Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -स्वातंत्र्य दिनानिमित्त  धैर्यशील जाधव यांच्या वतीने वाकड येथे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.

७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त वाकड येथे माजी सैनिकांचे सुपुत्र श्री धैर्यशील जाधव यांचे “डीजे नॉनव्हेज” या हॉटेल मध्ये देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम झाला.ते दरवर्षी 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी आजी माजी सैनिकांना ते निमंत्रण देतात व आपल्या हॉटेलमध्ये सन्मान करून भोजन देतात, त्यानंतर गायन देशभक्तीपर गीते कविता, शेरोशायरी विनोदी किस्से व गप्पागोष्टी असा अनोखा कार्यक्रम ते दरवर्षी आवर्जून घेतात. ह्या वर्षी 15 ऑगस्ट निमित्त हा कार्यक्रम त्यांच्या हॉटेल मध्ये घेण्यात आला. मुळशी तालुका माजी सैनिक संघ चे सर्व सदस्य अध्यक्ष, कार्याध्यक्ष आवर्जून उपस्थित होते व परिसरातील माजी सैनिकही त्या ठिकाणी उपस्थित होते. कार्यक्रम छान प्रकारे संपन्न झाला‌ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व गायक माजी सैनिक अशोक जाधव व माजी सैनिक दीपक राऊत, कवी सुभाष चव्हाण सर तसेच देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम”गीत गाता चल”* च्या टीमने केला.

 

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version