Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुदळवाडी भागातील यादवनगर, विठ्ठल मंदिर परिसर, मोरे पाटील चौक परिसरात ड्रेनेज लाईन दुरुस्तीविषयक व नव्याने ड्रेनेज लाईन टाकण्यासाठीची विकासकामे प्रलंबित आहेत.

या कामांची पाहणी व आराखडा तयार करण्याकरिता आमदार महेश लांडगे यांच्या सुचनेनुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी परिसराला भेटी दिल्या. यावेळी प्रभागातील नागरिकांनी त्यांना भेडसावणाऱ्या समस्या अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केल्या.

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करुन सविस्तरपणे माहिती घेतली. उपाययोजनाबाबत आराखडा तयार केला. लवकरच कामांचा शुभारंभ होईल, असे आश्वासन दिले, अशी माहिती भाजपचे युवा नेते दिनेश यादव यांनी दिली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version