Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थिनी कु. आरणे आरणे रोहिणी पोपट (रा. घरकुल चिखली पुणे )हिने इ. बारावी कला शाखेत 92. 67 टक्के गुण संपादन करून प्रथम क्रमांक पटविला आहे .

तिचे वडील  आरणे पोपट नामदेव हे घरोघरी वृत्तपत्र टाकण्याचे काम करतात. घरची परिस्थिती नाजूक असून देखील घवघवीत यश मिळाविल्याबद्दल संस्थेचे संस्थापक  गोविंद दाभाडे , प्राचार्या.वाळुंज मॅडम ,उपप्राचार्य श्री. बच्चे यांनी तिला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तिला मराठी, इतिहास विषयासाठी सौ. आणेकर मॅडम ,इंग्रजी विषयासाठी सौ .अभोणकर मॅडम, अर्थशास्त्र ,राज्यशास्त्र या विषयासाठी  शेख मॅडम तसेच भूगोल विषयासाठी  दौंडकर मॅडम यांनी प्रत्येक प्रत्येक विषयाकरिता मोलाचे मार्गदर्शन केले होते. सर्व शिक्षकांनी तिचे खूप खूप कौतुक केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version