Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आपला वर्धापन दिन ९ ऑगस्ट रोजी साजरा करीत आहे. गेली २७ वर्षे वर्धापन दिनाच्या निमित्ताने नाट्य व इतर सांस्कृतिक क्षेत्रातीलराज्य व स्थानिक कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. .यंदापासून नाट्य चित्रक्षेत्रातील सन्माननीय जेष्ठ कलावंताला जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे.हा पहिला जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाट्य- चित्र अभिनेत्री  रोहिणी हट्टंगडी यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष  भाऊसाहेब भोईर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली .

हा पुरस्कार सोहळा चिंचवड येथे  प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात  हा  ९ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता होणार आहे. मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्राबरोबरच
रोहिणी हट्टंगडी यांनी अनेक मालिकांमध्येही अभिनय केला आहे. शिवाय हिंदी, तेलगु, मल्याळम,कन्नड, गुजराथी या भाषेतील चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.हिंदीतील त्यांचे गाजलेले चित्रपट म्हणजे सारांश, अर्थ, प्रतिघात, आघात, मोहन जोशी हाजीर हो, मुन्नाभाई एमबीबीएस, घातक, दामिनी आणि इतर अनेक विशेष पुरस्कार प्राप्त कलाकार आहेत, प्रसिद्ध निवेदक श्रीकांत चौगुले, अभिनेता पंकज चव्हाण, अभिनेत्री कोमल शिरभाते, लावणी नृत्यांगना आशा रुपा परभणीकर व नाट्यकर्मी नटराज जगताप यावेळी  अजित भुरे हे सत्कारार्थी  रोहिणी हट्टंगडी यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. तसेच पिंपरी चिंचवड शहरामधून विधानपरिषदेवर नुकतीच नियुक्ती झालेले कलाप्रेमी  अमित गोरखे यांचा विशेष सत्कार होणार आहे.

हा कार्यक्रम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती संघटनेचे प्रमुख कार्यवाह  अजित भुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

याबरोबरच अजून काही सन्माननीय कलावंतांना, त्यांच्या आजवरच्या कार्यासाठी गौरविण्यात येणार
आहे. रोहिणी जयदेव हट्टंगडी या अशा एकमेव भारतीय कलाकार आहेत, की ज्यांना BFTA अर्थात ब्रिटिश फिल्म अकॅडमी अवॉर्ड प्राप्त झाले आहे. त्यांना हे पारितोषिक सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री म्हणून रिचर्ड अॅटनबरो निर्मित ‘ गांधी ‘या चित्रपटातील कस्तुरबा गांधी यांच्या भूमिकेसाठी मिळाले आहे.

मूळच्या पुण्याच्या असलेल्या रोहिणी  यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्ली येथे प्रवेश घेतला
होता. त्या कथकली आणि भरतनाट्यम ही शिकल्या. त्यांनी (जयदेव हट्टंगडी) पतीबरोबर सुरू केलेल्या
‘ आशीर्वाद’ संस्थेद्वारे दीडशे नाटकांची निर्मिती व अनेक नाटकात अभिनय केला. त्यांचे चित्रपटातील
पदार्पण, १९७८ साली सईद अख्तर मिर्झा यांच्या ‘ अरविंद देसाई की अजिब दास्तान ‘ या चित्रपटात
द्वारे झाले. त्यांना दोन वेळा फिल्म फेअर अवॉर्ड आणि एकदा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version