Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शैक्षणिक वर्ष 2024-25 ला संपूर्ण महाराष्ट्रात 15 जूनला सुरू होत आहे. त्याचेच औचित्य साधून आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा रावेत क्र. ९७ येथे पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस सहाय्यक आयुक्त  राजू मोरे तसेच  मोरेश्वर  भोंडवे नगरसेवक यांच्या उपस्थित त्यांनी पहिलीच्या वर्गात शिक्षण घेण्यासाठी त्यांचे पहिले पाऊल टाकण्यास सुरुवात करणार आहेत. त्यामुळे त्यांना त्या लहान बाळगोपाळणा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या बोटाला पकडुन वर्गापर्यंत दोघेही घेऊन गेले. त्या नंतर त्या सर्व पालकांनच्या सोबत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून चॉकलेट आणि पुस्तके देऊन वर्गात बसवण्यात आले.

प्रवेश उत्सहवास कार्यक्रम सुरू करताना विद्येची देवता सरस्वतीचे पूजन  राजू मोरे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड,पोलीस उपनिरीक्षक गिरी  तसेच रावेतचे विकास भिमुख नगरसेवक  मोरेश्वर भाऊ भोंडवे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हेमंत साठे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंचशील आगळे व इतर सदस्य , रुपाली कड ,चारुशीला जाधव , पवार रामेश्वर, घुगे पांडुरंग तसेच शाळेतील सर्व शिक्षक व पालक यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त मोरे साहेबांनी मुलांना व पालकांना एक महत्वाचा संदेश देत सांगितले की तुमचे मुले खूप नशीबवान आहेत. त्यापेक्षा तुम्ही पण त्यांच्या पेक्षा अधिक नशीबवान आहात कारण की आपण आशिया खंडात श्रीमंत असणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका असलेल्या शाळेत प्रवेश घेत आहेत. ज्या ठिकाणी सर्व सुख सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व प्रशिक्षित शिक्षक वर्ग मुलांना शाळेत ये जा करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व नगरसेकांनीही प्रयत्न करून वाहतुकीची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या पाल्यांना एक महान संधी मिळाली आहे. त्याचं तुम्ही व पालकांनी प्रयत्न करून आमच्या सारखे अधिकारी घडवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

मोरेश्वर  भोंडवे यांनी त्यांच्या मनोगतात याच वर्षी 10 वीच्या पाहिल्या वर्षीचा निकला 100% लागला आहे त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांचे खूप खूप अभिनंदन केले. त्यांना 10 विच्या विद्यार्थांनी दिलेला शब्द पाळला आहे. तसेच हे आमचे बालगोपाल ही साहेब आपल्या प्रमाणे अधिकारी बनून देशाची सेवा करतील असे सांगितले.

या वेळी कार्यक्रम यशस्वी करणारे शिक्षक वृंद सुचिता असोदे , इयत्ता पहिलीच्या वर्ग शिक्षिका सोनाली ढुमणे , निशा यादव, सुखदेव वीर ,शशिकांत चौधरी, शुभांगी गावडे दिपाली शिंपी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग घुगे यांनी केले.तर आभार रुपाली कड यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version