Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ,पुणे गट कार्यालया अंतर्गत महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र, उद्योग नगर,चिंचवड येथे,जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कामगार सुखी जोडप्यांचा सत्कार समारंभ  आयोजित करण्यात आला होता.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.जयंत हर्षे जनरल मॕनेजर प्रिमियम ट्रान्समिशन लि.चिंचवड  ईश्वर भोंग ( असि.मॕनेजर प्रिमियम ट्रान्समिशन लि. चिंचवड, डॉ.आदिती तांबिले स्त्री रोग तज्ञ,  श्रीमती शलाका कोऱ्हाळे (सिनीयर एक्झिक्युटिव्ह एच आर प्रिमियम ट्रांसमिशन लि. चिंचवड. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष-डॉ.अभय तांबिले  सचिव-नँशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन,पिं.चिं. मनपा, चेअरमन-ESIS कमिटी निमा महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला .

सत्कार्थी – सिध्दप्पा रामू माळी* *२ मुली* (टाटा मोटर्स,पिंपरी),संदीप बाबुराव टोपे२ मुली (ACG Pharma),सतिश बबन शेलार *२ मुली (कारमन ट्रांसपोर्ट), संदीप कोंडीबा साळुंके*२ मुली (कमिंस इंडिया लि), किरण दण्यानेश्वर धुमाळ २मुली* (SFS)यांस ५०००/- ₹ धनादेश,शाल ,भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी कामगार भुषण डाॕ.मोहन गायकवाड, गुणवंत कामगार राजेश हजारे,शंकर नाणेकर युनीयन प्रतिनिधी नितीन आकोटकर,शंकर देशमुख,मुस्तफा मुलाणी,शिवराज शिंदे, प्रकाश चव्हाण ,संदीप रांगोळे आदी  उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक व स्वागत  मनोज पाटील ( प्र.सहा.कल्याण आयुक्त पुणे )यांनी केले.तसेच सूत्रसंचालन  सुनिल बोरावडे यांनी केले तर आभार प्रदीप बोरसे ( केंद्र संचालक,उद्योग नगर,चिंचवड) यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरता अनिल कारळे, अरुण वाडकर,अश्विनी दहितुले, माया कदम, सुहास भोसले,शंकर शेलार ,भास्कर मुंडे, सतीश चव्हाण, भरत शहापूरकर संयोजन केले केली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version