Spread the love

ओम प्रतिष्ठान संस्थेची गरजू मुलींसाठी योजना

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘ती’ च्या शैक्षणिक शुल्काची जबाबदारी घेणायस विद्यादान योजना सज्ज झाली आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्षा  वनिता सावंत यांनी दिली.

समाजातल्या प्रत्येक घटकाला शिक्षण घेत आयुष्य घडवायचा हक्क आहे मग तो मुलगा असो किंवा मुलगी! त्यात आर्थिक दृष्ट्या दुर्बल पण गुणवंत अश्या हुशार मुलीं आहेत. ज्यांना १० वी नंतर च्या शिक्षणाची फी भरणात अडचण येत आहे. अश्या मुलींना मदत करण्यासाठी ओम प्रतिष्ठान ने विद्यादान योजनेचा संकल्प केला आहे आणि संस्था हे कार्य मागील ४ वर्षांपासून करत आहे.

नेमकी काय आहे ही विद्यादान योजना ?

गरजू मुलींना शिष्यवृत्ती – शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी मदत, कौशल्य विकास-मुलींच्या उपजत कौशल्य विकासासाठी सहाय्य करियर मार्गदर्शन, मुलींना तात्काळ
स्वतच्या पायावर उभे राहण्यासाठी उपयोगी माहिती पुरवणार.
मुलींची निवड प्रक्रिया –
१० वी ची परीक्षा उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी या योजनेसाठी पात्र आहे.
इयत्ता १० वी ची गुणपत्रिका, आधारकार्ड, वडिलांचा उत्पन्न दाखल आवश्यक
मुलींची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन निवड केली जाईल.
जर मुलगी गुणवंत असेल तर फीज भरण्याची अडचण तिच्या सामोरी येऊ नये आणि तिचे शिक्षण सुरू राहावे हीच ओम प्रतिष्ठानची इच्छा आहे. ज्या मुली या योजनेचा भाग बनू इच्छितात त्यांनी अर्ज भरण्यासाठी पुढील वेबसाइट वापरावी ompratishthan.org.in
अर्ज भरण्याची तारीख : १५ जुलै ते ३० ऑगस्ट
अर्ज करण्यात काही अडचण आल्यास संपर्क : 8010925297.शैक्षणिक मदत देण्याचे अथवा नाकारण्याचे अधिकार संस्थेकडे राखीव आहेत.
मुलींसाठी निवासव्यवस्था: ज्या मुली पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या आहेत आणि राहण्यास जागा मिळत नाही त्यांची विद्यादान योजने
कडून राहण्याची सोय केली जाईल. ही संस्था वंडर लैंड स्कूल, गुलमोहोर पार्क, गुरुद्वारा चौक, वाल्हेकरवाडी येथे आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version