Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विशालभाऊ वाकडकर सोशल फाउंडेशन वाकड, यांच्या वतीने वाकड येथील वननेस को. ऑप. हाउसिंग सोसायटीस बाकडे सुपूर्द करण्यात आले. दिनांक 26 रोजी झालेल्या कार्यक्रमास विशाल वाकडकर यांनी उपस्थित राहत सोसायटीतील नागरिक, महिला भगिनी यांच्याशी संवाद साधला.

मागील काही दिवसांपूर्वी वननेस सोसायटीतील महिलांनी विशाल वाकडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट देऊन बाकडे मिळण्याबाबत विचारणा केली होती. परंतु लोकसभा निवडणुका आणि आचारसंहिता यामुळे त्यावेळी ते शक्य झाले नाही.परंतु आता सोसायटी बाकडे सुपूर्द करताना एक वेगळा आनंद झाल्याचे विशाल वाकडकर यांनी सांगितले.

आगामी काळातही परिसरातील नागरिकांच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील राहू असेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमास सोसायटी चेअरमन श्री शाहुराज कदम, शशिकांत गायकवाड, कालिदास जोशी, दहीवाडकर, खडकर, धोटे, शेळके यासह महिला भगिनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version