Spread the love

मेघराज लोखंडे नागरिकांचे प्रश्न घेऊन
ॲक्शन मोड वर…!

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नवी सांगवी साई चौक येथे ५ ते ६ वर्षापासून तुंबलेले ड्रेनेज व ड्रेनेज लाईन साफ होत नसल्याने व हॉटेल व्यापाऱ्यांचा कचरा ड्रेनेज लाइन मध्ये जाऊन लाईन तुंबल्याने नागरिकांना ५ वर्षा पासुन तीव्र मनस्ताप सहन करावा लागत होता या संदर्भात नागरिकांनी वारंवार महानगरपालिका अधिकारी यांना निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी कामाची दखल घेत नसल्यामुळे या मेघराज लोखंडे हे ॲक्शन मोड वर येऊन नागरिकांचे प्रश्न सोडवत आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, सिद्धी पार्क नवी सांगवी येथील नागरिकांनी मेघराज लोखंडे यांची भेट घेऊन तक्रारी केली दुसऱ्या दिवशी मेघराज लोखंडे यांनी स्वतः कामाची पाहणी करत म.न.पा अधिकाऱ्यांना फोन लावून सूचना देऊन अर्ध्या तासात तुंबलेले ड्रेनेज साफ करून घेतले व लवकरच या ठिकाणी ड्रेनेज लाईन पूर्ण साफ करण्यात येईल व नागरिकांना कुठल्याही प्रकारचा मनस्ताप व त्रास सहन करावा लागणार नाही नागरिकांची दखल घेण्यात येईल नागरिकांच्या आरोग्यासोबत कोणत्या ही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. तसेच काम पूर्ण होईपर्यंत मी व  सहकारी कामाचा आढावा घेत राहतील असे मेघराज लोखंडे यांनी प्रसिद्ध पत्रात म्हणले आहे.

यावेळी अवधूत कदम,कार्तिक कदम,आशिष खत्री,अभिषेक गिरी, रेखा चिवे,संध्या सूर्यवंशी,अतुल बोंडे,गोपाळ सुर्यवंशी,अनुसया काळे,अलका कापडे,वैशाली भोसले व श्री .जोशी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version