Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएससी) २०२३-२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले.

बारावी विज्ञान शाखेतील
चित्राक्ष सिंग – ९६.८%, रिद्धी वैद्य – ९४.४%, नेहल चावडा – ९२.४%, प्राप्ती पांडे – ९०.२%, प्रियदर्शनी पाटील – ८९.६% या विद्यार्थ्यांनी गुण मिळवून शाळेत प्रथम पाच क्रमांक पटकावले.

तर वाणिज्य शाखेतील कनिष्का गर्ग ८३.६%, अरलीन नेज़ार – ८३%, आदित्य राज यादव – ७९.४% या विद्यार्थ्यांनी शाळेत प्रथम तीन क्रमांक पटकावले.
एस. बी. पाटील स्कूलच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी, उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी पिंपरी चिंचवड ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माभोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version