Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, पुणे (दि. ०९ जानेवारी २०२६) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत १५ जानेवारी रोजी घड्याळाचे चिन्ह पुढील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सत्ता द्या, मी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्जमुक्त करून शहराचा नावलौकिक पुन्हा प्राप्त करून देईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांनी पिंपरी येथील सभेत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक १९ मधील अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे (अ), दीपक हिरालाल मेवानी (ब), सविता धनराज आसवानी (क), काळूराम मारुती पवार (ड) यांच्या प्रचारासाठी पिंपरी चिंचवड लिंक रोड येथे आयोजित केलेल्या सभेत अजितदादा पवार यांनी मतदारांना संबोधित केले. यावेळी आमदार रोहित पवार, माजी उपमहापौर जगन्नाथ…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून प्रचाराला वेग आला असून, मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित करण्यात आली आहे. ही जाहीर सभा शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता, आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरात पार पडणार आहे. या सभेमध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राबविण्यात आलेल्या विकासकामांचा आढावा, तसेच पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप यावेळी मांडण्यात येणार आहे. या सभेला पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या जाहीर…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुनावळे–ताथवडे परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंधित असलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता त्यावर सातत्याने पाठपुरावा करणारे नेतृत्व म्हणून मा. चेतन अण्णा पवार यांचे नाव पुढे येत आहे. केवळ निवडणुकीपुरते नव्हे, तर वर्षभर जनतेशी नाळ जपून काम करणारे लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख परिसरात दृढ होताना दिसत आहे. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेणे, प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन समस्या जाणून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधणे, हा त्यांचा काम करण्याचा पद्धतशीर दृष्टिकोन आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, शाळा, दफनभूमी, धार्मिक स्थळे तसेच इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपच्या सुशिक्षित व उच्च विचारसरणीच्या पॅनलने प्रचाराला वेग दिला आहे. आज विनोद नढे यांच्या पॅनेलने ज्योतिबानगर परिसरात विविध ठिकाणी भेटी, संवाद आणि बैठका घेत भाजप उमेदवारांनी नागरिकांपर्यंत थेट पोहोचण्याचा प्रयत्न केला. ज्योतिबानगर येथील फिरतीदरम्यान कॉलनी, गल्ल्या व वस्ती पातळीवर नागरिकांशी संवाद साधण्यात आला. परिसरातील विकासकामे, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सुरक्षिततेसारख्या प्रश्नांवर चर्चा करत भाजप पॅनलने आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी नागरिकांनीही आपल्या समस्या मोकळेपणाने मांडल्या. विशेष म्हणजे, सायंकाळी महिलांसाठी स्वतंत्र बैठक घेण्यात आली. या बैठकीत महिला सक्षमीकरण, आरोग्य सुविधा, बचत गट, सुरक्षित सार्वजनिक जागा आणि…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मधील भाजपच्या उमेदवारांसाठी महिलांची एकजूट ही यंदाच्या निवडणुकीतील महत्त्वाची राजकीय घडामोड ठरत आहे. प्रभागातील गृहिणी, नोकरदार महिला, तरुणी, महिला बचत गट आणि विविध सामाजिक संघटनांच्या महिला एकत्र येत भाजपचे उमेदवार शत्रुघ्न काटे, अनिता संदीप काटे, संदेश काटे आणि डॉ. कुंदा भिसे यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. ही महिला एकजूट केवळ भावनिक पाठिंब्यापुरती मर्यादित नसून, महिला सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या मुद्द्यांवर आधारित आहे. “महिलांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणारे आणि त्यावर कृती करणारे नेतृत्व आम्हाला हवे आहे,” अशी स्पष्ट भूमिका महिलांनी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० मध्ये राजकीय वातावरण तापले असतानाच, एक नाव सर्वत्र ठळकपणे चर्चेत