Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुरणवस्ती येथे असंघटित कामगार विविध कंपन्यांमध्ये हमालीचे काम करणारे कामगार, भारतभर कंपन्यानी उत्पादित केलेल्या गाड्या व सुट्टे भाग घेऊन जाणारे वाहन चालक तसेच वाड्या वस्तीवरील रोजंदारीवर काम करणारे गोरगरीब कामगार यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला यामध्ये जवळपास 150 नागरिकांनी फायदा घेतला यामध्ये शुगर, बीपी, हाडाची ठिसूळता, रक्तवाहिन्यातील चरबीचे प्रमाण, डोळे तपासणी बरोबर आपल्याला कोणता भविष्यात आजार होऊ शकतो त्यानुसार अदाज काढून डॉक्टरांनी त्यावरील उपचार व सल्ला देऊन, आहार कोणता घ्यायचा व घ्यावयाची काळजी याची माहिती शिबीरात दिल्याचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड  यांनी सांगितले .

उपस्थित असलेल्या निघोजे गावच्या सरपंच सौ सुनीता येळवंडे म्हणाल्या की गावाच्या वाड्या वस्तीवर आपण येऊन खूपच चांगले शिबिराचे आयोजन केले. महाराष्ट्रासह अनेक  परराज्यातून पोटासाठी आलेला मजूर, वाहन चालकाचे आपल्या शिबिरामुळे त्यांच्या आजाराचे निदान झाले. आर्थिक परिस्थितीमुळे कामगार आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात यामुळे आम्ही असे शिबिर आमच्या गावात घेणार असल्याचे सरपंच सौ सुनीता येळवंडे यांनी सांगितले.
“आपले आरोग्य ,आपली जबाबदारी “या अंतर्गत शिबिर घेतल्याची गुणवंत कामगार शंकर नाणेकर यांनी सांगितले.आम्ही पण मजूर अड्डे ,झोपडपट्टी तसेच कामगार वस्ती सारख्या भागात असे आरोग्य शिबिर यापुढेही घेणार असल्याचे गुणवंत कामगार शंकर नाणेकर यांनी यावेळी सांगितले.
गुणवंत कामगार संगिता जोगदंड म्हणाल्या कि सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत “आला पावसाळा आरोग्य सांभाळा” असा सल्ला देत मलेरिया ,डेंगूपासून काळजी घेण्याची आव्हान केले,उघडयावरील पदार्थ न खाल्ल्याचा सल्ला दिला.

शिबिराचे उद्घाटन निघोजे गावच्या सरपंच सौ सुनीता येळवंडे, मानवी हक्क संरक्षण जागृती शहराध्यक्ष अण्णा  जोगदंड,व्हिजश प्रमुख राजेश पाठक, गुणवंत कामगार शंकर नाणेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच सौ सुनीता येळवंडे, शहराध्यक्ष आण्णा जोगदंड ,गुणवंत कामगार शंकर नाणेकर ,मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा सौ संगिता जोगदंड,व्हिजन ग्रुपचे राजेश पाठक ,विविध विकास सोसायटीचे अध्यक्ष कैलास येळवंडे ,शाळेचे मुख्याध्यापक सुखदेव मुंगसे,जिल्हा परिषद व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल आंद्रे, एचडीएफसी शाखा व्यवस्थापक सोपान नाणेकर,समर्थ पतसंस्थेचे सल्लागार प्रकाश जामदार ,ग्रामपंचायत सदस्य हिरामण येळवंडे, प्रगतशील शेतकरी मारुती येळवंडे,उद्योजक नामदेव नाणेकर,वर्षा नाणेकर, डॉ. श्रदा सातकर ,कोच नीता नाळवंडे,विनिता गायकवाड, नितीन नाळवंडे यांनी शिबिरात सहभाग नोंदला तर शिबिर यशस्वी होण्यासाठी अभय नाणेकर, रोहित रॉय ,विनीत नाणेकर, राजेश कुमार लोधी ,गुणवंत कामगार शंकर नाणेकर यांनी परिश्रम घेतले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version