Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पावसाळ्यात रस्ते खोदाई बंदचा आदेश आयुक्तांनी दिलेला आहे त्यापूर्वी सर्व चालू कामे पूर्ण करावीत.
मनपाच्या वतीने पावसाळा पूर्वीची कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावी, अशी मागणी    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश  उपाध्यक्ष ॲड. संदीप चिंचवडे यांनी आयुक्तांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील नाले सफाई करण्यात यावी.या अभावी रोगराई पसरू नये याची दक्षता घ्यावी.शहरातील सर्व ड्रेनेज लाईन्स साफसफाई करण्यात यावी.स्त्यावरील सर्व ड्रेनेज ची झाकणे दूरस्त करण्यात यावी. खराब झाकणांनी अपघात होत असतात नागरिकांच्या जीवितास धोका होऊ शकतो त्यामुळे झाकणे नव्याने बसविण्यात यावी. पावसाळी गटारे साफ सफाई व दुरुस्ती करण्यात यावी.

नद्यांमधील आलेली जलपर्णी काढून टाकण्यात यावी त्यासाठी नेमलेल्या एजन्सी काम करतानाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करावी कीवा गूगल मॅपिंग करून काम झाले का नाही तपासण्यात यावे.त्यानंतरच बिले अदा करावीत अन्यथा नेहमी प्रमाणे पावसाळ्यात धरणाच्या सोडलेल्या पाण्याने जलपर्णी वाहून जाते त्यानंतर आपले अधिकारी बिलिंग करतात असे होऊ नये याची काळजी घ्यावी

वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची व म न पा विद्युत विभाग यांची एकत्रित मीटिंग बोलावून विविध कामाबाबत नियोजन करण्यात यावे कसल्याही दुर्घटना होऊ नये यासाठी नियोजन करावे.विजेचा लपंडाव न होण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विनंती करावी. जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही.

पावसाळ्यात विजेच्या तारा ट्रान्सफर्मर सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. उद्यान विभागाकडून तारा झाडे एकत्र आले असतील तर झाडाच्या फांद्या कट करण्याची मोहीम सुरू करावी लागेल. अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून घरांचे गाड्यांचे नुकसान होत असते त्यामुळे तसा सर्व्ह उद्यान विभागाने करून अहवाल घेवून त्यावर कार्यवाही करावी.

शहरातील सर्व नाल्यांची व पावसाळी गटारे यांची साफसफाई युद्ध पातळीवर करण्यात यावी.ड्रेनेज विभागाला सर्व लाईन्स साफसफाई करायला आदेश द्यावेत ड्रेणेज ची झाकणे सुस्थितीत ठेवण्याचे आदेश द्यावेत जेणेकरून अपघात होणार नाहीत.विद्युत तारा व झाडे एकत्र असतील त्याठिकाणी वृक्षांच्या फांद्या छाटण्यात याव्यात जेणेकरून गाड्यांचे घरांचे नुकसान होणार नाही.वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून वारंवार वीजपुरवठा खंडित होणार नाही. यासाठी पावसाळ्यातील कामांचे बाबतीत नियोजन करावे.नद्यांमधील जलपर्णी पावसाळ्यापूर्वी काढण्यात यावी यासाठी नियोजन करण्यात यावे, असे ही निवेदनात म्हटले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version