Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिखली येथे हिंद स्वराज मित्र मंडळाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून स्थानिक नागरिकांच्या उपस्थीतित हा कार्यक्रम पार पडला.आण्णा भाऊच्या आठवणीना उजाळा देण्यात आला,

आकाशात सूर्य चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे स. का. पाटील वैगरे मंडळी तेव्हा म्हणत होते. मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे आणि त्यात बेळगाव कारवार असला पाहिजे अशी मागणी संयुक्त महाराष्ट्र चळवळीने लावून धरली.

कामगार चळवळ हिरहिरीने यात सहभागी झाली. जेव्हा मराठी माणसांचा महाराष्ट्र निर्माण झाला पण बेळगाव कारावार मात्र त्यात नव्हता तेव्हा अण्णा अण्णा भाऊंना दुःख झालं “माझी मैना गावावर राहिली” असे ते म्हणाले. दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी ३५ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य, ११ पोवाडे, एक प्रवासवर्णन आणि शेकडो लावण्या, छकडी, गाणी लिहिली यावर तुमचा विश्वास बसणार नाही.” ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून, ती कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे ” असे म्हणणारे अण्णा भाऊ ते १९६१ साली रशियाला गेले होते.

त्यांचं योगदान साहित्य सोबतच कामगार चळवळीत आणि आज तुम्हाला जो मुंबई सह महाराष्ट्र दिसतो आहे त्यात आहे. अण्णा भाऊंची आज जयंती त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी स्वी सदस्य संतोष मोरे,दिनेश यादव,सोमनाथ लोंढे, किशोर लोंढे,श्रीपाद लोंढे, सर्व लोंढे परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version