Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक श्रमशक्ती भवन,आकुर्डी येथे पार पडली.

या बैठकीमध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे यांना पक्षाने उमेदवारी द्यावी,अशी भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरुन बोलताना पक्षाचे शहर सरचिटणीस प्रा.जयंत शिंदे म्हणाले की,राज्यात सत्तापरिवर्तन होण्यासाठी पिंपरीत परिवर्तन होणे आवश्यक आहे. यासाठी परिवर्तनवादी चळवळीतून पुढे आलेले आणि शिव-शाहू-फुले- आंबेडकर यांच्या विचारांचा पुरोगामी वारसा पुढे घेऊन जाणारे इंजि. देवेंद्र तायडे यांचा पक्षाने पिंपरी विधानसभेसाठी प्राधान्याने विचार करावा!

लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब जो उमेदवार देतील तो निवडून आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे शहरातील कार्यकर्ते एकदिलाने प्रयत्न करतील,असा विश्वास प्रा.जयंत शिंदे यांनी व्यक्त केला.

पिंपरी विधानसभेच्या उमेदवारीसाठी आग्रही असणारे देवेंद्र तायडे यांनी उमेदवारी मागणी संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की,भारिप आणि वंचितचा शहराध्यक्ष म्हणून मी शहरात काम केले आहे. अलीकडच्या काळात संविधानासमोर संकट उभे असताना पुरोगामी विचारांमधील मतविभागणीचा राजकीय फायदा सांप्रदायिक शक्तींना होऊ नये,म्हणून मी लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पक्षफुटीनंतरही पवार साहेबांबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला.
शहरातील पक्ष कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करुन,मी पक्षाकडे पिंपरी विधानसभेची उमेदवारी मागितली आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास, कार्यकर्त्यांच्या सामूहिक शक्तीच्या बळावर आम्ही विधानसभा नक्की जिंकू, असा मला विश्वास आहे.
याप्रसंगी वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप यांनी पिंपरी विधानसभेत तायडे साहेबांच्या रुपाने पक्षाला आमदार देण्यासाठी सर्व कार्यकर्ते कटिबद्ध आहेत,अशी भूमिका मांडली.
महिला अध्यक्षा ज्योतीताई निंबाळकर म्हणाल्या की, पवार साहेबांच्या भूमिकेनुसार, राजकारणात महिलांना सन्मानाची वागणूक कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे देत आहेत, ही आम्हा महिला भगिनींसाठी अभिमानाची बाब आहे.
पक्षातील सर्व जाती-धर्माच्या कार्यकर्त्यांना सतेत्त वाटा मिळवून देण्याची क्षमता तायडे साहेबांच्या नेतृत्वात आहे,असा विश्वास युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनी व्यक्त केला.

सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सचिव के. डी. वाघमारे, सेवा दलाचे शहराध्यक्ष अरुण थोपटे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष विशाल जाधव, उद्योग-व्यापार सेलचे शहराध्यक्ष विजयकुमार पिरंगुटे, पक्षाचे सरचिटणीस सचिन गायकवाड, उपाध्यक्ष विनोद धुमाळ यांसह संदीप चव्हाण, राजू खंडागळे,सुदाम शिंदे,पोपट पडवळ,संतोष माळी,बाळासाहेब शिंदे, बिरुदेव मोटे, एड.संतोष शिंदे, सागर दिघाडे, सतीश कुदळे,राहुल धनवे,राजेश रोचामनी, तुषार गाडेपाटील,नितीन मोरे,शादाब खान, जावेदमियां जागिरदार, सुहास देशमुख आदी पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र तायडे यांच्या उमदेवारीची आग्रही मागणी केली.
रेखा मोरे,कविता कोंडे-देशमुख, कमरूनिसा शेख,कमल धाहिंजे,तायरा सय्यद, स्नेहल दिघाडे,पुष्पा जानराव,आदि महिला पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र तायडे यांच्या उमेदवारीला एकमुखी पाठिंबा दर्शविला.

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच, शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी इंजि. देवेंद्र तायडे यांच्या उमेदवारीसाठी रणशिंग फुंकले!
बैठकीचे प्रास्ताविक करताना मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांनी देवेंद्र तायडे यांच्या उमेदवारी संदर्भातली भूमिका स्पष्ट केली.
बैठकीचे सूत्रसंचालन भाई विशाल जाधव यांनी केले व आभार शहर संघटक विवेक विधाते यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version