Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दोन दिवसात पंढरपूर पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान होत आहे.या पालखी सोहळ्यास मोठ्या प्रमानात वारकरी, भाविक पायी वारी करीत असतात. वारकरी,भाविकांचे आरोग्य योग्य राहावे यासाठी मधुकर बच्चे युवा मंच,चैतन्य ग्रुप व वूई टुगेदर फौंडशेन यांच्या पुढाकाराणे लोकसहभागातून मोठ्या प्रमानात औषधे दिली जातात.यावर्षी सुद्धा या वारीतील वारकरी व भाविकासाठी मोठ्या प्रमाणात औषधे देण्यात आली.

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गेली 30 वर्षे या दिंडी सोहळ्यात पूर्ण वेळ आरोग्य सेवा देत आहे.अनेक डॉ. नर्स,ऍम्ब्युलन्स, स्वयंसेवक,कार्यकर्ते पूर्णवेळ आरोग्य सेवा देतात .

मधुकर बच्चे युवा मंच,चैतन्य ग्रुप,व वूई टुगेदर फौंडेशन च्या वतीने गेली 15 वर्षे विश्व हिंदू परिषेधेकडे सर्व औषधे सुपूर्द केली जातात.या वर्षी सुद्धा विश्व हिंदू परिषद पदाधिकारी यांच्याकडे मोठ्या प्रमानात औषधे सुपूर्द करण्यात आली.
केशवनगर चिंचवड मध्ये हा कार्यक्रम पार पडला.
महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य,भाजपा शहर सचिव, मधुकर बच्चे, यांच्या पुढाकाराने हा यशस्वी उपक्रम गेली 15 वर्षे सुरु आहे.

या वर्षी वूई टुगेदर फौंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सभासद यांनी मोलाची मदत केली.
फौंडेशनच्या वतीने संस्थापक क्रातिकुमार कडुलकर,अध्यक्ष:सलीम सय्यद,खजिनदार:दिलिप चक्रे,रवींद्र काळे,जयंत कुलकर्णी,एस जोशी,नीलकंठ कुलकर्णी, मंगला सपकाळे, आदी वूई टुगेदर फौंडेशनचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
मधुकर बच्चे युवा मंच व चैतन्य फार्मा ग्रुप वतीने पोपट बच्चे,गणेश बच्चे,अर्चना बच्चे, रोहिणी बच्चे,श्रुती तोरडमल,श्रावणी बच्चे,काजल गावडे – बच्चे, आकाश खिल्लारे,दत्ता औंदकर ,सिंधू बच्चे,असावरी बच्चे,अक्षय गारगोटे,रंजना गारगोटे,आदिनी या उपक्रमात मोलाचे सहकार्य केले.
विश्व हिंदू परिषेदच्या वतीने डॉ. जगताप,गोविंद देशपांडे,यशवंत देशपांडे,पूजारी पी.सां. वाठारकर, शेखर राऊत ,जयंत खेडकर, आदी पदाधिकारी यांच्याकडे सर्व औषधे सुपूर्द केली.

पिंपरी चिंचवड केमिस्ट असो.माजी अध्यक्ष संतोष खिवंसरा,कुंदन एजन्सी अजय दर्डा, मोरया फार्मा ग्रुप चे मारुती हाके,पियुष गुप्ता,निलेश गाडगे,अमोल पाटील, राजु म्हस्कर, उत्तम विटुळे,प्रशांत प्रधान ,आदिनी या उपक्रमात सेवा म्हणून औषधे देऊन सहकार्य केले.

जनसेवक मधुकर बच्चे यांनी सूत्रसंचालन केले.
संस्कृती संवर्धनचे डॉ.अजित जगताप,गोविंद देशपांडे,सलीम सय्यद,मंगला सपकाळे,जयंत कुलकर्णी, श्रुती तोरडमल आदिनी या उपक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त केले .
चैतन्य ग्रुपच्या अर्चना बच्चे यांनी सर्वांचे आभार मानले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version