Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रक्षा बंधनच्या निमित्ताने वूई टुगेदर फाउंडेशन च्या वतीने आभिसार फाउंडेशन संचलित वाकड येथील दिव्यांग मुला मुलींच्या शाळेत दिव्यांग मुला मुलींना व शिक्षक वर्गाला अतिशय उत्कृष्ट मेहंदी काढण्याचा निस्वार्थी निशुल्क उपक्रम घेण्यात आला.

वूई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम सय्यद यांच्या मार्गदर्शणाने, संस्थेचे सल्लागार मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने तसेच संस्थेच्या सदस्या मंगला डोळे – सपकाळे यांच्या निस्वार्थी प्रयत्नाने व संस्थेच्या अनेक सभासदांच्या मदतीने हा एक वेगळा व मुलांना आनंददायी उपक्रम घेण्यात आला.
मेहंदी एक्स्पर्ट आर्टिस्ट पूजा जैन व त्रिशा जैन यांनी अत्यन्त उत्कृष्ट तेजस्वी मेहंदी काढण्याचे काम केले.
खर तर दिव्यांग मुला मुलींना मेहंदी काढणे म्हणजे एक कठीण कसब असते ते सर्वाच्या सहभागाने खूप छान यशस्वी केले. मेहंदी काढताना व काढल्यानंतर त्या मुलामुलीच्या चेहऱ्यावर जो आनंद तयार झाला होता त्याचे शब्दात वर्णन करता येणे  शक्य  नाही.

अभिसार फाउंडेशनचे मिनिता पाटील,सतीश इंगळे,अशोक नांगरे,रमेश मुसुडगे,कल्पना मोहिते,संतोष पठारे,अशोक जाधव,सुजाता तांबे,अभिजित तांबे,सचिन काळे,मृणाल सावंत, आदिनी यात मोलाची साथ दिली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version