Spread the love

 

आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर दोन वर्ष मोबाईल कमी वापर :- ब.ही. चिंचवडे

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष रोहिणी ताई खडसे व विभागीय अध्यक्ष भारतीताई शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने दहावी तसेच बारावीमधे यश संपादित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार चिंचवड येथील आनंदीबाई डोके सभागृह येथे पार पडला. तसेच विद्यार्थ्यांना करिअर गायडेन्स व्याख्यान ठेवण्यात आले. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी इतिहास तज्ञ गड किल्ले सेवा समितीचे शिलेदार ब.ही. चिंचवडे सर हे प्रामुख्याने उपस्थित होते.विद्यार्थ्यांना त्याचबरोबर पालकांना त्यांनी उत्कृष्ट असे मार्गदर्शन केले . याप्रसंगी पिंपरी चिंचवड शहराचे युवकअध्यक्ष इम्रानभाई शेख,शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे,सामाजिक न्याय विभागाचे मयूर जाधव,माजी उपमहापौर विश्रांती पाडाळे माजी नगरसेविका प्रियांका बारसे शहराचे प्रवक्ते माधव पाटील,युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर चिंचवड विधानसभा अध्यक्ष स्वप्नाली आसुले कार्याध्यक्ष सुवर्णा वाळके,वरिष्ठ मार्गदर्शक प्रिया देशमुख,विद्यार्थी अध्यक्ष राहुल आहेर,भोसरी विधानसभा अध्यक्ष सारिका हरगुडे,रेखा मोरे तायरा सय्यद कल्पना घाडगे कीर्ती तोरणे मेघराज लोखंडे संतोष शिंदे संतोष माळी,नितीन मोरे,अथर्व शिंदे,लता मकासरे कमल धाईंजे,रेहान सय्यद ,कल्पना पुष्पा,गोपाळेतसेच मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी व महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्पाताई जाधव यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version