Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काही घडामोडी घडल्या, ज्याचा उल्लेख विलास लांडे यांनी केला. अनेकांना पद दिली, ताकद दिली. काही जण बाहेर चे होते त्यांच्यात वाद होऊ दिला नाही. महाराष्ट्रात राजकीय स्थित्यंतरे घडली. उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे, शाहू, फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही. डीपीडीसी बैठकीमध्ये कोण किती वेळ बोलले आणि अजित पवार यांनी किती ऐकलं याचं रेकॉर्ड आहे. पण उगाच सहानुभूती घेण्यासाठी काहीजण म्हणतात की मी साहेबांना बोलू दिलं नाही. अरे मी कसा बोलू देणार नाही. काय घडलं, काय नाही याच्या खोलात जात नाही, आम्ही कोणाचाही अनादर करणारे लोक नाहीत, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज काळेवाडी येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले.

काळेवाडी येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.आमदार अण्णा बनसोडे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आमदार विलास लांडे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, राजू मिसाळ, नाना लोंढे, मोरेश्वर भोंडवे, प्रसाद शेट्टी, डब्बू आसवांनी, विनोद नढे, अतुल शितोळे, नारायण बहिरवाडे, संतोष कोकणे, कार्याध्यक्ष फझल शेख, युवा नेते सिद्धार्थ बनसोडे आदी उपस्थित होते.

तुमची लोकसभेची सूज विधानसभेत उतरवू, अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी अमोल कोल्हेंवर पलटवार केला.अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आज पिंपरी चिंचवडमध्ये होत आहे, येथील भाषणात बोलताना रुपाली चाकणकरांनी कोल्हेंवर बोचरी टीका केली. तर, अजित पवारांनीही गुलाबी रंगावर भाष्य केलं.

अजित गव्हाणे यांनी साथ सोडल्यामुळे रिक्त झालेल्या शहराध्यक्ष पदाबाबत आज अजित दादा पवार यांनी चाचपणी केली. सर्व कार्यकर्त्यांची चर्चा केली. शहराध्यक्ष पदाकरिता अनेक जण इच्छुक आहेत. लवकरच त्याबाबत निर्णय घेणार असून नवीन कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात येईल. त्यात सर्व जाती धर्माचा समावेश करण्यात येईल असे अजित पवार म्हणाले.

 

 

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version