आहे—ते म्हणजे शिवसेनेचे दमदार नेतृत्व राजेश वाबळे. “शिवसेनेचा वाघ, विकासाचा ध्यास” अशी ओळख निर्माण केलेल्या वाबळे यांना प्रभागातील नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, राजेश वाबळे यांच्या पॅनलच्या विजयाची लाट प्रभागात स्पष्टपणे दिसून येत आहे. राजेश वाबळे यांनी गेल्या काळात प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, सार्वजनिक आरोग्य, शैक्षणिक प्रश्न तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. केवळ आश्वासनांपुरते न थांबता प्रत्यक्ष कामातून विश्वास संपादन करणारे नेतृत्व म्हणून आज वाबळेंकडे पाहिले जात आहे. या कामगिरीचा थेट…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ रहाटणी–पिंपळे सौदागर येथील ज्येष्ठ नागरिकांशी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा. ना. अजितदादा पवार यांनी थेट संवाद साधला. या संवादात त्यांनी प्रभागातील सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडत, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विरंगुळा केंद्र आणि नागरिकांसाठी भव्य बहुउद्देशीय प्रेक्षागृह उभारण्याची ठोस घोषणा केली. पिंपळे सौदागर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी जाहीर कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, “ही निवडणूक राष्ट्रीय राजकारणाची नसून स्थानिक प्रश्न सोडवणाऱ्या सक्षम नेतृत्वाची आहे.” या प्रभागातून ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, उमेश काटे, शितल काटे आणि मीनाक्षी काटे यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांना आशीर्वाद…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मधील उमेदवार शत्रुघ्न काटे यांनी प्रभागातील विविध सोसायट्यांना भेटी देत थेट नागरी संवाद साधला. प्रचाराच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा वेगळा मार्ग अवलंबत त्यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांचा आढावा घेतला. सोसायटीतील रहिवाशांनी पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, पार्किंग तसेच सुरक्षा यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले. यावेळी शत्रुघ्न काटे यांनी प्रत्येक मुद्द्याची नोंद घेत, निवडणुकीनंतर प्राधान्याने सोडवणूक करण्याचा निर्धार व्यक्त केला. “विकास हा कागदावर नव्हे, तर नागरिकांच्या दैनंदिन जीवनात दिसला पाहिजे,” असे स्पष्ट मत त्यांनी मांडले. नागरी संवादातून विश्वास निर्माण होत असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक १९ मधील अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे (अ), दीपक हिरालाल मेवानी (ब), सविता धनराज आसवानी (क), काळूराम मारुती पवार (ड) यांनी महिला युवती, भगिनींसह रविवारी, भाट नगर, बौद्ध नगर परिसरात घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला. नागरिकांनी राष्ट्रवादीच्या या उमेदवारांचे उत्साहाने स्वागत केले. अनेक ठिकाणी महिलांनी दारात रांगोळीच्या पायघड्या घालून, दारावर तोरण बांधून उमेदवारांचे औक्षण केले आणि १५ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी घरोघरी घड्याळाचे चिन्ह पोहचवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार केला. यावेळी माजी नगरसेवक धनराज आसवानी, कोमल दीपक मेवाणी, लहू तोरणे, सुनील साठे, दिनेश…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ चऱ्होली बु. येथील उमेदवार नितीन आप्पा काळजे यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ डुडुळगाव येथील पवित्र अडबंगनाथ महाराज मंदिरात करण्यात आला. दर्शन व आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आल्याने या कार्यक्रमाला धार्मिकतेसोबतच राजकीय महत्त्व प्राप्त झाले. यावेळी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच युवक–महिलांची मोठी उपस्थिती दिसून आली. “चऱ्होली बु. परिसराचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधांचे बळकटीकरण आणि पारदर्शक कारभार” ही आपली प्रमुख भूमिका असल्याचे नितीन आप्पा काळजे यांनी यावेळी सांगितले. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, शिक्षण व आरोग्य सुविधा या मुद्द्यांवर भर देत जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.…

Read More