Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशामध्ये 25 कोटी चालकांची संख्या असून 45 कोटी असंघटित कामगार आहेत. त्या मध्ये फेरीवाले, हातगाडीधारक, पथारीधारक, फळभाजी विक्रेते, बांधकाम मजूर, साफसफाई कामगार, कष्टकरी कामगारांचा समावेश होतो. या घटकांना पेन्शन देणारा कायदा अस्तित्वात आला पाहिजे. सातत्याने ही मागणी होत आहे. त्याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. देशातील 25 टेम्पो, ट्रक, बस, ऑटो, टॅक्सी आदींसह सर्व प्रकारच्या चालकांसाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय चालक आयोगाची घोषणा केली पाहिजे. तसेच त्यांच्यासाठी सरकारने महामार्गावर एक हजार चालक भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद करणे आवश्यक आहे. त्याची सकारात्मक त्वरित कार्यवाही केली जाईल, अशी अपेक्षा आहे.

– बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑटो रिक्षा, टेम्पो, ट्रक, बस, टॅक्सी फेडरेशन.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version