Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध कामांमध्ये ठेकेदारांनी रिंग केल्याने सदर कामे रद्द करून फेरनिविदा करणे, अशी मागणी नाना काटे यांनी प्रभारी आयुक्त राहुल महिवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध कामे करण्यासाठी मार्च 2024 मध्ये निविदा झाली असून त्याच वेळी याची प्रक्रिया अर्धवट केली असून आज पर्यंत कुठल्याही कामाबाबत कोणतेही आदेश दिले नाहीत. मामुर्डी सांगवडे या ठिकाणी असणाऱ्या पुलाबाबत तर ए आर कन्स्ट्रक्शन या ठेकेदारासाठी संपूर्ण कागदपत्रे घेऊन ए  आर कन्स्ट्रक्शन व टी अँड टी इन्फ्रा. लि. या दोन ठेकेदारांना पात्र करून नेहमी काम करणाऱ्या अनेक ठेकेदारांना अपात्र केले आहे.

          या पुलाचे काम ए आर कन्स्ट्रक्शन यांना मिळणार असून हे आपणांस टेंडर पाकीट क्र.२ उघडण्या अगोदरच सांगत आहे. त्यामुळे हे काम रद्द करून या कामात अपात्र ठेकेदारांना कायमस्वरूपी अपात्र करून कामाचे टेंडर पुन्हा करावे. महानगरपालिकेकडे नेहमी काम करणारे ठेकेदार ठराविक कामात अपात्र होत असतील तर त्यांना कायमस्वरूपी अपात्र करावे.

         सदर कामांच्या निविदा उघडल्या नसून त्यापूर्वीच रद्द करण्याची व फेर निवीदा करण्याची मागणी करीत आहे. कागदपत्र देण्याची ठराविक मुदत असताना 3 महिने कामाबाबत निर्णय घेतला जात नाही तर अशी सर्व कामे रद्द करून पुन्हा टेंडर काढावे व नवीन वर्क ऑर्डर द्याव्यां.  असे पिं.चिं. मनपा प्रभारी आयुक्तांना मा. विरोधीपक्ष नेते नाना काटे यांनी मागणी केली आहे. 

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version