Spread the love

 

महापालिका अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवूनही शहर भाजप पदाधिकाऱ्याच्या आशीर्वादाने सुरु आहे बांधकाम

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव येथे स्वतःची पाऊणगुंठा जागा असतानाही सव्वा गुंठा जागा ताब्यात घेऊन अनधिकृत बांधकाम सुरु आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवूनही शहर भाजप पदाधिकाऱ्याच्या आशीर्वादाने हे धोकादायक बांधकाम सुरु आहे. याबाबत महापालिका आयुक्त, कार्यकारी अभियंता, बांधकाम परवानगी व अनधिकृत,
बांधकाम नियंत्रण विभाग, उपअभियंता, बांधकाम परवानगी व अनधिकृत, बांधकाम नियंत्रण विभाग ‘ड’ प्रभाग, तसेच महापालिकेच्या ऑनलाईन प्रणालीवर तक्रार करूनही अनधिकृत बांधकाम जोरात सुरु आहे. निकृष्ट दर्जाचे हे बांधकाम आजूबाजूच्या नागरिकांना धोक्याचे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम वेळीच थांबविण्याची मागणी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात अरुण पवार यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की विठ्ठल मोरे या व्यक्तीने सर्व्हे नं ७५, हिस्सा नं १अ/१अ/१क पिंपळे गुरव रत्नाई कृपा या बिल्डींग शेजारी अनधिकृत बांधकाम चालू केले आहे. सदरचे बांधकाम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे आहे. तसेच विठ्ठल मोरे यांची ७/१२ प्रमाणे जागा ७५० स्के. फुट म्हणजे पाऊन गुंठा असताना त्यांनी चारही बाजूने जागा न सोडता शेजारील रहिवास्यांना त्रास होईल, अशा पद्धतीने बांधकाम सुरु केले आहे. त्यांच्या मालकी हक्काची जागा ७५० स्के. फुट असताना त्यांनी १२५० स्के. फुट जागा ताब्यात घेवून सदर जागेमध्ये बाधंकाम चालू केले आहे. तसेच रस्त्यामध्येही काही प्रमाणात अतिक्रमण केल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.
ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून व त्यांना सरकारी मोजणी करून तुमच्या जागेत बांधकाम करून घ्या, असे आजूबाजूच्या रहिवास्यांनी सांगितले. मात्र, मोरे हे आरे तुरेची भाषा वापरून ‘काम थांबवणार नाही, तुम्हाला जे हवे ते करा’, असे उद्धटपणे बोलत आहेत.
याबाबत बोलताना अरुण पवार यांनी सांगितले, की विठ्ठल मोरे यांचे पहिला सेंट्रींग कॉन्ट्रॅक्टर जो काम करत होता त्यांनी महानगरपालिकेची नोटीस आल्यानंतर काम जागेवर थांबवले होते त्यानंतर पिंपरी चिंचवड शहराचे भाजपा शहराध्यक्ष यांनी यामध्ये लक्ष घालून त्यांच्या जवळच सेंट्रींग कॉन्ट्रॅक्टर हे काम करण्यासाठी दिलेला होता त्यानंतर त्याही सेंट्रींग कॉन्ट्रॅक्टरने महानगरपालिकेचे नोटीस आलेली आहे म्हणल्यानंतर हे काम करण्यास स्पष्ट नकार दिला परंतु त्याच सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टरला भाजपच्या शहराध्यक्ष यांनी सांगितले की विठ्ठल मोरे यांची मी प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे मी तुझ्या पाठीशी आहे तू ते काम चालू करून घे आणि मला पूर्ण करून माझ्या ताब्यात दे त्यानंतर ते सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टरला दबाव टाकून हे सर्व काम चालू आहे यावरती पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त साहेब पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिक्रमण विभाग यांनी यामध्ये लक्ष टाकून अतिक्रमण विभागास हे बांधकाम पाडून टाकण्यासाठी आदेश देण्यात यावेत आणि बांधकाम पाडण्यात यावे कारण या बांधकामांपासून तेथील आजूबाजूच्या सर्व रहिवाशांना खूप मोठा धोका निर्माण होणार आहे
सदर चालू असलेले बांधकाम हे सध्या खोदाई व आर.सी.सी. फुटींग भरण्यापर्यंत चालू होते. याबाबत आम्ही रहिवास्यांनी निवेदन देऊन महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर बांधकाम थांबविण्यात आले. मात्र, महापालिका अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवूनही शहर भाजप पदाधिकाऱ्याच्या आशीर्वादाने पुन्हा हे धोकादायक बांधकाम सुरु करण्यात आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे रात्रीच्या दहा वाजता स्लॅब गडबड घाईत अवघ्या २० मिनिटात इमारतीचा स्लॅब भरला आहे. घाईघाईत उरकलेल्या या कामामुळे आजूबाजूच्या नागरिकांना धोका निर्माण झाला असून, इमारत पडून बाजूच्या रहिवास्यांच्या जीवितास काही झाल्यास जबाबदार कोण ? त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम वेळीच थांबविण्यात यावे.

अनधिकृत बांधकामामुळे उद्भवणार पार्किंगची मोठी समस्या :
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामे वेळीच रोखली नाहीत, तर भविष्यात पार्किंगची मोठी समस्या निर्माण होणार आहे. अनधिकृत बांधकाम करताना पार्किंगसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात येत नाही. परिणामी अशा इमारतीत राहणाऱ्या सर्व लोकांची वाहने, दुचाकी रस्त्याच्या कडेला पार्किंग होणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या उद्भवणार आहे. विशेष म्हणजे सर्व्हे नं ७५, हिस्सा नं १अ/१अ/१क पिंपळे गुरव रत्नाई कृपा या बिल्डींग शेजारील अनधिकृत बांधकामाबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. असे असतानाही महापालिका अधिकाऱ्यांनी या बांधकामाला परवानगी दिलीच कशी ? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही अरुण पवार यांनी केली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version