Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर प्री. प्रायमरी स्कुल, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये ७८ वा स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दहावीमध्ये प्रथम आलेले विद्यार्थी  श्रेया जालंदर खाडे, वेदांती दुर्वास कोदे, तसेच बारावीत प्रथम आलेले चंचल हिरालाल चौधरी व सना सलिम शेख यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
          संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, पश्चिम सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रकाश देशमुख, मुख्याध्यापिका, तसेच जालंदर खाडे, दुर्वास कोदे, हिरालाल चौधरी, सलिम शेख यांच्या हस्ते सरस्वती व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सर्व विभागाच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, आशा घोरपडे,  शीतल मोरे, पिंकी मणिकम, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.
        दरम्यान, दहावी व बारावीमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या वर्षपूर्तीनिमित्त कॅडेट्सना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे, नृत्य सादर केले.
          आरती राव यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व व देशाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. प्रणव राव यांनी प्रथम देश येतो, नंतर इतर सर्व, असे  सांगितले. अतुल शितोळे यांनी क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी पुढे येण्याची गरज असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना खेळामध्ये प्राविण्य मिळविण्याचे आवाहन केले.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version