Spread the love

 

भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरीचा पदग्रहण सभारंभ हॉटेल ब्लू वॉटर, रावेत येथे नुकताच पर पडला. यावेळी लायन मनिषा माने यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालण्यात आली. व क्लब च्या या सर्वोच्च अशा अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी आनंदाने स्वीकारली. या वर्षी वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन,चाईल्ड कॅन्सर, तसेच ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना लागणारी मदत अशी अनेक समाजउपयोगी कामे करण्याचा त्यांचा मानस आहे.
सचिव पदाची जबाबदारी लायन रुपाली मिरासदार तर खजिनदार म्हणून लायन राखी झोपे यांची करण्यात आली आहे.

या वेळी क्लब तर्फे पंढरीनाथ विद्या विकास मंडळ या शाळेतील विध्यार्थ्यांकरिता सायन्स लॅब साहित्य घेण्यासाठी 25 हजार रुपयांची ची आर्थिक मदत देण्यात आली.
त्याचबरोबर एच आय व्ही बाधित मुले आणि महिलांसाठी काम करणाऱ्या मानव्य या संस्थेला 21 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

यावेळी पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन बी एल जोशी, रिजन चेअर पर्सन लायन शैलजा सांगळे, निलेश पाटील,सुनील पारेख, राजेंद्र काळे, अनिल झोपे, शामकुमार माने, हिरामण राठोड, महेंद्र भुजंग,जयराम शर्मा, विजय किल्लेदार आदी मेंबर्स उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरस सिन्हा आणि प्रणाली चौधरी यांनी केले. सीमा पारेख यांनी आभार प्रदर्शन केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version