त्यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराला सुरुवात केल्याचे बघायला मिळाले. हा कार्यक्रम…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “चार बटणे कमळाची आणि पाच वर्षे विकासाची” हा ठाम निर्धार घेऊन आज काळेवाडीतील विजयनगर परिसरात राजकीय रणशिंग फुंकण्यात आले. विजयनगर येथील शांती कॉलनी क्रमांक १, २ आणि ३ मध्ये घरोघरी जाऊन थेट प्रचार करत उमेदवारांनी विकासाच्या मुद्द्यावरून विरोधकांना उघड आव्हान दिले. नुसत्या घोषणा नव्हे, तर कामाचा हिशेब मांडत मतदारांसमोर पाच वर्षांचा विकासनामा ठेवण्यात आला. रस्ते, पाणी, ड्रेनेज, नागरी सुविधा आणि मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका मांडत “आम्ही बोलत नाही, करून दाखवतो” असा स्पष्ट संदेश देण्यात आला. या प्रचारादरम्यान नागरिकांनीही प्रश्नांचा भडिमार करत जाब विचारला, तर उमेदवारांनी प्रत्येक प्रश्नाला थेट उत्तर देत आपली तयारी आणि आत्मविश्वास…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार राहुल भोसले पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक साधणार का, याची जोरदार चर्चा सध्या प्रभागात रंगली आहे. मागील दोन टर्ममध्ये विकासकामांचा ठसा उमटवणारे, नागरिकांशी थेट संवाद ठेवणारे आणि सतत मैदानात सक्रिय राहिलेले राहुल भोसले यांना यंदाही नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून प्रभागात केलेल्या कामांची दखल मतदार घेत असल्याचे घराघरातील प्रचारातून स्पष्ट होत आहे. घरोघरी भेटी, छोट्या सभा, स्थानिक प्रश्नांवर तात्काळ भूमिका आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेली…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ मधील दर्शन नगरी सोसायटी परिसरात आज घर टू घर प्रचार मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ऍड. मोरेश्वर शेडगे यांनी स्वतः पुढाकार घेत नागरिकांशी थेट संवाद साधला. प्रचारादरम्यान ऍड. मोरेश्वर शेडगे यांनी परिसरातील नागरी समस्या, विकासकामांची सद्यस्थिती आणि आगामी काळातील विकास आराखडा नागरिकांसमोर मांडला. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज आणि मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी मोकळेपणाने आपली मते मांडली. यावेळी “विकास, पारदर्शकता आणि जबाबदारी” हाच आपला प्रमुख अजेंडा असल्याचे शेडगे यांनी स्पष्ट केले. दर्शन नगरी सोसायटीतील नागरिकांनी या प्रचाराला मोठा प्रतिसाद देत ऍड. मोरेश्वर शेडगे यांच्यावर विश्वास व्यक्त केला. घराघरांतून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी गाव वैभव नगर अशोक थिएटर प्रभाग क्र.२१ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराने अक्षरशः वादळ उठवले असून, उमेदवारांना मतदारांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय आठवले पक्षाचे अधिकृत उमेदवार  उषा संजोग वाघेरे,  मोनिका सुरेश निकाळजे,  गणेश ढाकणे,  नरेश पंजाबी यांनी पिंपरी कॅम्प, आयप्पा मंदिर परिसर, दुर्गा माता मंदिर परिसर, व वैष्णवी देवी मंदिर परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पिंपरीतील प्रभागांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सर्वत्र विजयाचा सूर ऐकू येत आहे. प्रचाराच्या निमित्ताने भाजप उमेदवारांनी प्रभागातील पिंपरी कॅम्प, आयप्पा मंदिर परिसर, दुर्गा माता मंदिर परिसर,…

Read More