Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विजय जगताप हे स्व आमदार लक्ष्मणभाऊ जगताप व भाजप शहारद्यक्ष्य श्री शंकरभाऊ जगताप यांचे बंधू असून कुशल शेतकरी व यशस्वी बांधकाम व्यवसायिक, गोमाता प्रेमी असुन धार्मिक कार्यांमध्ये नेहमी अग्रेसर असतात त्यांचा अन्नदाना मध्ये कोणी हात धरणारा नाहि ते खूप मोठे अन्न दाते असुन गोमाता प्रेमी आहेत, वारकरी संप्रदयास नेहमी मान सन्मान देणारे व्यक्तीमत्व अशी यांची पंचक्रोशी मध्ये ख्याती आहे.

यांचा वाढदिवस ३ जून रोजी होता. परंतु ६ जुन गुरुवार रोजी योग साधून नारायणपूर दर्शन बस चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी खूप मोठ्या प्रमानात प्रतिसाद देऊन दत्त महाराजांचा जय गोष करत प्रवासाचा आनंद लुटला, तसेच मा. विजयशेठ जगताप यांना वाढदिवसानिमित्त शुभेछा देऊन त्यांच्या दिर्घ आयुष्यासाठी दत्त महाराज यांच्या कडे प्रार्थना केली व विजयशेठ जगताप यांना वारकरी भूषण पुरस्कार मिळाल्या बदल त्यांचे अभिनंदन करून या कार्यक्रमाचे निमंत्रक भाजपा शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप आणि आयोजक भाजपा उपाध्यक्ष ललित जालिंदर म्हसेकर यांचे सर्वांनी खूप आभार मानून कौतुक केले .

लोकांना देवदर्शनाला घेऊन जाणे हे पुण्य कुणाच्याही नशिबात नसत ते पुण्यवान माणसाच्याच हाती असते, आज पासुन आयोजक ललित म्हसेकर हे सर्व नागरिकांचे श्रावण बाळ आहेत या शब्दात नागरिकांनी कौतुक केलं.

यावेळी ललित म्हसेकर म्हणाले, प्रथमतः मी परिसरातील सर्व नागरीकांने दिलेला प्रतिसाद पाहता परिसरातील नागरिकांचे खूप खूप आभार मानतो, असाच प्रतिसाद आपण सर्वनी प्रत्येक वेळेस आशीर्वाद रुपी द्यावा हि आपना सर्वच्या चरणी विनंती, तसेच मला अध्यात्माची वाट हि मा श्री विजयशेठ जगताप यांनी दाखवून आपण लोकसेवेसाठी नेहमी कार्य करावे लोकांसाठी झटावे हि शिकवण आम्हला दिली आहे,यामुळें शेठ च्या वाढदिवसानिमित्त नागरीकांना मोफत दत्त महाराज दर्शन बस सेवा देण्याचा मायबाप जनतेची सेवा करण्याचा छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे, मी आपणास यानिमित्त शब्द देतो की, विजय जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त  शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रत्येक वर्षी नागरीकांना देव दर्शनाला घेऊन जाणार आहे व हे माझ प्रथम वर्ष आहे या वर्षी पेक्षा नक्कीच उत्तम नियोजन पुढच्या वेळेस मी करेल.

या कार्यक्रमाला विशेष सहकार्य भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप , पीएमपीएल डेपो मॅनेजर  भास्कर दहातोंडे व पीएमपीएल कर्मचारी यांनी केलें.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version