Spread the love

 

जयंतीनिमित्त कष्टकरी कामगारांकडुन अभिवादन

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- गरीब आणि वंचित समुदायातील मुलांसाठी अनेक शाळा आणि महाविद्यालये स्थापन आणी सामाजिक परिवर्तनासाठी आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले जीवन समर्पित केले असे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज कष्टकरी कामगारांकडून विनम्र अभिवादन करण्यात आले.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, फेरीवाला क्रांती महासंघ, बांधकाम कामगार समिती यांच्याकडून आज राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, समन्वयक नाना कसबे, ओमप्रकाश मोरया, इरफान चौधरी,दिनेश कदम,राजेंद्र भोसले, राधा बनसोडे, विजया पाटील, अर्चना कांबळे, सुधीर मोरे यांचे सह विविध क्षेत्रातील कामगार उपस्थित होते.

नखाते म्हणाले स्पिनींग अँड विविंग मिलची स्थापना शाहूपुरी येथे केली आणी गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती केली, शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थाची स्थापना करून शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न केला. शेती, उद्योग, सहकार या क्षेत्रात नव नवीन प्रयोग करून कामगारांना काम उपलब्ध व्हावं यासाठी त्यांनी रस्ते आणि धरणांचे कामे सुरु केले. शाहूने अनेक क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे कामे केली आणि ती आजरामर राहिली कष्टकरी कामगारांना काम मिळावे आणि मिळालेल्या कामाच्या मोबदला मिळतो का नाही ? हा ठेकेदार आणि त्यांच्या मुकादमाला ते वारंवार तंबी देत. कामाबाबत आपुलकीने विचारणा करायचे कामगारांचा पगार प्रत्येकाला प्रामाणिकपणे मिळावा ही त्यांची धारणा होती असे राजश्री शाहू महाराज यांना आम्ही मानाचा मुजरा करतो.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version