Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरीमध्ये शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत २० जुलै रोजी ‘विजयी संकल्प मेळावा’ होणार आहे. त्यावेळी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक मोठ्या संख्येने प्रवेश करणार असल्याची माहिती शहरात पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दिली आहे. पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानावर या मेळाव्याकरिता जोरदार तयारी सुरू झाली आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे याठिकाणी पूर्णपणे बंदिस्त असा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत आहे.

पिंपरी- चिंचवड शहरातील अजित पवारांची ताकद शरद पवार गट कमी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाचे माजी नगरसेवक यांच्यासह अजित पवारांच्या जवळचे स्थानिक नेते शरद पवार गटात येणार असल्याची माहिती तुषार कामठे यांनी दिली आहे.

२० जुलै रोजी विजयी संकल्प मेळावा पिंपरीतील नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे. याच सभेत अजित पवार गटाचे माजी नगरसेवक, पदाधिकारी हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नव्वद टक्के माजी नगरसेवक हे शरद पवार गटाच्या संपर्कात असून ते शरद पवार गटात येण्यास इच्छुक आहेत. पैकी एक गट २० जुलै रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षात येणार असेही तुषार कामठे यांनी म्हटले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version