Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी ते विश्रांतवाडी बस सेवा त्वरित चालू करा, अशी मागणी  अमित गोरखे यांनी  आयुक्त तसेच पीएमपीएल व्यवस्थापकांकडे लेखी निवेदनाद्वारे  केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की ,पिंपरी चिंचवड क्षेत्रातील नागरिकांना सध्या निगडी ते विश्रांतवाडी दरम्यान बस सेवेसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरील बस सेवा बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर अमित गोरखे यांनी ही सेवा त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे.

निगडी ते विश्रांतवाडी या मार्गावर मोठ्या प्रमाणावर प्रवासी संख्या आहे. या मार्गावरील बस सेवा बंद असल्यामुळे नागरिकांना प्रवासासाठी पर्यायी साधनांचा वापर करावा लागत आहे. ज्यामुळे त्यांना आर्थिक आणि वेळेचा मोठा भार सहन करावा लागतो. ही सेवा त्वरित सुरू करून नागरिकांना दिलासा दिला पाहिजे. विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाण्यासाठी तसेच कामगारांना त्यांच्या कार्यस्थळी पोहोचण्यासाठी बस सेवेसारखे सार्वजनिक वाहतूक साधन अत्यंत महत्त्वाचे आहे. बस सेवा बंद असल्यामुळे अनेकांना असुविधा होत आहे आणि त्यामुळे प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत. पीएमपीएल व्यवस्थापनाने आणि महानगरपालिका आयुक्तांनी या मागणीचा विचार करून निगडी ते विश्रांतवाडी बस सेवा त्वरित चालू करावी, असे अमित गोरखे यांनी म्हटले आहे.

 

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version