Spread the love

 

पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजपा गणेश लंगोटे यांच्या मागे ख़ंबीर पणे उभी आहे, जनतेने त्यांच्या मागे उभे रहावे असे आवाहन पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी चिंचवड येथे केले.

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा भाजपचे नवनियुक्त उपाध्यक्ष गणेश लंगोटे यांच्या मोहननगर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन  भाजप शहराध्यक्ष   शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी आमदार उमा खापरे, पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्य्क्ष अनुप मोरे, भाजपा माजी अध्यक्ष डॉ.प्रतिभा लोखंडे, शहर युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, दक्षिण भारतीय प्रकोष्ठ महाराष्ट्र अध्यक्ष राजेश पिल्ले, माजी नगरसेवक नामदेव ढाके, राजू दुर्गे आदी उपस्थित होते.

विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, माजी नगरसेवक जितेन्द्र ननवरे, नगरसेवक नारायण बहिरवाडे, मारूती भापकर, नगरसेवक प्रसाद शेट्टी, विशाल यादव (विभाग प्रमुख शिव सेना), राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी संजय जगताप, दिलीप दातीर आदी पदाधिकारी यांनी भेट दिली.

दैनंदिन जीवनात सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची सोडवणूक करण्याचा तसेच प्रत्येक कामाचा निर्णायक पाठपुरावा करण्याच्या गणेश लंगोटे यांच्या कार्यपध्दतीचे शंकर जगताप यांनी भरभरून कौतुक केले. भाजपा गणेश लंगोटे यांच्या मागे ख़ंबीर पणे उभी आहे, जनतेने त्यांच्या मागे उभे रहावे असे आवाहनही शंकर जगताप यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक गणेश लंगोटे यांनी केले. सूत्रसंचालन अनिल राऊत यांनी केले तर अविनाश गावडे यांनी आभार मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version