Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी चे नववा पदग्रहण सोहळा जैन इंग्लिश स्कूल येथे संपन्न झाला. रोटरी क्लबचे किरण ओसवाल यांनी नवीन अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.

जैन इंग्लिश स्कूल या ठिकाणी पार पडलेल्या या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल मोहन पालेषा उपस्थित होते. प्रसिद्ध विधीतज्ञ सोहनलाल जैन यांच्या हस्ते याप्रसंगी चिंचवड येथील कमला शिक्षण संकुलाचे संस्थापक, सचिव डॉ. दीपक शहा यांचा तळेगाव रत्न पुरस्कार पुणेरी पगडी, शाल, पुष्पगुच्छ व भव्य स्मृती चिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

डॉ.दीपक शहा यांचे कौतुक करताना, त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना तळेगाव रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. असे, प्रतिपादन प्रमुख पाहुणे व माजी प्रांतपाल व सोहनलाल जैन यांनी व्यक्त केले.

तळेगाव शहर हे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक शहर म्हणून ओळखले जाते आणि माझ्या या घरच्या गावात मला मिळालेला हा पुरस्कारामुळे माझी सामाजिक जबाबदारी निश्चितच वाढलेली आहे, असे उद्गार कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ.दिपक शहा यांनी काढले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version