Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील गीता मंदिर प्राथमिक शाळेत आज वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.सर्व प्रथम विद्यार्थ्यांनी पर्यावरण प्रतिज्ञा म्हटली .शाळेचे मुख्याध्यापक श्री महेंद्र भोसले यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व सांगितले.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.

विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयक घोषवाक्य, चारोळ्या, गांणी सादर केली.मुख्याध्यापकांच्या, शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेच्या बागेत फुलझाडांची रोपे लावण्यात आली.कार्यक्रमाचे संयोजन  मंदा कोकरे यांनी केले. संगिता शहासने, चंदा नामदे, ज्योत्स्ना वाव्हळ, राजश्री गायकवाड, सुनिता धोंडगे सर्व शिक्षक कार्यक्रमात सहभागी झाले होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version