Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी नेहरूनगर न्यायालयातील नवनियुक्त न्यायाधीश व्ही.एन.गायकवाड,  ए.एम. बगे, श्रीमती.एम.ए.आवळे,  बी.डी. चोखट, श्रीमती.टी.एस.महाडिक,  एस.एन.गवळी, अल अमूदी ए.के. श्रीमती.एस.एस.चव्हाण यांचे स्वागत पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् असोशिएशनच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

यावेळी पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश एन.आर गजभिये (प्रमुख न्यायाधीश) व  एम.जी.मोरे उपस्थित होते. या वेळी असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड.प्रमिला हरीश गाडे यांनी उपस्थित वकील बंधू – भगिनींच्या वतीने नवनियुक्त न्यायाधीश साहेबांचे स्वागत करून मनोगत व्यक्त करण्यात आले.

स्वागत समारंभानंतर नवनियुक्त न्यायाधीश यांच्या वतीन न्यायालयाचे न्यायाधीश पिंपरी न्यायालयाचे प्रमुख न्न्यायाधीश एन.आर गजभिये व .एम.जी.मोरे साहेब यानी स्वागत समारंभाबद्दल उपस्थितांचे आभार मानून मनोगत व्यक्त केले. पुढे साहेब म्हणाले की, पिंपरी न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 5 वरून 10 झाली आहे.

न्यायालयीन कामकाजाची विभागणी होऊन खटले लवकर निकाली निघण्यास मदत होणार आहे. त्याकरिता वकील बंधू आणि भगिनींनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. या स्वागत समारंभाच्यावेळी माजी अध्यक्ष ॲड.नारायण रसाळ, ॲड.सुनील कडूसकर, ॲड.किरण पवार, माजी उपाध्यक्ष ॲड.प्रतिक जगताप, ॲड.पांडुरंग शिनगारे, ॲड.योगेश थांबा, ॲड.अरुण खरात, ॲड.बी.के कांबळे, ॲड.पूनम शर्मा, ॲड.संगीता कुशलकर, ॲड.पूनम राऊत, ॲड.सविता तोडकर ॲड.संतोष मोरे  आदी वकील उपस्थित होते.

या स्वागत समारंभाचे आयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲड.गोरख कुंभार, महिला सचिव ॲड.वर्षा तिडके – कांबळे, खजिनदार ऐश्वर्या शिरसाठ, सदस्य ॲड.जयेश वाकचौरे, ॲड.साक्षी धुमाळ, ॲड.तेजश आदी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version