- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी चिंचवड लिंक रोडवरील गजानन महाराज मंदिरात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. श्रद्धा, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाप्रसाद वाटपाच्या माध्यमातून ॲड. शेडगे यांनी थेट जनतेशी संवाद साधत नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि प्रभागाच्या विकासाविषयी मते जाणून घेतली. “राजकारण म्हणजे केवळ निवडणूक नव्हे, तर जनतेशी नातं जोडण्याचं माध्यम आहे,” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. विकास, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक सुविधांबाबत नागरिकांनी मोकळेपणाने आपली मते मांडली.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “पिंपरी-चिंचवडकरांनो तुमचा स्वाभिमान बारामतीच्या पायापाशी ठेवू नका. ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची आहे,” असे ठणकावून सांगत आमदार महेशदादा लांडगे यांनी प्रभाग क्रमांक २१ मधील भाजप–आरपीआय (आठवले) आघाडीच्या चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. पिंपरी गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित महासभेत ते बोलत होते. पिंपरी गाव, वैभव नगर, मिलिंद नगर व जिजामाता रुग्णालय परिसरातील प्रभाग क्रमांक २१ साठी सौ. उषाताई संजोग वाघेरे, सौ. मोनिका सुरेश निकाळजे, गणेश ढाकणे आणि नरेश पंजाबी या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा झाली. “स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना आवाहन करण्यासाठीच मी इथे आलो आहे,” असे स्पष्ट शब्दांत सांगत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज (शुक्रवारी) जाहीर सभा होणार आहे. किवळेतील मुकाई चौक येथील मुक्ता मैदान येथे दुपारी साडेतीन वाजता ही जाहीर सभा होणार आहे. याबाबतची माहिती शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक शिवसेना पूर्ण ताकदीने लढत आहे. ६० ठिकाणी पक्षाचे उमेदवार आहेत. जोरदार प्रचार सुरू आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावले. प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के परतावा मिळवून दिला. हा प्रश्न कोणीच सोडविण्याचे धाडस केले नाही. एकनाथ शिंदे यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ अंतर्गत येणाऱ्या किवळे परिसरात गेल्या काही वर्षांत लक्षणीय विकास झाला असून या बदलामागे माजी नगरसेविका प्रज्ञा मनोज खानोलकर यांच्या कार्यकाळातील नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख विकासकामांचा मोठा वाटा असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा आणि स्थानिक प्रश्नांच्या तात्काळ निराकरणावर भर देत त्यांनी किवळे परिसराचा विकासाचा नवा अध्याय सुरू केला, अशी भावना स्थानिकांमध्ये आहे. खराब रस्ते, अपुरी ड्रेनेज व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा आणि सार्वजनिक सोयींचा अभाव या समस्यांनी त्रस्त असलेल्या किवळे भागात खानोलकर यांनी प्राधान्याने अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे, जलनिस्सारण सुधारणा तसेच पथदिवे बसवण्यावर भर दिला.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २६ मधील राजकीय चित्र दिवसेंदिवस अधिक स्पष्ट होत असून, काही माध्यमांतून रंगवले जात असलेले एकतर्फी दावे प्रत्यक्ष जनमताशी फारकत घेत असल्याचे वास्तव समोर येत आहे. सध्या प्रभाग २६ मध्ये जनतेचा कौल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) व अधिकृत उमेदवार सौ. सारिका गणेश कास्पटे यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घरोघरी प्रचार फेऱ्या, पदयात्रा आणि थेट नागरिकांशी साधलेला संवाद यामधून मिळणारा प्रतिसाद हेच या बदलत्या राजकीय वातावरणाचे द्योतक ठरत आहे. कास्पटे वस्ती, उत्कर्ष चौक, जानोबा चौक, कळाटे कॉलनी, साईनाथ कॉलनी, नंदवन कॉलनी, राधाकृष्ण कॉलनी, विशालनगर,…
चेतन पवार (उबाठा) विरुद्ध राहुल कलाटे (भाजप) लढत लक्षवेधी ठरणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार महेश लांडगे यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराबाबत टीका करणे म्हणजे नुरा कुस्तीचा सामना आहे. निवडणुका संपल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र बसून “चोर चोर मौशेरे भाई” प्रमाणे जनतेच्या पैशाची लूट करतील अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पिंपरी येथे केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात आता रंगत आली असून गुरुवारी अनेक नेत्यांनी पिंपरीत बैठका, सभा घेतल्या. गुरुवारी, पुनावळे – ताथवडे – वाकड, प्रभाग क्रमांक २५ मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन महादेव पवार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजपच्या उमेदवार अनिता संदीप काटे यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक धार चढताना दिसत आहे. घरोघरी सुरू असलेल्या प्रचार दौऱ्यात नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि “विजयी भव”चा आशीर्वाद त्यांच्या विजयाचा विश्वास अधिक दृढ करत आहे. अनिता काटे या सामाजिक कार्यात सक्रिय असून महिलांच्या प्रश्नांपासून ते मूलभूत नागरी सुविधांपर्यंत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आणि सर्वसामान्यांशी असलेल्या थेट संवादामुळे मतदारांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. प्रचारादरम्यान पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी हे मुद्दे ठळकपणे मांडले जात असून, या विषयांवर ठोस विकासाचा आराखडा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० मध्ये राजकीय वातावरण तापले असून शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार राजेश वाबळे यांच्या पॅनलचा प्रचार वेगाने पुढे सरकत आहे. घराघरांत पोहोचत धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा जागर करण्यात येत असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळच्या पदयात्रा, सायंकाळच्या प्रचार फेऱ्या, कोपरा सभा आणि थेट संवादाच्या माध्यमातून वाबळे पॅनल नागरिकांपर्यंत विकासाचा संदेश पोहोचवत आहे. “काम करणारे नेतृत्व, स्थिर प्रशासन आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य” हा प्रचाराचा केंद्रबिंदू ठरत असून पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि युवक-महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर भर दिला जात आहे. प्रचारादरम्यान धनुष्यबाणाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला असून कार्यकर्त्यांची…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील राजकीय वातावरण तापू लागले असून भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला दिवसेंदिवस बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. संघटित आणि शिस्तबद्ध प्रचारयंत्रणेच्या जोरावर भाजपने प्रभागात आपली पकड अधिक मजबूत केल्याचे जाणकारांचे मत आहे. अलीकडील काळात विविध राजकीय घडामोडींमुळे आणि काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षाची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. या घडामोडींमुळे भाजपची लोकांमधील विश्वासार्हता अधिक दृढ झाली असून “विनोद नाही, योग्य भाजप प्रवेशाने भाजपाला नक्कीच ताकद मिळाली आहे,” अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळेच अनेक नागरिक स्वयंस्फूर्तीने “आमची भाजप – आपली भाजप” असा नारा देत पक्षाच्या प्रचारात सहभागी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या प्रचाराला बळ देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भव्य जाहीर सभा पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आली आहे. आज गुरुवारी, ८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता, चिखली घरकुल, श्रीराम चौक मैदान येथे ही जाहीर सभा पार पडणार असून, या सभेकडे संपूर्ण शहराचे राजकीय लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ ही सभा होत असून, महाविकास आणि सत्तासमीकरणांच्या दृष्टीने ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अजितदादा पवार यांच्या आक्रमक भाषणशैलीमुळे आणि थेट…
